परभणी जिल्ह्यातलं कडोली हे एक छोटंसं गाव. या गावात जन्मलेल्या नानाजी देशमुख यांचं शिक्षण राजस्थानातील सिकर येथे झालं आणि गोळवलकर गुरुजींच्या सूचनेनुसार ते उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे संघप्रचारक म्हणून गेले. बलरामपूर लोकसभा मतदारसंघातून ते खासदार म्हणून निवडून गेले. पहिले ग्रामीण विद्यापीठ स्थापन करणार्या मराठमोळ्या नानाजींना ‘भारतरत्न’ या सर्वोच्च सन्मानानं गौरविण्यात आलं. 1999 ते 2005 या कालावधीत ते राज्यसभा सदस्य होते. उत्तर प्रदेशातील खेडी स्वयंपूर्ण होण्यासाठी त्यांनी योगदान दिलं. अणीबाणीनंतर 1977 साली बलरामपूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक होती. नानाजी तुरूंगात बंदिस्त होते. नानाजींचे जवळचे स्नेही रामकृपाल शुक्ल म्हणतात, ‘अणीबाणीच्या काळात नानाजींनी भूमिगत…
पुढे वाचाTag: Ghanshyam patil lekhmala
इंदापुरातील पाटील निवाडा
इंदापूर येथील कर्मयोगी शंकरराव बाजीराव पाटील हे 1980 आणि 1989 ला बारामती लोकसभा मतदारसंघाचे खासदार होते. 1952 ते 1978 अशी 26 वर्षे ते इंदापूरचे आमदार होते. यशवंतराव चव्हाण यांच्या मंत्रीमंडळात त्यांचा दुग्धव्यवसाय व मत्स्यपालन खात्याचे उपमंत्री म्हणून समावेश झाला. त्यातूनच त्यांनी महाराष्ट्रात दूध सोसाट्यांचे जाळे निर्माण केले. सहकारी साखर कारखाना व कामगारांत त्यांनी यशस्वी चर्चा घडवून आणली. त्याला ‘पाटील निवाडा’ म्हणून मान्यता मिळाली. सहकारी संस्था, विविध कार्यकारी सोसायट्या, शैक्षणिक संस्थांची उभारणी अशा कामांना त्यांनी प्रोत्साहन दिले. बावडा या गावात महाशिवरात्रीच्या दिवशी जन्म झाल्याने त्यांचे नाव ‘शंकर’ असे ठेवण्यात आले मात्र…
पुढे वाचाइंदिराजींना खडे बोल सुनावणारा नेता
राजकारण आणि समाजकारण ही एकाच गाडीची दोन चाके! पण राजकारणातून निवृत्ती घेतल्यानंतर समाजकार्यात टिकून राहणारे अपवादात्मक असतात. अशापैकी एक महत्त्वपूर्ण नाव म्हणजे मोहन धारिया! पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक ते केंद्रीय मंत्री असा अण्णांचा विलक्षण प्रवास आहे. राजकारणातून निवृत्ती घेत त्यांनी पाणी प्रश्नावर काम सुरू केलं आणि ‘वनराई’च्या माध्यमातून त्याला व्यापक स्वरूप दिलं. गावागावात त्यांनी अनेक झाडे लावली. बंधारे बांधले. पाण्याअभावी दुष्काळात होरपळणार्या अनेकांच्या आयुष्यात परिवर्तन घडवत त्यांनी हिरवीगार पालवी फोडली. स्वातंत्र्यलढ्यात योगदान देणारे धारिया 1964 ते 1971 या कालावधीत राज्यसभेवर होते. 1971 साली त्यांनी पुण्यातून काँग्रेसतर्फे लोकसभेची निवडणूक लढवली आणि त्यात…
पुढे वाचातुरूंगातून लढत मिळवला त्रिवेणी विजय
हैदराबाद मुक्तिसंग्रामाचा लढा आपल्यापैकी अनेकांना ज्ञात आहे. हैदराबाद राज्यातील निजामांच्या सरकारी धोरणांना विरोध करणारे कम्युनिस्ट नेते म्हणजे पेंड्याला राघव. त्यांनी अस्पृशता, महिलांवर होणारे अत्याचार याविरूद्ध आवाज उठवला. तेलंगणातील शेतकर्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी त्यांनी संघर्ष उभारला. सरकारविरोधी भूमिका घेतली म्हणून हैदराबाद पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली आणि त्यांना तुरूंगात डांबले. ते वर्ष होते 1952 चे. त्यावर्षी तिथे लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र आल्या होत्या. राघव यांनी विधानसभा आणि लोकसभेसाठी तीन मतदारसंघातून अर्ज भरले. तुरूंगातूनच त्यांनी निवडणूक लढवली आणि या तीनही मतदारसंघातून विजय मिळवला.
पुढे वाचाऑपरेशन बिनविरोध
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ‘400 पार’चा नारा देत असलेल्या भाजपाने मतदानप्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वी आणि निकाल लागण्याआधीच पहिला विजय मिळवला आहे. सूरतमधील भाजपा उमेदवार मुकेश दलाल यांच्याबाबत ही घटना घडली असून त्यांचा विजय जाहीर करण्यासाठी 4 जूनची वाट पाहावी लागणार नाही. त्यामुळे यंदाचा ‘देशातील पहिला विजेता उमेदवार’ म्हणून दलाल यांची नोंद घ्यावी लागेल. त्याचे झाले असे की, येथील काँगे्रसचे उमेदवार नीलेश कुंभाणी यांनी भाजपसोबत हातमिळवणी केली. प्रदेश काँगे्रसला अंधारात ठेवत त्यांनी त्यांच्या उमेदवारी नामांकन अर्जासोबत प्रस्तावक म्हणून काँग्रेस कार्यकर्त्यांऐवजी त्यांचे मेव्हणे जगदीया सावलिया आणि उद्योगातील भागीदार धु्रविन धामोलिया व रमेश पोलरा यांची…
पुढे वाचामामुली लोक काय बिघडवणार?
स्वर्गीय विलासराव देशमुख हे महाराष्ट्राच्या, देशाच्या राजकारणातलं एक मोठं प्रस्थ. अत्यंत सुसंस्कृत, प्रगल्भ आणि लोकहितदक्ष नेते म्हणून त्यांची ख्याती आहे. बाभळगावच्या सरपंचपदापासून आपली कारकिर्द सुरू करणारे विलासराव दीर्घकाळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. सरदार मनमोहन सिंग यांच्या मंत्रीमंडळात त्यांनी अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम खात्याचे मंत्री म्हणून काम केले. लोकांच्या सुख-दुःखाची जाण असलेले आणि जनसामान्यांची नाडी अचूकपणे हेरणारे विलासराव 1995 साली लातूरमधून 32 हजार मतांनी पराभूत झाले होते. लातूर शहर आणि ग्रामीण हा मतदारसंघ त्यांचा बालेकिल्ला असूनही जनता दलाच्या शिवाजीराव पाटील कव्हेकर यांच्या विरूद्ध त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. या पराभवामागे एक…
पुढे वाचाफाईल आणि दादूमियाँ : किस्सा-ए-इलेक्शन – घनश्याम पाटील
दादूमियाँ उर्फ दामोदर विष्णू नेने हे बडोद्यातील एक मोठं प्रस्थ. स्तंभलेखक म्हणून त्यांची ओळख आहे. इंदिरा गांधी यांचं पहिलं चरित्र त्यांनी लिहिलं. नरेंद्र मोदी दादूमियाँच्या घरी येणार्या पाहुण्यांच्या मदतीसाठी स्वयंसेवक म्हणून काम करायचे. मध्यंतरी ते पुण्यात एमआयटीने आयोजित केलेल्या ऋषिपूजनाच्या कार्यक्रमासाठी आले होते. नव्वदीच्या पुढे वय असूनही त्यांच्या चेहर्यावरील विद्वत्तेचं तेज विलक्षण आहे. त्यांनी एक किस्सा सांगितला.
पुढे वाचा