आपल्याला आयुष्यात अनेक सुखद, दु:खद, चांगले, वाईट, हवेसे, नकोसे धक्के बसतच असतात. काही व्यक्तिगत असतात व काही सामाजिक व राजकीय असतात. सामाजिक व राजकीय हे आपल्याला जरी धक्के वाटत असले तरी ते बरेचसे पूर्वनियोजित कवा प्रयत्नपूर्वक असतात. हा एक डावपेचांचा भाग असतो. धकाधकीचे जीवन हा शब्द ‘धक्का’ यावरूनच आला असावा. मुंबईकरांना तर धक्का हा रोजच्या जीवनातला अविभाज्य घटक बनला आहे. मोकळ्या लोकल कवा बेस्ट बसमधून प्रवास करताना चुकल्यासारखेच होत असेल. धक्क्याला लागणे असाही एक वाक्प्रचार वेगळ्या अर्थाने रूढ आहे. जहाजे कवा गलबते, छोट्या होड्या यांच्या जाण्या-येण्याच्या काठाला सुद्धा ‘धक्का’ असेच…
पुढे वाचा