वारकरी संप्रदायाचे तत्त्वज्ञान

वारकरी संप्रदायाचे तत्त्वज्ञान

मासिक साहित्य चपराक, दिवाळी 2019 भारतीय भक्ती संप्रदायांमध्ये वारकरी संप्रदायाचे योगदान महत्त्वाचे आहे. पंढरपूरच्या श्रीविठ्ठलाला दैवत मानणार्‍या वारकरी संप्रदायास संत ज्ञानोबा माऊली व संत नामदेवरायांनी लोकप्रियता मिळवून दिली. संत ज्ञानेश्वरांपूर्वी वारकरी संप्रदाय अस्तित्वात असला तरी त्यांनी आपल्या ग्रंथातून व कार्यातून वारकरी संप्रदायास मूर्त रूप दिले आहे. ‘हे विश्वचि माझे घर’ अशी विश्वात्मक शिकवण ज्ञानेश्वर माऊलींनी दिली आहे. सामाजिक समतेचा व वारकरी संप्रदायाच्या भक्तिमंदिराचा पाया घालणार्‍या संत ज्ञानेश्वरांचे अभंग, ओवी, गवळण, विरहिणी, भारूड यामधून त्यांचे विश्वात्मक अंतःकरण प्रतीत होते.

पुढे वाचा

धोक्याच्या वळणावर लातूर पॅटर्न

धोक्याच्या वळणावर लातूर पॅटर्न

साहित्य चपराक दिवाळी विशेषांक 2019 दहावी व बारावीच्या निकालासोबतच नीट, सीईटी परीक्षांच्या धर्तीवर राज्यात गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी चर्चिले जाणारे लातूर काही काळापासून शिक्षण क्षेत्रातील अनिष्ट प्रवृत्तीमुळे चर्चेत आले आहे. शेतरानात ऊस, सोयाबीन, तूर आणि गावात शिक्षण व शिकवण्या वगळता इथे कोणतेही पीक पिकत नाही. सततचा दुष्काळ व पाणीटंचाई, अवर्षणप्रवण परिस्थिती, नेहमीचीच गारपीट व दळणवळणाच्या सुविधांअभावी इथे उद्योग व्यवसाय चालू शकत नाहीत. त्यामुळे साखर कारखानदारी, डाळ व तेलबिया प्रक्रिया उद्योगावरच अर्थकारण अवलंबून होते. त्यात साधारणत: चार दशकांपूर्वी शैक्षणिक पॅटर्नची व एक दशकापूर्वी खाजगी क्लासेसचा पॅटर्न निर्माण झाला. तो रुजला व अल्पावधित ‘हा…

पुढे वाचा