– विनोद श्रा. पंचभाई 9923797725 ‘साहित्य चपराक दिवाळी विशेषांक 2021’ जगातील सर्वात मोठा क्रीडा स्पर्धांचा सोहळा असं ऑलिंपिक स्पर्धेचं वर्णन करण्यात येतं. यावेळी मात्र कधी नव्हे इतकी आव्हानात्मक परिस्थिती या सोहळ्यावर उद्भवली होती. त्याला कारणही तसंच होतं, अख्ख्या जगाला हादरवून सोडणारी कोरोना विषाणूची महाभयंकर साथ! त्यामुळे ऑलिंपिक स्पर्धांच्या इतिहासात प्रथमच ही स्पर्धा जवळपास एक वर्ष लांबणीवर पडली. 2020 साली होणारी ऑलिंपिक स्पर्धा प्रत्यक्षात 2021 मध्ये पार पडली! यावेळी ऑलिंपिकच्या आधीच्या घोषवाक्यात पहिल्यांदाच एक महत्त्वपूर्ण शब्द जोडला गेला… तो म्हणजे एकत्र! ‘सिटियस, फोर्टियस, आल्टियस व कोम्युनिस’ अर्थात ‘वेगवान, सामर्थ्यवान, उत्तुंग आणि…
पुढे वाचा