भारतीय चित्रपटसृष्टीत, संगीत क्षेत्रात प्ले बॅक सिंगर आणि संगीतकार म्हणून काम करतोय. 25 जुलै 1994 रोजी जन्म झाला. वयाच्या 9व्या वर्षी माझ्या आईने माझ्यातील कलाकाराला ओळखले कारण रेडिओवर दुरून जरी एखादं गाणं ऐकु आलं तरीही ते कान देऊन ऐकायचो. त्यात तल्लीन होऊन जायचो. घरातले डब्बे, दरवाजे, टेबल जे मिळेल त्यावर मी ठेका धरत असे त्यामुळे आईने मला गाण्याच्या क्लासला घातले. जसजसं वय वाढत गेलं तसातसा माझा गाण्याचा अभ्यास आणि रूची वाढत गेली. इंजिनीअरिंगचं धावपळीचं शेड्युल सांभाळून मी रियाज करायचो.
पुढे वाचा