बाभूळकांड

बाभूळकांड

ऐश्‍वर्य पाटेकर युवा साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक, नाशिक. 9822295672 मासिक ‘साहित्य चपराक’ दिवाळी अंक 2019 वारदात घडली तेव्हा एकही प्रत्यक्षदर्शी पुरावा नव्हता. भरदिवसा, भरगल्लीत बाभूळकांड घडवलं जातं अन् एकही साक्षीदार नाही! असं कसं होऊ शकतं? एकमात्र आहे की, माणसांचं जग सोयीनं आंधळं, मुकं, बहिरं होऊ शकतं याचा हा ढळढळीत पुरावा म्हणून आपण या घटनेकडं पाहू शकतो. होरपळून मेलेले पक्षी, त्यांच्या चोचीतून उठणारे अतीव वेदनेचे अंतिम चित्कार कुणीच ऐकले नाहीत! अग्नीच्या ज्वाळा आकाशाला भिडल्या असतील, त्याही कुणी पाहू नये! ही न पटण्यासारखी सबब. शेवटी पक्ष्यांचं जग माणसांच्या दृष्टिनं अतिशय क्षुल्लक!…

पुढे वाचा

चिंता करितो विश्वाची…

चिंता करितो विश्वाची...

मासिक साहित्य चपराक, डिसेंबर 2019 सज्जनगड… सोळाव्या शतकापासून ते आजतागायत प्रभू श्रीरामाच्या उपासनेत आकंठ बुडालेला हा गिरीदुर्ग. इथल्या प्रत्येक दगडात समर्थांचा आजही वास आहे. जगद्उद्धारासाठी स्वतः परमेश्‍वर जेव्हा भूतलावर वास्तव्य करु शकत नाही तेव्हा त्याची विचारधारा घेऊन प्रत्येक वेळी अशा विभूतींनी जन्म घेतला आहे, ज्यांनी समाज घडवला.

पुढे वाचा

अपराध

अपराध

कमल आणि विभावरी दोघी सख्या बहिणी. कमल मोठी, फारशी शिकली नाही. कॉलेजला शिकायला गेली आणि एका माणसाच्या प्रेमात पडली. विभावरी खूप हुशार. अभ्यासात, खेळात, दिसायलाही खूप सुंदर. देवाने सारं उजवं माप विभाला दिलेलं. तिचं सतत कौतुक व्हायचं. कमल मात्र अगदीच कपाळ करंटी. ऐन शिकायच्या वयात प्रेमात पडली. ज्या माणसाच्या प्रेमात पडली तो साधा मेकॅनिक.

पुढे वाचा

तलाकविषयी बोलू काही…

तलाकविषयी बोलू काही...

विविधतेत एकता हे आपल्या राष्ट्राचे मुख्य तत्त्व असलेले दिसून येते. भारतामध्ये अनेक जाती-धर्माचे लोक राहतात. त्यांच्या संस्कृती विविध स्वरूपाच्या आहेत. आचार, विचार, प्रथा, परंपरा, सण-उत्सव, पोशाख इत्यादी बाबतीमध्ये आपणाला विविधता आढळून येते. मात्र तरीही न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता इत्यादी मूल्यांनी आपणाला परस्सरांशी घट्ट बांधून ठेवलेले दिसून येते.

पुढे वाचा

‘चपराक’चे सभासद होण्यासाठी…

नमस्कार! ‘चपराक’चे सभासद होण्याविषयी अनेकजण विचारणा करत असतात. त्यांच्यासाठी खास योजना. साप्ताहिक ‘चपराक’ची वार्षिक वर्गणी केवळ तीनशे रूपये आहे आणि ‘साहित्य चपराक’ मासिकाची वार्षिक वर्गणी पाचशे रूपये. या दोन्हींची आठशे रूपये वर्गणी एकत्र भरली तर त्यांना श्री. द. गो. शिर्के गुरूजींचे ‘आई’ हे शंभर रूपयांचे पुस्तक भेट देत आहोत. मासिकाची त्रैवार्षिक वर्गणी पंधराशे रूपये भरले तर त्या सभासदांना एक हजार रूपयांची पुस्तके भेट देण्यात येतात. साप्ताहिक आणि मासिक या दोन्हींची एकत्रित त्रैवार्षिक वर्गणी चोवीसशे रूपये भरले तर त्यांना ‘चपराक’ची तब्बल दीड हजार रूपयांची पुस्तके भेट देत आहोत. आपण सर्वांनी या…

पुढे वाचा

साहित्य चपराक मासिक सप्टेंबर २०१७ अंक

Free Marathi Masik Sahitya Chaprak Online

साहित्य चपराक मासिक सप्टेंबर २०१७ अंक Read latest marathi magazine Sahitya Chaprak September 2017 ank online for free. साहित्य चपराक मासिक सप्टेंबर २०१७ अंक marathi magazines online free reading, read marathi magazine sahitya charprak online for free. Sahitya chaprak latest marathi magazine September 2017 ank available for free reading online. Read marathi masik online for free. Buy marathi books online published by chaprak prakashan online with free home delivery at Chaprak bookstore.

पुढे वाचा

इतिहासाचे भीष्माचार्य – वा. सी. बेंद्रे

असे म्हणतात की, एकेक पायरी सोडवत गेल्यास गणित सुटते; मात्र इतिहासाचे तसे नसते! इतिहासलेखन जेव्हा पूर्ण होते तेव्हाच त्याला खरे फाटे फुटतात! म्हणूनच इतिहास लेखन हे आत्यंतिक जिकिरीचे आणि कष्टाचे काम असते. त्यासाठी प्रचंड अभ्यास लागतो. तटस्थ वृत्ती लागते. ते जीवनध्येयच बनायला हवे. महाभारतकार व्यास मुनींनी म्हटलंय की, ‘इतिहास ही राष्ट्राची ज्योत आहे’ आपल्या राष्ट्राचा उज्ज्वल आणि स्फूर्तिदायी इतिहास समाजापुढे यावा यासाठी अनेकजण प्रामाणिकपणे झटत असतात. ज्यांना इतिहासलेखन क्षेत्रातील भीष्माचार्य म्हटले जाते असे बहुव्यासंगी संशोधक वा. सी. बेंद्रे हे त्यापैकीच एक!

पुढे वाचा

आई मला पंख आहेत पण… (कथा)

एक मोठं झाड होतं. त्यावर अनेक पक्षी राहत होते. तिथं खूप सारे खोपे होते. एका खोप्यामध्ये तीन पक्षी होते. आई-बाबा आणि त्यांचे पिलू. दोघांचे आपल्या पिलावर खूप प्रेम होते. पिलू अगदी छोटेसे होते. चोचीतून आई-बाबा त्याला भरवत होते. दिवस जात होते. पिलू वाढत होते. खोप्यामध्येच खेळत होते. ‘तुला पंख आहेत. तू उडू शकतो. बागडू शकतो, पिलाला सांगण्यात आलं. शिकार्‍याच्या जाळ्यात अडकायचं नाही. सहजपणे मिळालेले अन्न घ्यायचं नाही. कष्टाने शोधूनच पोट भरायचं. असं सगळं आई-बाबा शिकवत होते.

पुढे वाचा

‘साहित्य चपराक’ दिवाळी २०१७ महाविशेषांकासाठी साहित्य पाठवा!

लिहित्या हातांना आवाहन… ‘साहित्य चपराक’ दिवाळी महाविशेषांकासाठी साहित्य पाठवा! ‘साहित्य चपराक’ दिवाळी महाविशेषांकाचे काम शेवटच्या टप्प्यात आहे. वैविध्यपूर्ण विषयांवरील दर्जेदार साहित्याने नटलेला हा अंक वाचकप्रिय ठरला आहे. तब्बल पाचशे पानांचा आणि संपूर्ण बहुरंगी छपाई असलेला हा अंक सहा राज्यात वितरित होतो. आपणही या अंकात सहभाग नोंदवू शकता.

पुढे वाचा