..पण लक्षात कोण घेतो? कोर्स करेक्शन केले जाईल? -प्रा. दिलीप फडके

हा लेख प्रसिद्ध होईल तेव्हा लोकसभेच्या निवडणुकांचे निकाल लागून जवळपास महिना झालेला असेल. ‘चार सौ पार’चा नारा देणारा भाजपा साधे बहुमत देखील मिळवू शकला नाही पण एनडीएमधल्या घटक पक्षांच्या साहाय्याने बहुमत मिळवून नरेंद्र मोदी तिसर्‍यांदा सत्तेवर आले हे देखील आता जुने झाले. उत्तर प्रदेश, राजस्थान, बंगाल, महाराष्ट्र ह्या राज्यांमध्ये भाजपाचे पानिपत झाले ही गोष्ट देखील आता जुनी झाली. हे असे का झाले आणि यातून भाजपा कोणता बोध घेणार आहे यावर बरीच चर्चा होते आहे. कुणी घटनादुरुस्ती…. मागासवर्गीयांचे आरक्षण रद्द होणार अशी आवई उठवली गेली याला दोष देतोय तर कुणी अल्पसंख्यांकांनी…

पुढे वाचा

माझेच काम पाहा!

जवाहरलाल नेहरू यांचा त्या काळी विलक्षण करिष्मा होता. त्यांच्या लोकप्रियतेमुळे ते जगभर तळपत होते. 1964 च्या जानेवारी महिन्यात भुवनेश्वर येथे एकाएकी ते खूप आजारी पडले. डॉक्टरांनी त्यांच्या हालचालीवर पूर्ण बंदी आणली होती. स्वाभाविकच त्यावेळी सगळ्यांना प्रश्न पडला की, आता नेहरूनंतर कोण? त्यांची विश्रांती सुरू असताना लालबहाद्दूर शास्त्री यांनी त्यांना विचारले, ‘‘आता मी कोणते काम पाहू?’’ त्यावर क्षणाचाही विलंब न करता नेहरू म्हणाले, ‘‘तुम्ही माझेच काम पाहा!’’ तिथेच शास्त्रीजींच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब झाले होते. जवाहरलालजींचा आदेश मानून 24 जानेवारी 1964 पासून लालबहाद्दूर बिगरखात्याचे मंत्री म्हणून काम पाहू लागले. खरंतर लालबहाद्दूर यांचं आडनाव…

पुढे वाचा