आचार्य प्रल्हाद केशव अत्रे हे शब्द जरी उच्चारले तरी माझ्या पिढीच्या म्हणजे पन्नासच्या दशकात जन्मलेल्या आणि त्याच्या आधीच्याही पिढ्यांच्या डोळ्यापुढे एक भारदस्त, धिप्पाड व्यक्तिमत्त्व उभे राहते. येत्या 13 ऑगस्टला आचार्यांच्या जन्माला 126 वर्ष पूर्ण होतील. त्यांच्या निर्वाणालाही 55 वर्षे होऊन गेली तरीही मराठी मनातली त्यांची प्रतिमा जराही धूसर झालेली नाही. त्यांच्या आयुष्यातील लहानमोठ्या घटना, जीवनाच्या विविध क्षेत्रातील त्यांची उत्तुंग कर्तबगारी उभ्या महाराष्ट्राला उत्तमपणे ज्ञात आहेच. त्यामुळे जयंतीनिमित्ताने नव्याने काय लिहावे हा प्रश्नच आहे; पण तरीही याप्रसंगी त्यांची आठवण जागी न करण्याचा करंटेपणा करणे केवळ अशक्य.
पुढे वाचाTag: arun kamalapurkar
हळवा कोपरा – प्रस्तावना
संगमेश्वर तालुक्यातील लोवलेस्थित वाचकप्रिय लेखक जे. डी. पराडकर यांचे ‘चपराक प्रकाशन’कडून प्रसिद्ध होत असलेले हे सातवे पुस्तक. जेडींच्या लेखणीतून कोकणचा समृद्ध, अस्पर्श असा निसर्ग जसा दिसतो तशीच वरपांगी साधी भोळी पण अंतरी नाना कळा असणारी माणसेही दिसतात. कोकणातील प्राचीन मंदिरे, ऐतिहासिक वास्तू यांची स्पंदनेही लेखकाच्या संवेदनशील मनाला जाणवतात. ‘हळवा कोपरा’ हे पुस्तकही याला अपवाद नाही. मुळात हे साप्ताहिक स्तंभलेखन असल्याने इथे विषयांची विविधता पुरेपूर आहे.
पुढे वाचापिऊन वीज मी फुले फुलविली
चपराक दिवाळी विशेषांक 2020 – मृण्मयी पाटणकर, सिडनी, ऑस्ट्रेलिया व. पु. काळे यांच्या ‘वलय’ या पुस्तकामधली एक कथा आहे – ‘पिऊन वीज मी फुले फुलविली’. या गोष्टीतली मंजू लेखकाला एका प्रवासात भेटते. अत्यंत सुंदर… सौंदर्याची थोडीशी भीतीच वाटावी अशी. इच्छा असूनही आपण काही बोललो तर कदाचित ही आपला अपमान करेल या भीतीनं लेखक बोलायचं टाळतो पण मंजूच संवादाला सुरुवात करते आणि बघता बघता लेखकाचं मत साफ बदलून जातं. सौंदर्याचा जरासाही गर्व मंजूला नसतो. अत्यंत निर्मळ आणि दुसर्याला आपलंसं करून टाकणारं तिचं व्यक्तिमत्त्व लेखकाला भारावून टाकतं.
पुढे वाचा