कहाणी हिंदू कोड बिलाची

कहाणी हिंदू कोड बिलाची

साहित्य चपराक दिवाळी 2020 हा अंक मागवण्यासाठी आणि ‘चपराक’ मासिकाचे सभासद होण्यासाठी संपर्क – 7057292092 देशाच्या सामाजिक राजकीय इतिहासात अनेक वेळा हिंदू कोड बिलाचा उल्लेख आढळतो पण अनेकांना हे हिंदू कोड बिल हे काय प्रकरण आहे हे माहिती नसतं! किंवा खूप वेळा आपल्याला त्याची अगदी एखादं दुसर्‍या वाक्यापुरती जुजबी माहिती असते. मीही याला अपवाद नव्हतेच; परंतु मध्यंतरी आचार्य अत्रे यांनी केलेलं एक विधान माझ्या वाचण्यात आलं.

पुढे वाचा

आम्ही कविसंमेलनांची अपत्ये

जेव्हा कविता लिहायला लागले त्यावेळी म्हणजे साधारण 20 वर्षांपूर्वी सत्यकथेसारखी नियतकालिके बंद पडण्याच्या मार्गावर होती. चांगले, दर्जेदार दिवाळी अंक निघायचे परंतु त्यात केवळ प्रस्थापित कवींच्याच कवितांना जागा होती. त्यावेळी मला आठवतंय कुठल्याही दिवाळी अंकाचा कविता विभाग हा कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांपासून सुरू होऊन अरुणा ढेरे, किशोर पाठक यांच्या कवितांपर्यर्ंत येऊन थांबायचा. त्यांच्यानंतर कितीतरी नवीन कवी बरंवाईट लिहित आहेत याची दखलही या दिवाळी अंकांच्या संपादकांना नसायची. त्यामुळे छापील स्वरुपात कविता जाणकारांपुढे येण्याचं भाग्य आम्हा कवींना सुरुवातीला लाभलं नाही.

पुढे वाचा