– विनोद श्रा. पंचभाई 9923797725 ‘ग्राहक राजा जागा हो’ किंवा ‘जागो ग्राहक जागो’ अशा प्रकारच्या जाहिराती आपण दूरदर्शनवर सतत बघत असतो. ग्राहकाला इंग्रजीत ‘कस्टमर’ असे म्हणतात. म्हणजेच जो कष्ट करत करत मरतो तो कस्टमर असे गमतीने म्हटले जाते. खरं तर आपल्या भारतात ग्राहकाची यापेक्षा वेगळी स्थिती नाही!
पुढे वाचाTag: Chaprak masik
मुक्ताई
माधव गिर, पुणे चपराक मासिक, ऑक्टोबर 2011 मुक्ता! माझं बाळ ते! असे अस्पष्टसे उच्चार मुखातून बाहेर पडले खरे, पण त्याच वेळी विट्ठलपंत हळूच उद्गारले. ‘रूक्मिणी, चल आता. सावर स्वत:ला ‘हो, चलावं! रूक्मिणीनी होकार भरला पण तिचा पायमात्र तेथून हलत नव्हता. ‘रूक्मिणी, अगं, आपण हे सर्व आपल्या मुलांसाठीच तर करतो आहोत ना.’ विट्ठलपंत समजूतीच्या सुरात बोलले.
पुढे वाचापरीक्षा गुरूंची!
काही शतकांपूर्वी कुणाचे शिष्यत्व पत्करणे, कुणाकडून अनुग्रह घेणे हे आज जेवढे सोपे आहे तेवढे सोपे नव्हते. त्याकाळी गुरु ज्यांना गुरुमंत्र द्यायचा आहे अशा शिष्याची कठीण परीक्षा घेत असत. गुरुंच्या सत्व परीक्षेतून जी व्यक्ती यशस्वीपणे बाहेर पडत असे त्यावर श्री गुरुंची कृपादृष्टी होत असे त्याला गुरुमंत्र मिळत असे.
पुढे वाचा21 व्या शतकातील दोन द्रष्टे
– अनिल किणीकर (चपराक दिवाळी विशेषांक 2013) एक स्टीव जॉब्झ हे कौटुंबीक असूनही कलंदर असं एक व्यक्तिमत्त्व होतं. स्टीव चर्चला नाकारत होता पण आयुष्याच्या एका टप्प्यावर त्याने झेन बुद्धिझमचा सखोल अभ्यास केला होता. एकेकाळी तो हिप्पी पंथाचा शिष्य होता आणि त्यावेळी तो हरिद्वारमध्ये मनसोक्त भटकत होता. 1970 च्या सुमारास विद्रोही संस्कृतितील स्टीव हा एक संतप्त तरूण (अँग्री यंग मॅन) होता. शुद्ध शाकाहार प्रेमी स्टीव कित्येक दिवस ऍपल आणि कॅरट (सफरचंद आणि गाजरं) खाऊन राहणारा स्टीव दरिद्री असताना आणि नंतर अत्यंत धनाड्य झाल्यावरही अत्यंत साधेपणाने राहायचा, वागायचा.
पुढे वाचामराठीतील पहिलं वाक्य
जैसी दीपामाजी दिवटी का तीथीमाजी पूर्णिमा गोमटी तैसी भाषामध्ये मर्हाटी सर्वोत्तम! संत ज्ञानेश्वरांनी वर्णिलेल्या या मराठीतील पहिलं वाक्य श्रवण बेळगोळ येथील शिल्पावर ‘श्री चामुंडराय करविले’ हे 1039 साली कोरलेले आढळते. त्यापूर्वीचही एक वाक्य संशोधनात आढळलय. सोलापूर ते विजापूर या रस्त्यावर कुडल संगमावरील मंदिरात सन 1018 मध्ये कोरलेले वाक्य ‘वांछीतो विजयी होइबा’ हे आहे. जो वाचेल तो आयुष्यात यशस्वी होईल, असा त्याचा अर्थ आहे. मुकुंदराज यांनी सन 1196 मध्ये ‘विवेकसिंधू’ हा काव्यरूप तत्त्वज्ञान सांगणारा ग्रंथ लिहिला.
पुढे वाचाआधुनिक ऋषी म. म. यज्ञेश्वरशास्त्री कस्तुरे
स्तुतिर्नैव यस्मै कदा रोचते च । धनं चा पि तस्मै विषं वै सदा च ॥ सदाचार वृत्तं हि यस्यामृतं च । नमामो वयं तं हि यज्ञेश्वरं च ॥ आजच्या काळात कोणाला ऋषी कसे होते याचे प्रत्यक्ष दर्शन करावयाचे असल्यास त्यांनी श्रीचतुर्वेदेश्वरधाम सावरगांव येथे परमादरणीय प्रातःस्मरणीय महामहोपाध्याय यज्ञेश्वरशास्त्री कस्तुरे गुरूजी यांचे दर्शन घ्यावे. अत्यंत तेजःपुज गौरवर्णांकित शरीर, गंभीर मुद्रा, ज्ञान आणि त्याग याचा एकत्रित झालेला समन्वय, नेत्रातील एक वेगळीच चमक, शांत, प्रसन्न, मुखमंडल पाहिले की हे कोणीतरी सत्ययुगातले वसिष्ठ अथवा वामदेवच अवतरले आहेत असा भास मनाला होत असे आणि अत्यंत नास्तिकही…
पुढे वाचाआम्ही कविसंमेलनांची अपत्ये
जेव्हा कविता लिहायला लागले त्यावेळी म्हणजे साधारण 20 वर्षांपूर्वी सत्यकथेसारखी नियतकालिके बंद पडण्याच्या मार्गावर होती. चांगले, दर्जेदार दिवाळी अंक निघायचे परंतु त्यात केवळ प्रस्थापित कवींच्याच कवितांना जागा होती. त्यावेळी मला आठवतंय कुठल्याही दिवाळी अंकाचा कविता विभाग हा कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांपासून सुरू होऊन अरुणा ढेरे, किशोर पाठक यांच्या कवितांपर्यर्ंत येऊन थांबायचा. त्यांच्यानंतर कितीतरी नवीन कवी बरंवाईट लिहित आहेत याची दखलही या दिवाळी अंकांच्या संपादकांना नसायची. त्यामुळे छापील स्वरुपात कविता जाणकारांपुढे येण्याचं भाग्य आम्हा कवींना सुरुवातीला लाभलं नाही.
पुढे वाचाकुणी देईल का मज त्या दु:खाची भूल?’
“राजा रविवर्म्यानं त्याच्या उर्वशीच्या चित्रासाठी जे मॉडेल वापरलं होतं त्याबद्दल तुला किती म्हणून उत्सुकता होती. रविवर्म्याला त्या मॉडेलच्या शरीराबद्दल आसक्ती होती का? प्रेक्षकाला तशी उर्वशीबद्दल आसक्ती वाटावी अशी रविवर्म्याला अपेक्षा होती का? असली कलाबाह्य चावट उत्सुकता तुला वाटली होती?” प्रा. विजय कारेकर यांचा ‘साहित्य चपराक’ मासिकाच्या मार्च 2010 च्या अंकातील हा लेख तुम्हाला नक्की आवडेल. अवश्य वाचा. प्रतिक्रिया द्या.
पुढे वाचासर्वार्थाने गुरू
विष्णू बाळकृष्ण ऊर्फ मधू कुलकर्णी म्हणजेच माझे वडील. आम्ही त्यांना मामा म्हणत असू. मराठीचे गाढे अभ्यासक, कथाकथन करायचे. उत्कृष्ट वक्तृत्व! ‘वळण’, ‘यात्रा’ ‘ते दहा दिवस’ असे तीन कथासंग्रह प्रकाशित. ललित साहित्यातील आकृती बंधाची जडण आणि घडण (फॉर्म) या विषयावर पी.एचडी. केली. नागपंचमीसाठी प्रसिद्ध असलेल्या 32 शिराळा या गावातील विश्वासराव नाईक महाविद्यालयातून प्राचार्य म्हणून 1984 साली स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि पुण्यामध्ये 23 मे 1995 रोजी प्राणज्योत मालवली.
पुढे वाचामना सत्य संकल्प जिवी धरावा!
आचार्य गोविंददेव गिरी यांचा जांब येथील प्रबोधन मंत्र ‘साहित्य चपराक’ मासिक मार्च 2020 शुकासारखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिकीसारखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरू रामदासा जयजय रघुवीर समर्थ
पुढे वाचा