परभणी जिल्ह्यातलं कडोली हे एक छोटंसं गाव. या गावात जन्मलेल्या नानाजी देशमुख यांचं शिक्षण राजस्थानातील सिकर येथे झालं आणि गोळवलकर गुरुजींच्या सूचनेनुसार ते उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे संघप्रचारक म्हणून गेले. बलरामपूर लोकसभा मतदारसंघातून ते खासदार म्हणून निवडून गेले. पहिले ग्रामीण विद्यापीठ स्थापन करणार्या मराठमोळ्या नानाजींना ‘भारतरत्न’ या सर्वोच्च सन्मानानं गौरविण्यात आलं. 1999 ते 2005 या कालावधीत ते राज्यसभा सदस्य होते. उत्तर प्रदेशातील खेडी स्वयंपूर्ण होण्यासाठी त्यांनी योगदान दिलं. अणीबाणीनंतर 1977 साली बलरामपूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक होती. नानाजी तुरूंगात बंदिस्त होते. नानाजींचे जवळचे स्नेही रामकृपाल शुक्ल म्हणतात, ‘अणीबाणीच्या काळात नानाजींनी भूमिगत…
पुढे वाचाTag: loksabha elections 2024
इंदापुरातील पाटील निवाडा
इंदापूर येथील कर्मयोगी शंकरराव बाजीराव पाटील हे 1980 आणि 1989 ला बारामती लोकसभा मतदारसंघाचे खासदार होते. 1952 ते 1978 अशी 26 वर्षे ते इंदापूरचे आमदार होते. यशवंतराव चव्हाण यांच्या मंत्रीमंडळात त्यांचा दुग्धव्यवसाय व मत्स्यपालन खात्याचे उपमंत्री म्हणून समावेश झाला. त्यातूनच त्यांनी महाराष्ट्रात दूध सोसाट्यांचे जाळे निर्माण केले. सहकारी साखर कारखाना व कामगारांत त्यांनी यशस्वी चर्चा घडवून आणली. त्याला ‘पाटील निवाडा’ म्हणून मान्यता मिळाली. सहकारी संस्था, विविध कार्यकारी सोसायट्या, शैक्षणिक संस्थांची उभारणी अशा कामांना त्यांनी प्रोत्साहन दिले. बावडा या गावात महाशिवरात्रीच्या दिवशी जन्म झाल्याने त्यांचे नाव ‘शंकर’ असे ठेवण्यात आले मात्र…
पुढे वाचादूरदृष्टी असलेला ‘भाजपचा लक्ष्मण’
भारतीय राजकारणात ‘तत्त्वज्ञानी शासक’ अशी ज्यांची ओळख होती ते मराठी नेते म्हणजे प्रमोद महाजन. श्रीराम मंदिर निर्माणासाठी अटलजी आणि अडवाणींनी देशभर जी रथयात्रा काढली त्याची संकल्पना प्रमोदजींची होती. भाजप आणि शिवसेनेची युती ही सुद्धा त्यांचीच देण! संघप्रचारक ते भाजपा नेते अशी ओळख असलेल्या प्रमोद महाजन यांचे योगदान फक्त भाजपाच्या वाढीसाठी नव्हते तर देशाच्या हितासाठीही होते. भारतीय लोकशाही आघाडीसाठी पहिले पूर्ण मुदतीचे सरकार स्थापन करण्यासाठी त्यांनी जिवाचे रान केले. 1983 मध्ये चंद्रशेखर यांनी राम मंदिरासाठी पदयात्रा काढली होती. असाच काहीसा प्रयोग आपणही करावा असे अडवाणींना वाटत होते. प्रमोदजींनी त्यांना सांगितले की,…
पुढे वाचामाझेच काम पाहा!
जवाहरलाल नेहरू यांचा त्या काळी विलक्षण करिष्मा होता. त्यांच्या लोकप्रियतेमुळे ते जगभर तळपत होते. 1964 च्या जानेवारी महिन्यात भुवनेश्वर येथे एकाएकी ते खूप आजारी पडले. डॉक्टरांनी त्यांच्या हालचालीवर पूर्ण बंदी आणली होती. स्वाभाविकच त्यावेळी सगळ्यांना प्रश्न पडला की, आता नेहरूनंतर कोण? त्यांची विश्रांती सुरू असताना लालबहाद्दूर शास्त्री यांनी त्यांना विचारले, ‘‘आता मी कोणते काम पाहू?’’ त्यावर क्षणाचाही विलंब न करता नेहरू म्हणाले, ‘‘तुम्ही माझेच काम पाहा!’’ तिथेच शास्त्रीजींच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब झाले होते. जवाहरलालजींचा आदेश मानून 24 जानेवारी 1964 पासून लालबहाद्दूर बिगरखात्याचे मंत्री म्हणून काम पाहू लागले. खरंतर लालबहाद्दूर यांचं आडनाव…
पुढे वाचाकृतज्ञता जपणारे…
16 ऑगस्ट 1982 रोजी धाराशिव (तेव्हाच्या उस्मानाबाद) जिल्ह्याचे विभाजन झाले आणि लातूर जिल्ह्याची निर्मिती झाली. या जिल्ह्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठं योगदान दिलं. शिवाजीराव पाटील निलंगेकर हे मुख्यमंत्री होते. विलासराव देशमुख यांनीही मुख्यमंत्री म्हणून दीर्घकाळ राज्याचं नेतृत्व केलं. शिवराज पाटील चाकूरकर हे तर सात वेळा खासदार होते. त्यांनी देशाचं गृहमंत्रीपद भूषविलं. राज्यपाल म्हणून काम केलं. धाराशिव जिल्ह्यातील डॉ. पद्मसिंह पाटील हेही अनेक वर्ष मंत्रीपदी होते. निलंगेकर, विलासराव, शिवराज पाटील या सर्वांच्या प्रयत्नातून लातूर जिल्हा अस्तित्वात आला. त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते बॅरिस्टर ए. आर. अंतुले. लातूर जिल्ह्याच्या निर्मितीला पंचवीस वर्ष पूर्ण झाले…
पुढे वाचाअत्रेंनी पाडलेला मुंबईचा बादशहा
‘हा सदोबा… लोकसभेत जायचं म्हणतोय. याला मी शोकसभेत पाठवेन,’ अशी बोचरी टीका करणार्या आचार्य अत्रे यांनी एका सभेत एक विधान केलं होतं. ते म्हणाले, ‘मी 13 ऑगस्टला जन्माला आलो. 15 ऑगस्टला स्वातंत्र्य मिळालं. दोन चांगल्या गोष्टींच्या मध्ये एक वाईट गोष्ट घडावी म्हणून 14 ऑगस्टला स. का. पाटील जन्माला आले.’ ‘मुंबईचा अनभिषिक्त सम्राट’ असं ज्यांचं वर्णन केलं जायचं त्या स. का. पाटील यांच्या विरूद्ध आचार्य अत्रे यांनी जंग जंग पछाडलं होतं. त्याचं कारण होतं, स. का. पाटील यांचा संयुक्त महाराष्ट्राला असलेला विरोध. त्यामुळंच 1967 च्या लोकसभा निवडणुकीत साऊथ बॉम्बे मतदारसंघातून पाटील…
पुढे वाचातो पाकिस्तानी आहे का?
उद्धव ठाकरे यांनी सांगलीतून चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली आणि मविआत सुंदोपसुंदी सुरू झाली. काँग्रेसने ही जागा सोडण्यास नकार दिला. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात आणि विश्वजित कदम यांनी हा विषय बराच ताणला. संजय राऊत यांनी तर महाराष्ट्रात इतर मतदारसंघात काँग्रेसची काय अवस्था होईल, यावर भाष्य केले. शेवटी उद्धव यांनी विश्वजित यांची नाराजी दूर केली आणि हा वाद मिटला. गेल्या काही काळात युती-आघाडी या सर्वांची समीकरणं बदलली आहेत! खरंतर शिवसेना-भाजप यांची नैसर्गिक युती दीर्घकाळ होती. प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांनी बाळासाहेबांच्या मर्जीत राहून महाराष्ट्रात भाजपच्या वाढीचे प्रयत्न…
पुढे वाचालोकप्रतिनिधी कामाचा
संपूर्ण भारतातील नव्हे तर आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका कोणती हे आपणास माहीत आहे का? या प्रश्नाचे आपणा सर्वांना अभिमान वाटावा असे उत्तर आहे, ते म्हणजे पिंपरी-चिंचवड! ही किमया साधण्यात आणि या नगरीच्या उत्थानात सर्वाधिक योगदान देणार्या नेत्याचं नाव आहे अण्णासाहेब मगर. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या प्रांगणात त्यांचा पूर्णाकृती पुतळा आहे. 1952 साली अण्णासाहेब प्रथम आमदार म्हणून निवडून आले. त्यावेळी हा हवेली मतदारसंघ होता. अण्णासाहेबांनी आमदार झाल्यावर विविध कामांचा जो धडाका लावला त्यामुळे त्यांचे नाव जिल्ह्यात सर्वत्र पोहोचले. 1957 च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला मात्र ते खचले नाहीत. हाती घेतलेले समाजसेवेचे व्रत…
पुढे वाचाहा किस्सा खरा आहे?
आज मांडणारा किस्सा खरा आहे का? निश्चितपणे खरा आहे! अस्सल आहे! चोवीस कॅरेट सोन्यासारखा! मग कुठला आहे? म्हणजे मतदारसंघ, गाव, शहर? कुठलाही असू शकतो! त्यातल्या भावना महत्त्वाच्या! कुणाबाबतचा आहे…? त्याचेही काही नाव नाही!! आपण फारतर ‘भाऊसाहेब’ म्हणूया! भाऊ आणि साहेब ही दोन्ही विशेषणं या क्षेत्रातील मंडळींची आवडती! म्हणून आजचे नायक भाऊसाहेब! तर हे भाऊसाहेब निवडणुकीला उभे राहिले. मागच्या वेळी लोकानी मोठ्या विश्वासानं त्यांना निवडून दिलं होतं. पण यांनी काय केलं…? अनेक योजनांत गैरव्यवहार, भ्रष्टाचार! कधी मतदारसंघात फिरकले नाहीत की कधी कुणाला कसली मदत केली नाही. तरीही त्यांचा आत्मविश्वास दांडगा. यावेळी…
पुढे वाचाइंदिराजींना खडे बोल सुनावणारा नेता
राजकारण आणि समाजकारण ही एकाच गाडीची दोन चाके! पण राजकारणातून निवृत्ती घेतल्यानंतर समाजकार्यात टिकून राहणारे अपवादात्मक असतात. अशापैकी एक महत्त्वपूर्ण नाव म्हणजे मोहन धारिया! पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक ते केंद्रीय मंत्री असा अण्णांचा विलक्षण प्रवास आहे. राजकारणातून निवृत्ती घेत त्यांनी पाणी प्रश्नावर काम सुरू केलं आणि ‘वनराई’च्या माध्यमातून त्याला व्यापक स्वरूप दिलं. गावागावात त्यांनी अनेक झाडे लावली. बंधारे बांधले. पाण्याअभावी दुष्काळात होरपळणार्या अनेकांच्या आयुष्यात परिवर्तन घडवत त्यांनी हिरवीगार पालवी फोडली. स्वातंत्र्यलढ्यात योगदान देणारे धारिया 1964 ते 1971 या कालावधीत राज्यसभेवर होते. 1971 साली त्यांनी पुण्यातून काँग्रेसतर्फे लोकसभेची निवडणूक लढवली आणि त्यात…
पुढे वाचा