समंजस

समंजस

चपराक दिवाळी 2020 ‘साहित्य चपराक’ मासिकाचे सभासद होण्यासाठी संपर्क – 7057292092 पायानं रेती उडवत दिनू किनार्‍यावर उगाचच चकरा मारीत होता. मावळत्या सूर्यानं सार्‍या आभाळभर लाल केशरी रंगांची उधळण केली होती. वार्‍याबरोबर उसळणार्‍या लाटांच्या कॅलिडोस्कोपमधून लाल, केशरी पिवळ्या रंगांच्या विविधाकृती नक्षी सागरपटलावर चमचमत होत्या. घरट्यांकडं परतणार्‍या पक्ष्यांची शिस्तशीर रांग सोनेरी झिलई चढवून क्षितिजावर उमटून क्षणात नाहीशी होत होती. पण फिरत्या रंगमंचावरचं दृश्य क्षणात पालटावं किंवा एखाद्या मनस्वी कलावंतानं, पॅलेटमध्ये उरलेल्या रंगांच्या मिश्रणानं तयार झालेल्या करड्या रंगाचे फटकारे सुंदर रेखाटलेल्या आपल्याच चित्रावर मारावेत तसा धुरकट करडेपणा हलके हलके सार्‍या कॅनव्हासवर उतरू लागला.…

पुढे वाचा

स्वित्झरलँड : टॉप ऑफ युरोप आणि माऊंट टिटलीस

स्वित्झरलँड : टॉप ऑफ युरोप आणि माऊंट टिटलीस

‘थॉमस कुक’तर्फे आम्ही युरोप सहलीला निघालो होतो. आमच्या तारखा सारख्या बदलत होत्या. शेवटी 3 जुलैच्या ऐवजी 6 जुलै तारीख नक्की ठरली आणि एकदाची आमची तयारी सुरू झाली. सगळा जमानिमा करून निघालो तर कधी न होणारी इमराईट्सची फ्लाईट रद्द होऊन आम्हाला पुढची फ्लाईट पकडावी लागली. त्यामुळे दुबईमधल्या इमराईट्सच्याच आलीशान हॉटेलमध्ये मुक्काम करावा लागला. एवढ सगळं होऊन फायनली आम्ही सहा जण लंडनला पोहोचलो आणि आमच्या थॉमस कुक ग्रुपला जाऊन मिळालो.

पुढे वाचा