इलेक्शनचे किस्से लिहिताना नेत्यांचे काही धमाल किस्से मांडणंही गरजेचं आहे. बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांचं नाव सिमेंट घोटाळ्यात आल्यानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला. त्यांच्या जागी कोणाची वर्णी लागणार याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. वसंतदादा पाटील, प्रतिभाताई पाटील हे मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदात दिल्लीत ठाण मांडून बसले होते. अशा परिस्थितीत महाराष्ट्राला मराठा नेतृत्व मिळावं अशी इंदिरा गांधी यांची इच्छा होती. सातार्याच्या अभयसिंहराजे भोसले यांचं नाव त्यांना अपेक्षित होतं पण चुकून त्यांनी बाबासाहेब भोसले यांचं नाव पुढे केलं असं सांगितलं जातं. मुख्यमंत्रीपदी बाबासाहेब भोसले यांचं नाव जाहीर होताच त्यांचा स्वतःचाही त्यावर विश्वास बसला नव्हता.…
पुढे वाचाTag: kissa e election by ghanshyam patil
देशाचा कंठमणी
संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन ऐन भरात होतं. आचार्य अत्रे, सेनापती बापट यांनी मराठी माणसाच्या मनात स्फुल्लिंग चेतवलं होतं. अशावेळी यशवंतराव चव्हाण यांच्यासारख्या बड्या नेत्यानं मात्र ‘महाराष्ट्रापेक्षा नेहरू मोठे’ असं म्हणत महाराष्ट्राचे तुकडे करू पाहणार्यांना साथ दिली होती. हे सगळं घडत असताना एक तोफ सभागृहात धडधडली. भाषावार प्रांतरचनेवरून ते नाराज होते. नरराक्षस मोरारजी देसाई यांच्या आदेशानं सरकारनं मुंबईत जो गोळीबार केला होता त्याच्या चौकशीला नकार देणं त्यांना लोकशाहीविरोधी कृत्य वाटत होतं. मुंबई केंद्रशासित करण्याच्या कल्पनेला प्रखर विरोध करत त्यांनी राजीनामा दिला. या धाडसी नेत्याचं नाव सी. डी. अर्थात चिंतामणराव देशमुख. सीडींनी राजीनामा…
पुढे वाचासबसे बडा खिलाडी
‘सबसे बडा खिलाडी’ अशी ओळख असलेल्या सुरेश कलमाडी यांनी 1995 ते 2007 पर्यंत पुण्याच्या विकासात मोठं योगदान दिलं. पुढे पुण्यात कॉमनवेल्थ स्पर्धेत त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. नऊ महिने तिहार तुरूंगात काढावी लागली आणि पुण्यातील ‘कलमाडी पर्व’ लयास गेलं. इतकंच नाही तर तेव्हापासून पुण्यातील काँग्रेस पक्षाचं अस्तित्वही संपुष्टात आलं. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार कलमाडींची एक आठवण सांगतात. उल्हासदादा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष होते. त्यावेळी पुण्याचं शहराध्यक्षपद सुरेश कलमाडी यांना मिळावं, अशी शरद पवार यांची इच्छा होती. पवारसाहेबांनी उल्हासदादांना हे सांगितलं. मात्र ‘तो पक्षात अजून नवीन आहे, त्याला काम करू…
पुढे वाचाकलरफुल नेता
काँग्रेस पक्षात श्रेष्ठींपुढे स्वतःचे मत ठामपणे मांडू शकणार्या मोजक्या नेत्यांपैकी एक म्हणजे वसंत साठे. मुळचे नाशिकचे असलेले वसंतराव साठे वयाच्या सतराव्या वर्षी स्वातंत्र्य आंदोलनात सहभागी झाले. प्रजा सोशालिस्ट पार्टीकडून त्यांनी त्यांच्या राजकीय प्रवासाला सुरूवात केली. महाराष्ट्र राज्याच्या स्थापना वर्षात म्हणजे 1960 साली त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि काँग्रेसशी कायम एकनिष्ठ राहिले. इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या मंत्रीमंडळात त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले. अकोल्यातून ते खासदार म्हणून निवडून गेले. काँग्रेस पक्षाला ‘हात’ हे निवडणूक चिन्ह मिळवून देण्यात या मराठमोळ्या नेत्याचा मोठा वाटा आहे. इंदिरा गांधी यांचे अत्यंत विश्वासू सहकारी असलेल्या साठे…
पुढे वाचाकाँग्रेसवालेच सांगताहेत, आम्हाला मत नको!
नुकतंच एक व्यंगचित्र चर्चेत आलं. एका वृत्तवाहिनीवरील राजकीय चर्चेत जाहिरातीसाठीचा ब्रेक होतो. 30 सेकंदाच्या ब्रेकनंतर निवेदक चर्चा सुरू करतो तर त्यातील सहभागी एक नेता म्हणतो की, ‘ब्रेकदरम्यान मी पुढच्या पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आमच्यात आता काही तात्त्विक वाद राहिले नाहीत. त्यांच्या ‘सर्व’ मुद्यांशी मी सहमत आहे.’ सध्याच्या राजकारणातील घडामोडी, पक्षप्रवेश, नाराजी, स्वार्थ हे सगळं पाहता अशी घटना प्रत्यक्षात घडली तरी आश्चर्य वाटू नये. असे जरी असले तरी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राजस्थानातील बांसवाडा-डुंगरपूर मतदारसंघात मात्र आणखी एक मजेशीर घटना घडली आहे. इथले काँग्रेसवाले जिवाच्या आकांताने प्रचार करत होते…
पुढे वाचादोन अन दोन किती?
महाराष्ट्राची धडाडती तोफ अशी ओळख असलेल्या एका युवा नेत्याची पुण्यात सभा होती. त्यांच्या सभांना अलोट गर्दी असायची. व्यासपीठावर ‘सर’ अशी ख्याती असलेले ज्येष्ठ नेते उपस्थित होते. युवा नेत्याने सभेच्या सुरूवातीलाच एक किस्सा सांगितला. तो सांगताना त्यांनी संबंधित प्रत्येक नेत्याच्या आवाजाची, लकबीची हुबेहुब नक्कल केली. ते म्हणाले, ‘‘पुण्यातला एक पत्रकार दिल्लीत गेला. त्याला वाटलं आपण राजधानीच्या शहरात आलोय तर काही नेत्यांच्या मुलाखती घेऊया! तो सर्वप्रथम सोनिया गांधी यांच्या 10 जनपथवर गेला. मोठ्या मुश्किलीने त्याने तिथे युवा नेते असलेल्या राहुल गांधी यांची मुलाखतीसाठी वेळ मिळवली. त्याने त्यांना एकच प्रश्न विचारला, ‘‘राहुलजी, दो…
पुढे वाचाफाईल आणि दादूमियाँ : किस्सा-ए-इलेक्शन – घनश्याम पाटील
दादूमियाँ उर्फ दामोदर विष्णू नेने हे बडोद्यातील एक मोठं प्रस्थ. स्तंभलेखक म्हणून त्यांची ओळख आहे. इंदिरा गांधी यांचं पहिलं चरित्र त्यांनी लिहिलं. नरेंद्र मोदी दादूमियाँच्या घरी येणार्या पाहुण्यांच्या मदतीसाठी स्वयंसेवक म्हणून काम करायचे. मध्यंतरी ते पुण्यात एमआयटीने आयोजित केलेल्या ऋषिपूजनाच्या कार्यक्रमासाठी आले होते. नव्वदीच्या पुढे वय असूनही त्यांच्या चेहर्यावरील विद्वत्तेचं तेज विलक्षण आहे. त्यांनी एक किस्सा सांगितला.
पुढे वाचा