प्रमुख अतिथी

मार्च महिना संपला होता. तालुक्यातील अनेक शाळांतील वार्षिक स्नेहसंमेलने संपन्न झाली होती. आम्ही दरवर्षी एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात स्नेहसंमेलन घेत असू. यावर्षी मात्र दुष्काळामुळे ते घ्यावे की नाही या द्विधा मन:स्थितीत होतो.

पुढे वाचा

व्यथिता : व्यथित करणारा संग्रह!

सुख पाहता जवापाडे। दु:ख पर्वताएवढे! संत तुकाराम महाराजांच्या या ओळींचा प्रत्यय मानवी जीवनात पदोपदी येतो. जीवन, संसार म्हटलं की सुख- दु:ख, बऱ्यावाईट घटना ह्या ठरलेल्या असतात.

पुढे वाचा

वाटेवरच्या मशाली

वाचकांना घडाभर दूध देण्यापेक्षा पेलाभर बासुंदी देणे कधीही श्रेयस्कर! त्यामुळे उगीच शब्दांचे अवडंबर न माजवता, फाफटपसारा टाळून रंजकपणे थोडक्यात विषय मांडणे महत्त्वाचे असते.

पुढे वाचा

राष्ट्रज्योत तेवत ठेवणारे बेंद्रे

असे म्हणतात की, एकेक पायरी सोडवत गेल्यास गणित सुटते; मात्र इतिहासाचे तसे नसते! इतिहासलेखन जेव्हा पूर्ण होते तेव्हाच त्याला खरे फाटे फुटतात!

पुढे वाचा

देखणी

माखी नाव तिचे. अतिशय गरीब कुटुंबात जन्मलेली एका झोपडपट्टीत ती, तिच्या तीन बहिणी, आई व सदा न कदा दारुच्या नशेत धुंद राहणारा तिचा बाप एवढे कुटुंब एकाच खोलीत, खोली म्हणण्यापेक्षा झोपडी काट्याकुट्या, रबर, कागद, गोणपाटाने तयार झालेली झोपडी अशा ठिकाणी जन्म घेतला.

पुढे वाचा

संभाजी महाराजांची हत्या व गुढीपाडवा?

प्रदीर्घ काळ महाराष्ट्र व आसपासच्या राज्यांवर राज्य करणारे महाराष्ट्रातील एकमेव घराणे म्हणजे सातवाहन. सातवाहन स्वत:ला सालाहनही म्हणवून घेत. शालिवाहन हे सालाहनचे कृत्रिम संस्कृतीकरण.

पुढे वाचा

सामाजिक परिवर्तनाचा पुरस्कार करणाऱ्या ‘अनोख्या रेशीमगाठी’

‘लोक काय म्हणतील?’ अशा प्रकारची सामाजिक भीती, समाजातला प्रत्येक समूह, प्रत्येक कुटूंब आणि प्रत्येक माणूस बाळगत असतो. त्याच ओझ्याखाली प्रत्येकजण आपले संपूर्ण आयुष्य, धडपडत जगत असतो. समाज नावाची स्वार्थी संस्था ही गंमत बघण्यात अघोरी आनंद मानणारी असते. त्यांना कोणाचे काय झाले, याच्याशी मतलब नसतो.

पुढे वाचा

सतत जळणारा आणि फुलणारा लोककवी

उद्याचा कालिदास अनवानी पायाने फिरत असेल तर त्यात अब्रू त्याची नव्हे; राजा भोजाची जाते, असे सांगणारे लोककवी मनमोहन तथा गोपाळ नरहर नातू प्रतिभेचा स्फोट घडविणारे अद्भूत किमयागार होते. 7 मे 1991 ला त्यांनी जगाचा निरोप घेतला असला तरी त्यांच्या साहित्य कारकिर्दीमुळे ते अजरामर आहेत.

पुढे वाचा

मॅनहटन मिस्ट्री – गूढकथा

रात्रीचे आठ वाजले होते. तरीही लख्ख सूर्यप्रकाश होता. मॅनहटन सिटी आनंदाने न्हाली होती. शुक्रवार संध्याकाळ असल्याने लोकांच्या उत्साहाला उधाण आले होते. नाचत, गात मंडळी हिंडत होती. काही तरुण उघड्या जीपमधून वेगाने आवाज करीत जात होते.

पुढे वाचा

रंगोत्सवाची अखंड उधळण करणारा कलावंत भारत गदगे

जन्मजात चित्रकाराला एक हक्क असतो रंगात खेळण्याचा! त्याला बंधन नसतं वयाचं, वेळेचं, काळाचं!! त्याचा एकच ध्यास असतो कॅनव्हासवर रंग उधळण्याचा आणि त्याच रंगात रसिकांना रंगवण्याचा.

पुढे वाचा