विद्यापीठ हे शिक्षणक्षेत्र. शासकीय विभाग. इतर विभागांसारखेच त्याचे प्रशासकीय संबंध इतर विभागांशी. त्यामध्ये सहसंचालक, संचालक (उच्च शिक्षण विभाग), उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय, समाजकल्याण विभाग, सामाजिक न्याय विभाग, मंत्रालयाचा वित्त व सामान्य प्रशासन विभाग, कुलपती तथा राज्यपाल कार्यालय, राष्ट्रीय मूल्यांकन (नॅक) कार्यालय, बेंगलोर, विद्यापीठ अनुदान आयोग नवी दिल्ली, नियोजन विभाग, मनुष्यबळ विकास मंत्रालय, नवी दिल्ली, पोलीस प्रशासन, अनुसूचित जाती-जमाती आयोग, नवी दिल्ली, मानवी हक्क आयोग इत्यादी बरेचसे. अंतर्गत विभाग म्हणजेे प्रशासकीय अधिकारी, व्यवस्थापन परिषद सदस्य, अधिष्ठाते, अधिसभा सदस्य, कामगार संघटनांचे नेते व काही सेवक, वेगवेगळ्या समित्यांचे सदस्य इत्यादी! आणि बरेचसे…
पुढे वाचा