प्रति, श्री.नानासाहेब खर्डे सर, सेवानिवृत्त उप कार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग , महाराष्ट्र शासन. आ. महोदय, नमस्कार. आपले पहिलेवहिले *पाळंमुळं* हे पुस्तक वाचून नुकतेच पूर्ण झाले.आपली सुकन्या सौ.धनश्री विजय थोरात यांनी म्हटल्याप्रमाणे ; ही कथा वाचकांची कहानी आहे , हे वाचकांना जाणवेल , ही गोष्ट किंबहुना भाकित माझ्या बाबतीत १०० % खरे झाले आहे.पहिल्या पानापासून ते शेवटच्या पान क्रमांक ३१२ पर्यंत मी तुमच्या मागेच जीवनप्रवास करत असल्याचे जाणवले.त्यामुळे मी ही माझ्या जीवनाचा नुकतेच ५० वर्षांचा प्रवास तर केलाच आणि लक्षणीय बाब म्हणजे अनेक काळांपासून माझ्या मनात घोळत असलेल्या आत्मचरित्र लिहिण्याच्या विचारांना…
पुढे वाचाTag: Marathi book review
अग्निदिव्य – एका आईची संघर्षगाथा
माझे सन्मित्र, अत्यंत गुणी आणि अनेकानेक विषयावर जबाबदारीनं लिहिणारे लेखक आशिष निनगुरकर यांचा दूरध्वनी आला. ‘पुण्यात आलोय, भेटायचं आहे’ असं त्यांनी सांगितलं. रंगपंचमीचा दिवस असल्यानं मी नेमका कार्यालयीन काम संपवून त्या दिवशी घरी लवकर गेलो होतो. मग त्यांना घरीच बोलावलं. आमच्या घरी त्यांच्यासोबत रमामावशी आणि अभिषेकदादा आले. सुरुवातीला आशिषजींचे स्नेही म्हणून ती त्यांच्याकडं पाहत होतो. त्यानंतर रमामावशी बोलू लागल्या आणि डोळ्यात अश्रुंचा पूर येऊ लागला. एक तर त्यांची बोलण्याची मराठवाडी शैली. त्यात त्या इतक्या समरसून बोलत होत्या की आपण एखादा चित्रपट पाहतोय असंच वाटत होतं. अत्यंत चित्रदर्शी शैलीत त्या त्यांच्या…
पुढे वाचा‘हरी नरके आणि संजय सोनवणी यांची मित्तरकथा’
प्रा. हरी नरके यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर अनेकांनी पुरोगामी चळवळीचा म्होरक्या काळाआड गेला, म्हणून गळे काढले. छगन भुजबळ यांच्यासारख्या नेत्यांपासून ते अनेकांनी आपण किती दुःखात आहोत, याचे ‘प्रदर्शन’ घडवले. यातील ढोंग सगळ्यांनाच दिसत होते पण अशावेळी काहीही बोलायचे नाही, असा एक अलिखित रिवाज असतो. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध साहित्यिक आणि संशोधक असलेले संजय सोनवणी हे या सगळ्यात एक अपवाद होते. सोनवणी यांचे आणि नरकेंचे कौटुंबीक जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांची मित्तरकथा सर्वज्ञात आहे. हरी नरके यांनी काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर कसे चुकीचे उपचार झाले याबाबतचा एक व्हाटसअप संदेश सोनवणींना पाठवला होता.…
पुढे वाचा