अनुभव नाहीये? खचू नका! मग फ्रेशरनी अशी मिळवावी नोकरी

नुकताच पत्राने आपलं पदवीचे शिक्षण पूर्ण केले होते. आता गरज होती ती नोकरी मिळवण्याची. एखादी कमी पगाराची का होईना पण नोकरीची सुरूवात महत्त्वाची होती. पत्रा नोकरीच्या शोधात होती.

पुढे वाचा

स्त्री-पुरूष मैत्री – आकर्षण, गरज की फॅशन?

‘सौहृदान सर्वभूतानां विश्वासो नाम जायते।’ मैत्रीमुळे सर्व प्राण्यांमध्ये एकमेकांविषयी विश्वास निर्माण होतो, असे मैत्रीविषयी म्हटले गेले असले तरी मैत्री या शब्दाची, त्यातील गर्भित भावनेची व्यापकता खूप मोठी आहे. मनुष्य समाजप्रिय प्राणी आहे. जन्मताच त्याला अनेक नाती मिळतात पण मैत्री हे असे नाते असते की ते त्याने स्वतः निर्माण केलेले असते.

पुढे वाचा

मागे वळून पाहताना

15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. दीडशे वर्षाच्या कालावधीत स्वातंत्र्याची मागणी करणारे व त्यासाठी निष्ठेने आपले आयुष्य वेचणारे जेवढे थोर व सामान्य स्त्री-पुरूष या देशात झाले त्या सर्वांना स्वातंत्र्याचे श्रेय द्यावयास हवे.

पुढे वाचा

वारी एक समाजसंस्कार

परिचारिका कधी तू वैद्य होऊनी किती रुपात तू आलास सैन्य होऊनी कृतीतूनी जगास कर्मयोग दाविला आज माणसामध्ये मी देव पाहिला वर्षानुवर्षे वारीची परंपरा जपणारे, कधीही न चुकता वारी करणारे, कोरोनाच्या आधी पहिल्यांदाच वारीचे अमृत चाखलेले आणि दुसऱ्या वर्षी परत जायची ओढ लागलेले वारकरी शिवाय वारकऱ्यांना सेवा , सुविधा पुरवणारे असे सगळेच गेली दोन वर्षे पुन्हा वारी सुरू होण्याची वाट बघत होते. अवघ्या दोन वर्षांच्या लढाईनंतर वारीच्या मार्गाचे श्वास मोकळे झाले. वैद्य , वैद्यकीय कर्मचारी, पोलीस , पत्रकार, सुरक्षा कर्मचारी , अत्यावश्यक सेवा पुरवणारे, स्वतः पुढाकार घेऊन किंवा अन्न, साधन, सामग्री…

पुढे वाचा

एसटीचा संप मिटला! कर्मचारी आणि लालपरीच्या आवाजाचं काय?

यंदा ऐन दिवाळीत एसटी कर्मचार्‍यांनी विलीनीकरण, सातवा वेतन आयोग लागू करावा यासह अनेक मागण्या घेऊन संपाचं हत्यार उपसलं होतं. त्यावेळी अनेक चाकरमानी, विद्यार्थी, कामगार दिवाळीच्या सुट्टीत आपापल्या गावी जायला निघाले होते, त्यांना या संपाचा मोठा फटका बसला. एसटी बंद म्हटल्यावर खाजगी वाहतुकीची चांदी होणार हे गृहीतच होतं. सर्वसामान्यांचा कुठलाच विचार न करता खाजगी लोकांनी तिकिटाचे दर भरमसाठ वाढवले. त्यातून गरीब जनतेचे मोठे आर्थिक शोषण झाले. मागच्या तीन-चार वर्षाचा विचार करता हा संपही दोन-तीन दिवसात मिटेल असे वाटत होते, मात्र गेल्या संपात तोंडी आश्वासनं सोडली तर आपल्या हाती ठोस असं काहीच…

पुढे वाचा

गांधीजींचे पुनरागमन

गांधीजींचे पुनरागमन सुसाट आणि पिसाट माणसाला रोखणारी प्रेरणा… विविध भाषिक व पंथीय स्वरूपात आपले गट करून राहणार्‍या भारतीयांना एकत्र आणण्याचा आणि लढ्यासाठी, न्यायासाठी एकत्रित उभे करण्याचा गांधीजींचा प्रयत्न हा अभिनव तर होताच पण त्याचे मानवी इतिहासातील महत्त्वही अधोरेखित केले पाहिजे. काही हजार लोक पोलिसांची व लष्कराची भीती न बाळगता एकत्र येतात आणि लढा पुढे नेतात, हेच एक अजब आश्चर्य होते.

पुढे वाचा

प्रथा – परंपरा नाकारताना!

कुजबुज, हेटाळणी, कुचेष्टा, प्रखर विरोध प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे वाळीत टाकणं… ही सगळी चढती भांजणी आहे एखादी प्रथा किंवा परंपरा नाकारताना समाजाकडून येणार्‍या प्रतिक्रियांची.

पुढे वाचा

हे देवाघरचे देणे!

प्रेम नाही मिळाले म्हणून द्वेष? घृणा? सूड? मग प्रेमच कसले? अलीकडच्या माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटनांना पाहिले की मन सुन्न होते आणि विचारात पडते की इतक्या खालच्या पातळीवर जाईपर्यंत माणसाचा आत्मा, विवेक, त्याच्यातील दयाभाव कसा काय झोपू शकतो? की या सगळ्याला जागे ठेवण्याच्या अभ्यासात/जागरणात समाज आणि संस्कृतीचा सहभाग कमी व्हायला लागलाय?

पुढे वाचा

‘परदेशस्थ’ मुलीचं पत्र

हाय आई अणि बाबा, कसे आहात? तसं हे विचारायचं आत्ता लगेच काही कारण नाही, कारण चार महिन्यांचा आमच्याकडचा मुक्काम संपवून कालच तुम्ही घरी परत पोचला आहात. प्रवास छान झाला आणि सुखरूप पोचलात हे महत्त्वाचं! आता काही दिवस आपण एकमेकांना खूप मिस करू, कारण एवढ्या दिवसांची सवय झालीय ना! मुलं तर आजी आजोबांना विशेष मिस करतील आणि तुम्ही त्यांना. मग हळूहळू परत आपलं रुटीन सुरु होईल. तुम्ही तुमची मित्र मंडळींची , गाण्याचे कार्यक्रगेट टुगेदर्स, जिम वगैरे मध्ये बिझी व्हाल आणि आम्ही आमचं काम, मुलांच्या शाळा, ऍक्टिव्हिटीज मध्ये. तसे आपण आठवड्यातून एकदा…

पुढे वाचा

देवदासींचे आर्थिक पुनर्वसन

सांगली जिल्ह्याच्या शासकीय पदावर मी १९८२ ते १९८५ असे तीन वर्ष कार्य केले. आधी दीड वर्ष जिल्हा परिषदेची मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून तर पुढील दीड वर्ष जिल्हाधिकारी म्हणून. लोकसंग्रहासाठी या दोन्ही पोस्ट म्हणजे आयएएस अधिकार्‍यांची पहिली पसंती. या काळात जिल्ह्यातील, विशेषतः ग्रामीण भागातील जनतेशी जेवढा जवळून संबंध येतो तो या नंतरच्या वरिष्ठ पदावर काम करताना येत नाही. दिनांक २४ जानेवारी १९८३. सकाळी सकाळीच कमिशनरांचा फोन आला – ‘‘जिल्हाधिकारी म्हणून ऑर्डर मिळाली आहे ना? मग चार्ज का नाही घेतला?’’ मी म्हटले – ‘‘वर्तमान जिल्हाधिकारी यांनी विनंती केली आहे, या वेळचा २६…

पुढे वाचा