आजि नवस हे फळले नवसी

Dr. Pooja Bhavarth Dekhne

प्रत्येक वयात आलेल्या मुलीच्या आई-वडिलांना चिंता लागते ते तिला सुयोग्य असं स्थळ व वर मिळण्याची. अर्थात माझ्याही आई-बाबांना हीच चिंता लागलेली होती. मी दत्त सांप्रदायिक प. पू. नाना महाराज तराणेकर यांची अनुग्रहित. माझे आजोबा नानांचे अधिकारी शिष्य. माझ्या आजोळी आमचे वंशपरंपरागत आलेले पेशवेकालीन राम मंदिर आणि नानांनी स्थापन केलेले दत्त मंदिर. वडिलांकडून प. पू. गोंदवलेकर महाराजांची उपासना. त्यामुळे लहानपणापासून संपूर्ण आयुष्य हे आध्यात्मिक उत्सवांमध्येच गेलेले. भजनाची नितांत आवड. आमच्या नानांच्या परिवारात तर मला ‘मीराबाई’ म्हणून संबोधत असत. त्यामुळे जशी मी मोठी झाले तशी साहजिकच प्रत्येकाच्या तोंडी हीच चर्चा असे, की…

पुढे वाचा