‘राज्याचा व्यापार म्हणजे राज्याची शोभा आहे, राज्य संपन्न व्हायचे असेल तर राज्यात व्यापार चांगल्या प्रकारे व्हायला हवेत’ हे त्याकाळी छत्रपती श्री शिवाजीमहाराजांनी सांगितले होते. ‘आज्ञापत्रा’त व्यापारविषयक धोरण सांगताना त्यांनी नोंदवून ठेवले आहे की, ‘साहुकार म्हणजे राज्याची व राजर्षिंची शोभा. परमुलखी जे जे साहुकार असतील त्यांची समाधानी करून ते आणावे. त्यांसि अनुकूल पडे तरी असतील तेथेच त्यांचे समाधान रक्षून, आपली माया त्यांस लावावी. व्यापारामुळे राज्य श्रीमान होते म्हणून राज्यात नवे व्यापार आणावेत…’ यातील ‘साहूकार’ म्हणजे ‘सावकार’ नव्हे तर व्यापारी, उद्योजक! शिवाजी महाराजांच्या या आदर्श सूचनेचा विसर पडल्याने आज राज्यातील अनेक उद्योग…
पुढे वाचाTag: dainik punya nagari
ऑपरेशन बिनविरोध
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ‘400 पार’चा नारा देत असलेल्या भाजपाने मतदानप्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वी आणि निकाल लागण्याआधीच पहिला विजय मिळवला आहे. सूरतमधील भाजपा उमेदवार मुकेश दलाल यांच्याबाबत ही घटना घडली असून त्यांचा विजय जाहीर करण्यासाठी 4 जूनची वाट पाहावी लागणार नाही. त्यामुळे यंदाचा ‘देशातील पहिला विजेता उमेदवार’ म्हणून दलाल यांची नोंद घ्यावी लागेल. त्याचे झाले असे की, येथील काँगे्रसचे उमेदवार नीलेश कुंभाणी यांनी भाजपसोबत हातमिळवणी केली. प्रदेश काँगे्रसला अंधारात ठेवत त्यांनी त्यांच्या उमेदवारी नामांकन अर्जासोबत प्रस्तावक म्हणून काँग्रेस कार्यकर्त्यांऐवजी त्यांचे मेव्हणे जगदीया सावलिया आणि उद्योगातील भागीदार धु्रविन धामोलिया व रमेश पोलरा यांची…
पुढे वाचा‘निवडणूक ही शेवटी क्रिकेटची मॅच’
होय, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे स्वतंत्र भारताच्या पहिल्या निवडणुकीत पराभूत झाले होते. त्यांचा पराभव व्हावा यासाठी काँग्रेसने जंग जंग पछाडले होते. त्यांच्या या प्रयत्नांना हिंदू महासभा आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षांनी आंबेडकरांच्या विरुद्ध उमेदवार उभे करत सहकार्य केले होते. त्यामुळे डॉ. आंबेडकर चौथ्या क्रमांकावर फेकले गेले. त्यांच्या विरोधात त्यांचेच पी.ए. नारायण एस. काजरोळकर हे काँग्रेसतर्फे निवडणूक लढवून निवडून आले. काजरोळकर यांचा दूध विक्रीचा व्यवसाय होता. त्यामुळे एका दूध विक्रेत्याने त्यांचा पराभव केला अशी चर्चा त्या काळात होती. या पराभवानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुंबई प्रांतातून राज्यसभेवर गेले. लोकसभेत जाण्याचं…
पुढे वाचाकाँग्रेसवालेच सांगताहेत, आम्हाला मत नको!
नुकतंच एक व्यंगचित्र चर्चेत आलं. एका वृत्तवाहिनीवरील राजकीय चर्चेत जाहिरातीसाठीचा ब्रेक होतो. 30 सेकंदाच्या ब्रेकनंतर निवेदक चर्चा सुरू करतो तर त्यातील सहभागी एक नेता म्हणतो की, ‘ब्रेकदरम्यान मी पुढच्या पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आमच्यात आता काही तात्त्विक वाद राहिले नाहीत. त्यांच्या ‘सर्व’ मुद्यांशी मी सहमत आहे.’ सध्याच्या राजकारणातील घडामोडी, पक्षप्रवेश, नाराजी, स्वार्थ हे सगळं पाहता अशी घटना प्रत्यक्षात घडली तरी आश्चर्य वाटू नये. असे जरी असले तरी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राजस्थानातील बांसवाडा-डुंगरपूर मतदारसंघात मात्र आणखी एक मजेशीर घटना घडली आहे. इथले काँग्रेसवाले जिवाच्या आकांताने प्रचार करत होते…
पुढे वाचासाधा माणूस…
आजकाल कोणी साधा ग्रामपंचायतीचा सदस्य असला तरी त्याचा रूबाब पाहण्यासारखा असतो. गाडी, माडी, कार्यकर्त्यांचा लवाजमा अशा थाटात तो जगत असतो. पुणे जिल्ह्यातील मंचर या गावात मात्र दंतकथा वाटावी असा एक अवलीया राहायचा. तीन वेळा आमदार, खासदार असूनही अविश्वसनीय वाटावा असा त्यांचा साधेपणा. ते आमदार असताना त्यांच्या पत्नी मथुराबाई दुष्काळी कामावर रोजंदारीने जायच्या. गोधड्या शिवून त्या विकायच्या आणि आपला प्रपंच चालवायच्या. किसणराव बाणखेलेअण्णा हे त्यांचं नाव. ते 1989च्या लोकसभा निवडणुकीमध्ये खेड लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेले. त्यापूर्वी 1972, 1980 आणि 1985च्या विधानसभा निवडणुकांमध्ये ते आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून…
पुढे वाचाइंदिरा गांधी यांची सभा झाली; पण…
शरद पवार यांच्यामुळे बारामती देशात नेहमीच केंद्रस्थानी राहिली आहे. 1980 साली विधानसभेच्या निवडणुकीत शरद पवार काँग्रेस एसचे उमेदवार होते. त्यांच्याविरूद्ध तिथून मारूतराव चोपडे यांनी काँग्रेस आयच्या वतीने लढत दिली. त्यावेळी शरद पवार बारामतीतून पडतील, असा कयास असल्याने ही निवडणूक देशपातळीवर चर्चेत आली होती. त्यावेळी प्रेमलाकाकी चव्हाण या काँग्रेस आयच्या प्रांतअध्यक्ष होत्या. प्रेमलाकाकी म्हणजे पृथ्वीराज चव्हाण यांच्या आई. भाई गुलाम अली जिल्हाध्यक्ष तर किरण गुजर हे बारामती शहराचे अध्यक्ष होते. मारूतराव चोपडे हे धनगर समाजाचे मोठे प्रस्थ होते. ‘बारामती विधानसभा मतदारसंघात या समाजाचे प्राबल्य आहे. त्यामुळे इंदिरा गांधी यांची सभा झाली…
पुढे वाचापाणीदार दम
गावात नेत्यांची सभा होती. संध्याकाळी सहाची वेळ असली तरी या नेत्याने दिलेला गुंड प्रवृत्तीचा उमेदवार आणि त्याचे काही कार्यकर्ते उत्साहात तयारी करत होते. तशी गावात या नेत्याविषयी प्रचंड नाराजी होती. निवडणुकीचा अपवाद वगळता नेते कधीही गावात फिरकत नसत. गावातले सगळे प्रश्न ‘जैसे थे’ होते. या नेत्याचे जे चार कार्यकर्ते होते त्यांचीच मनमानी चालायची. त्यांच्या दहशतीमुळे सगळे गपगार असायचे. यावेळी मात्र गावानं एकत्र येऊन ठरवलं की, काहीही झालं तरी या नेत्याच्या उमेदवाराला मत द्यायचं नाही. उमेदवार गावातलाच असल्याने तोंडदेखल हजर राहणं गरजेचं होतं. मत मात्र नाही म्हणजे नाहीच! शहरातील धरणाचं पाणी…
पुढे वाचा…आणि पवारांना तिकीट मिळाले
शरद पवार 1967 साली सर्वप्रथम वयाच्या अवघ्या 26व्या वर्षी आमदार म्हणून निवडून आले. त्यावेळी उमेदवार ठरवण्याचा आणि तो जाहीर करण्याचा अधिकार काँगेस वर्किंग कमिटीच्या अध्यक्षांचा असायचा. प्रदेशाध्यक्ष विनायकराव पाटील यांनी शरद पवार यांना निवडणूक लढवण्याची विचारणा केली. त्यावेळी पवार युवक काँग्रेसचे काम सक्रियपणे करायचे. पवारांची उमेदवारी जाहीर होताच त्यांना बारामतीतून कडाडून विरोध झाला. सगळ्या ज्येष्ठ मंडळींनी सांगितलं, “आम्ही 12 उमेदवार इथून इच्छुक आहोत. आमच्यापैकी कुणालाही उमेदवारी दिली तरी त्याला आम्ही निवडून आणू पण अतिशय नवख्या आणि अनअनुभवी असलेल्या शरदला उमेदवारी दिली तर आम्ही त्याला पाडू!” या सगळ्या ज्येष्ठांनी एकत्र येत…
पुढे वाचा