समंजस

समंजस

चपराक दिवाळी 2020 ‘साहित्य चपराक’ मासिकाचे सभासद होण्यासाठी संपर्क – 7057292092 पायानं रेती उडवत दिनू किनार्‍यावर उगाचच चकरा मारीत होता. मावळत्या सूर्यानं सार्‍या आभाळभर लाल केशरी रंगांची उधळण केली होती. वार्‍याबरोबर उसळणार्‍या लाटांच्या कॅलिडोस्कोपमधून लाल, केशरी पिवळ्या रंगांच्या विविधाकृती नक्षी सागरपटलावर चमचमत होत्या. घरट्यांकडं परतणार्‍या पक्ष्यांची शिस्तशीर रांग सोनेरी झिलई चढवून क्षितिजावर उमटून क्षणात नाहीशी होत होती. पण फिरत्या रंगमंचावरचं दृश्य क्षणात पालटावं किंवा एखाद्या मनस्वी कलावंतानं, पॅलेटमध्ये उरलेल्या रंगांच्या मिश्रणानं तयार झालेल्या करड्या रंगाचे फटकारे सुंदर रेखाटलेल्या आपल्याच चित्रावर मारावेत तसा धुरकट करडेपणा हलके हलके सार्‍या कॅनव्हासवर उतरू लागला.…

पुढे वाचा

वाचायलाच हवे असे ‘वाङ्मयीन आत्मशोधन’

वाचायलाच हवे असे साहित्यिक आत्मकथन

कुणाही व्यक्तीच्या जडणघडणीत वाचनसंस्कृतीचा वाटा मोठा असतो याबद्दल दुमत नसावे. सामान्य माणसाचे एक सुसंस्कृत व्यक्तीत रूपांतर होण्यात चांगल्या, सकस वाचनाचा खूप मोठा उपयोग होतो. मला चांगल्या वाचनाची गोडी लागली ती माझ्या शाळेमुळे. शाळा भलेही तशी फारशी नामांकित नसेल पण शाळेत अतिशय समृद्ध असे ग्रंथालय होते. ग्रंथालयातील पुस्तकांच्या कपाटांना कुलूपे लावण्याची पद्धत अजिबात नव्हती. विद्यार्थ्यांनी मुक्तपणे पुस्तके हाताळावीत अशीच जणू शाळा प्रशासनाची इच्छा होती. अर्थात नुसती पुस्तके असून उपयोग नसतो तर ती वाचण्याची उर्मी मुलांच्या मनात निर्माण करणे ही बाब फारच महत्त्वाची. तर ते वाचन संस्कार आम्हा मुलांच्या मनात रुजवले ते…

पुढे वाचा