देवदासींचे आर्थिक पुनर्वसन

सांगली जिल्ह्याच्या शासकीय पदावर मी १९८२ ते १९८५ असे तीन वर्ष कार्य केले. आधी दीड वर्ष जिल्हा परिषदेची मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून तर पुढील दीड वर्ष जिल्हाधिकारी म्हणून. लोकसंग्रहासाठी या दोन्ही पोस्ट म्हणजे आयएएस अधिकार्‍यांची पहिली पसंती. या काळात जिल्ह्यातील, विशेषतः ग्रामीण भागातील जनतेशी जेवढा जवळून संबंध येतो तो या नंतरच्या वरिष्ठ पदावर काम करताना येत नाही. दिनांक २४ जानेवारी १९८३. सकाळी सकाळीच कमिशनरांचा फोन आला – ‘‘जिल्हाधिकारी म्हणून ऑर्डर मिळाली आहे ना? मग चार्ज का नाही घेतला?’’ मी म्हटले – ‘‘वर्तमान जिल्हाधिकारी यांनी विनंती केली आहे, या वेळचा २६…

पुढे वाचा