कुरुक्षेत्र

कुरुक्षेत्र

चपराक दिवाळी अंक 2020 अ‍ॅडव्होकेट परिणीती संझगिरीच्या युक्तिवादाने कोर्टात एकदम शांतता पसरली. सुमारे अर्धा तास तळमळून, अस्खलित, न अडखळता त्या जे बोलत होत्या त्यांच्या शब्दाशब्दागणिक प्रत्येकजण भावनिक होत होता. जजसाहेब तर चष्मा काढून ऐकतच राहिले. कुरूक्षेत्रावरच्या महाभारतातल्या धर्मयुद्धात अर्जुनाचे बाण जसे सपासप येऊन शत्रुपक्षाच्या हृदयात घुसत असतील तसा एक एक शब्द ऐकणार्‍याच्या मनाला लागत होता. अनेक स्त्रियांचे डोळे आपोआप भरून येत होते. एक वेगळाच खटला आज उभा राहिला होता.

पुढे वाचा

बळी तो…

बळी तो...

आता जमाना बदलला आहे. सगळ्या व्याख्याच बदलायला लागल्या आहेत, म्हणी उलट्या पालट्या व्हायला लागल्या आहेत. त्यांचे अर्थच बदलायला लागले आहेत. सगळ्या क्षेत्रात आनंदी आनंद आहे. कुठल्याही व्यवस्थापनात जा एका चकरेत काम होणारच नाही आणि एका चकरेत झालेच तर आपणच चक्कर येऊन पडू, असं कसं झालं म्हणून. एखादा माणूस गोड बोलला तरी भीती वाटते, हा का बुवा गोड बोलला? काय असेल याच्या मनात? एखाद्याने आपले काम ताबडतोब केलं तरी मनात शंका निर्माण होते, ‘ह्याचा काय फायदा असेल बरं आपल्याकडून, म्हणून एवढ्या तातडीने आपले काम केले याने? कुणालाही बोलवा, ‘आलोच लगेच’ म्हणतो…

पुढे वाचा

खरं तर हीच वेळ!

खरं तर हीच वेळ!

काळ मोठा कठीण आलेला आहे. सत्वपरीक्षा घेणारा आहे. स्वयंशिस्त लावून घेण्याचा आणि कायमच असं राहण्याचा. खरं तर हीच छान संधी आहे कुटुंबाबरोबर राहण्याची, मी आहे तुमच्यासोबत घाबरू नका हे सांगण्याची. त्यासाठी आपण स्वत: सामाजिक शिस्तीचे पालन करायला हवं. काहीतरी वाचून वा पाहून घाबरून न जाता परिस्थितीला तोंड द्यायला शिकायला हवे. केवळ आलेले मेसेजेस फोरवर्ड करून हे भागणार नाही. मी माझ्या कुटुंबाचा हे महत्त्वाचे.

पुढे वाचा

माझं लिखाण!

ज्या समाजात आपण राहतो, ज्या समाजाने आपली जडणघडण  केली त्या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो. विधात्याने जर माझ्या हातात लिखाणाचे कौशल्य दिले असेल तर मी माझी लेखणी समाजाला काहीतरी चांगलं देण्यासाठी वापरावी किंबहुना प्रत्येक कलावंताने आपली कला समाज समृद्धीसाठीच निर्माण करावी असं मला वाटतं आणि त्या दृष्टिकोनातूनच मी लिहितो.

पुढे वाचा