प्रा. हरी नरके यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर अनेकांनी पुरोगामी चळवळीचा म्होरक्या काळाआड गेला, म्हणून गळे काढले. छगन भुजबळ यांच्यासारख्या नेत्यांपासून ते अनेकांनी आपण किती दुःखात आहोत, याचे ‘प्रदर्शन’ घडवले. यातील ढोंग सगळ्यांनाच दिसत होते पण अशावेळी काहीही बोलायचे नाही, असा एक अलिखित रिवाज असतो. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध साहित्यिक आणि संशोधक असलेले संजय सोनवणी हे या सगळ्यात एक अपवाद होते. सोनवणी यांचे आणि नरकेंचे कौटुंबीक जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांची मित्तरकथा सर्वज्ञात आहे. हरी नरके यांनी काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर कसे चुकीचे उपचार झाले याबाबतचा एक व्हाटसअप संदेश सोनवणींना पाठवला होता.…
पुढे वाचाTag: medical treatment
जागा हो!
एकदा कोरोनाशी बोलून, तो एवढा क्रूर का वागतोय हे मला त्याला विचारायचं होतं! पण तो तर नजरेला न दिसणारा अदृश्य जीव! कसं काय बोलणार त्याच्याशी? असा विचार करत असताना, मनात विचार आला, अरे परमेश्वरही अदृश्यच आहे तरी आपण त्याच्याशी बोलतो मग कोरोनाशी बोलणं का शक्य नाही? कोरोना मला दिसत नसला तरी देखील मी त्याच्याशी संपर्क साधण्यात यशस्वी झालो. तो तशा शांत होता. म्हणून मीच त्याला पहिला प्रश्न केला, ‘‘का रे! तू आमच्याशी एवढा क्रूर पणे का वागतोस?’’ त्यावर तो म्हणाला, ‘‘अरे मी एवढा क्रूर नाही. जरा विचार करून पहा, माझ्यापेक्षा…
पुढे वाचा