देवपूजा – सुनील भातंब्रेकर, पुणे

‘जय जय रघुवीर समर्थ’!! ‘र्थ’ वर जोर देऊन त्याने पूजेची सांगता केली. पुन्हा एकदा दोन्ही हात जोडून नमस्कार केला. आसनाची घडी करून शेल्फमध्ये ठेवली आणि कपडे बदलायला आतल्या खोलीत ‘झाली बाबा एकदाची देवपूजा’ असे पुटपुटत गेला. दोन्ही मुलं अजून सोफ्यावर लोळत पडलेली. दोघांना यथेच्छ शिवीगाळ करून झाल्यावर त्याचा मोर्चा पत्नीकडे वळला. तिथे अजून अर्धवट तयारी झालेली दिसल्यावर उरलेली शिवीगाळ तिथे झाली. मुलांनी त्रासिक चेहर्‍याने ऐकून घेतले होते पण पत्नीने प्रतिवार केले आणि मघाशी चकाचक केलेल्या देवमूर्तीपुढे छानशी शाब्दिक चकमक उडाली. हे सारे नित्य असते. घरातल्या सदस्यांनाच काय देवालाही ह्याची सवय झाली असणार. देवासमोर गंभीर…

पुढे वाचा

‘हरी नरके आणि संजय सोनवणी यांची मित्तरकथा’

प्रा. हरी नरके यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर अनेकांनी पुरोगामी चळवळीचा म्होरक्या काळाआड गेला, म्हणून गळे काढले. छगन भुजबळ यांच्यासारख्या नेत्यांपासून ते अनेकांनी आपण किती दुःखात आहोत, याचे ‘प्रदर्शन’ घडवले. यातील ढोंग सगळ्यांनाच दिसत होते पण अशावेळी काहीही बोलायचे नाही, असा एक अलिखित रिवाज असतो. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध साहित्यिक आणि संशोधक असलेले संजय सोनवणी हे या सगळ्यात एक अपवाद होते. सोनवणी यांचे आणि नरकेंचे कौटुंबीक जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांची मित्तरकथा सर्वज्ञात आहे. हरी नरके यांनी काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर कसे चुकीचे उपचार झाले याबाबतचा एक व्हाटसअप संदेश सोनवणींना पाठवला होता.…

पुढे वाचा