– जयेंद्र साळगावकर, मुंबई 9819303889 मराठीत लोकप्रिय झालेल्या टोपीवाल्याच्या गोष्टीतील टोपीवाल्याचा मुलगा टोपी विकण्याचा व्यवसाय करू लागतो. एका झाडाखाली तो विश्रांतीला बसतो व त्याचा डोळा लागतो. झाडावरुन माकडं खाली उतरतात आणि टोपीवाल्याच्या पेटीतील टोप्या पटापट घेऊन झाडावर जाऊन बसतात. टोपीवाला जागा होतो. त्याला आपल्या वडिलांच्या कथेतील प्रसंग आठवतो व तो आपल्या डोक्यावरील टोपी खाली टाकतो! पण माकडं आपल्या डोक्यावरील टोपी खाली टाकत नाहीत. ते म्हणतात, ‘‘एकदा आम्ही तुझ्या वडिलांसोबत फसलो, आता नाही फसणार!’’ अशी एका कीर्तनकाराने सांगितलेली आधुनिक टोपीवाल्याची गोष्ट ऐकण्यात आली. त्यांनी तरुणांना संदेश देण्यासाठी या गोष्टीचा पुढे कीर्तनात…
पुढे वाचाTag: yuth
आधुनिक पिढी
21 व्या शतकात जन्माला आलेली ही पिढी फारच चौकस आहे. कोणत्याही गोष्टीबद्दलची सखोल माहिती मिळाल्याशिवाय शांत बसत नाही. नोकरी अथवा व्यवसाय करण्यासाठी संगणकाच्या मदतीने ते पूर्ण माहिती आत्मसात करून घेतात. ती माहिती पटली तरच ते त्यावर कृती करतात. या पिढीने काळाची पावले लवकर ओळखली आहेत. पुस्तकी ज्ञानाबरोबरच ते संगणकीय ज्ञानालाही तेवढेच महत्त्व देतात. संगणकीय ज्ञानामुळे त्याच्या विचारशक्तीलाही एक प्रकारचा वेग मिळाला आहे. ते कोणत्याही गोष्टीचा सखोल अभ्यास करून ती गोष्ट जास्तीत जास्त सुलभ करण्यामागे त्यांचा कटाक्ष असतो. फेसबुक, व्हॉट्स अॅप्स, ट्वीटर यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानांनी युक्त अशी विविध सोशल मीडियाची उपलब्धता…
पुढे वाचा