अनोख्या रेशीम गाठी: सकारात्मक, क्रांतिकारी कथानक!

लिव्ह इन रिलेशनशिप ही येऊ पाहणारी व्यवस्था अनेकांना न पटणारी आहे. अर्थात त्यांचा विरोध तसा दुर्लक्षित न करता येण्यासारखा आहे कारण जगात आपल्या संस्कृतीला एक आदराचे, वैशिष्ट्यपूर्ण स्थान आहे. परंतु जेव्हा दुर्दैवाने साथीदार सोडून जातो तेव्हा होणारी मानसिक, शारीरिक घुसमट ही ज्यावर एकटे राहण्याची वेळ येते तेच जाणोत.

पुढे वाचा

सच्चाई आणि अच्छाई जपणारे मित्र

सच्चाई आणि अच्छाई जपणारे मित्र

पुढती पुढती पुढती… सदैव होईजे प्रगती! ही गोष्ट आहे ऑक्टोबर 2016 ची. ‘चपराक’ दिवाळी अंकाचं काम संपवून पुढच्या साहित्य महोत्सवाच्या तयारीत व्यग्र होतो. ‘चपराक’चं कार्यालय तेव्हा शुक्रवार पेठेतील छत्रपती शाहू चौकात होतं. महोत्सवात ज्यांची पुस्तकं प्रकाशित करणार असं जाहीर केलं होतं त्या लेखकांची तिथं दिवसरात्र गजबज असायची. आमच्या कार्यालयात विविध क्षेत्रातील मान्यवरांची इतकी ये-जा असते की जणू हे महाराष्ट्रातलं एक प्रमुख साहित्यिक, सांस्कृतिक केंद्रच असावं. एक पुस्तक छपाईला द्यायचं म्हणून त्यावर शेवटची नजर टाकत होतो आणि फोन वाजला.

पुढे वाचा

विद्येच्या देवतेचा वाचनसंदेश

विद्येच्या देवतेचा वाचनसंदेश

आज गणेश चतुर्थी. ह्या दिवशी आपण घरोघरी पार्थिव गणपतीचे पूजन करतो. त्याच्यापुढे छान आरास करतो. आपल्यातील कलागुणांना वाव देतो! परंतु ह्यावर्षी मार्च महिन्यापासून कोरोना ह्या विषाणूमुळे जगभर अगदी हाहा:कार माजवला आहे. लॉकडाऊनमुळे सगळे जग कसे ठप्प झाले आहे. महाराष्ट्रात तर ह्या विषाणूने कहरच केला आहे. गेले पाच-सहा महिने झाले सगळे व्यवहार बंद होते. सगळ्यांच्या अंगात आणि मनात नकारात्मकता भरली आहे. ह्या सगळ्या नकारात्मकतेत गणपती बाप्पाच्या आगमनाने मनाला आता कुठे थोडीशी उभारी आली आहे. सगळ्यांचा उत्साह वाढला आहे. त्यात सगळीकडे छान पाऊसही झाला आहे. सगळी धरणे ओसंडून वाहिली आहेत. अर्थात काही…

पुढे वाचा

अन मी पोरका झालो

अन मी पोरका झालो

२२ मार्च २०२०, रात्रीचे दहा वाजले होते, नुकतीच आमची जेवणे उरकली होती. मी आणि बायको वंदना दूरदर्शनवरील बातम्या बघत बसलो होतो. कोरोना विषाणूचा जगभर जोमाने पसरत चाललेला प्रादुर्भाव व त्या संदर्भातील बातम्या ऐकून थोडेसे धास्तावल्या सारखे झाले होते. कालच जनता कर्फ्यू होऊन गेलेला होता. त्यामुळे सगळीकडे जरासे चिंतेचेच वातावरण पसरलेले होते.

पुढे वाचा

आगीतून उठून फुफाट्यात!

आगीतून उठून फुफाट्यात!

आकुर्डीच्या कंपनीतील नोकरी मी सलग पाच वर्षे केली परंतु रोज 70-80 किलोमीटर मोटरसायकलचा प्रवास मला नंतर नंतर पाठदुखीने त्रस्त करू लागल्यामुळे मी पुण्यातल्या संगम पुलाजवळील एका पॅकेजिंग मशीन बनवणार्‍या कंपनीत 1994 च्या सप्टेंबरला रुजू झालो. चांगला दीड वर्ष म्हणजे 1996 पर्यंत मस्त रुळलो होतो. मस्त मजेत चालले होते सगळे. नुकताच कुठे माझा जम ह्या कंपनीत बसू लागला होता. कलकत्ता, दिल्ली, चंडीगड अशी महाराष्ट्रभर माझी फिरतीही चालू होती.

पुढे वाचा

1984, सुरूच न होता संपलेली प्रेमकहाणी!

1984, सुरूच न होता संपलेली प्रेमकहाणी!

1984 ला लॉ कॉलेजमध्ये पहिल्या वर्षात शिकत होतो तेव्हाची ही गोष्ट. मी आणि माझा एक मित्र त्याच्या स्कूटरवरून एका गुरवारी लॉ कॉलेजवरून परत येता येता गरवारे कॉलेजवरून येत होतो. खंडूजी बाबा चौकातून पुढे गरवारे पुलावरून जात असताना, माझ्या मित्राला सायकलवरून चाललेली एक मुलगी खूप आवडली आणि तो मला म्हणाला ‘‘रव्या तिला आपण तिचे नाव विचारायचे का?’’

पुढे वाचा

चीनची सफर

चीनची सफर

2009 च्या ऑक्टोबरमध्ये मला चायनाला कंपनीच्या एका कामासाठी महिनाभरासाठी जाण्याचा योग आला होता. चिंदाव ह्या उत्तर चायनामधील शहरातील एका शैक्षणिक विद्यापीठाबरोबर करार करून काही विशिष्ट कौशल्य ह्या चायनीज मुलांना शिकवण्याचा हा करार होता.

पुढे वाचा

गुरुत्वाकर्षण

गुरुत्वाकर्षण

आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला वेगवेगळे लोक, मार्गदर्शक, सल्लागार, मित्र, मैत्रिणी, सहकारी, नातेवाईक, आप्तेष्ट, वाचक, रसिक, विरोधक, निंदक ह्या रुपात भेटत असतात. हेच ते आपले खरे गुरु असतात. यंदाच्या गुरूपौर्णिमेनिमित्त मला लाभलेल्या ह्या गुरूंची आठवण झाली व अतिशय कृतज्ञपणे मला ह्या लेखाद्वारे माझी गुरुदक्षिणा अर्पण करावीशी वाटली. आयुष्यात मला लाभलेल्या ह्या गुरुंबद्दल मला कायमच आकषर्ण वाटले आहे. गुरुत्वाकर्षण म्हणा हवे तर!

पुढे वाचा

वेश्यामंदिरातील एक तास

वेश्यामंदिरातील एक तास

1980 चा तो काळ. तेव्हा मी अवघा 17 वर्षांचा होतो. त्यावेळेस मी आमच्या ओळखीच्यांच्या, डेक्कन बस स्थानकाच्या पाठीमागील एका फोटो स्टुडिओत अर्धवेळ काम करायचो. तिथेच माझी आणि हर्षदची ओळख झाली. एक दिवस संध्याकाळी आमचे काम संपल्यावर हर्षद मला म्हणाला; ‘‘रव्या, चल तुला एक गंमत दाखवतो,’’ असे म्हणून तो मला समाधान हॉटेलच्या मागच्या एका गल्लीत घेवून गेला. आजवर मी ह्या बाजूला कधी फिरकलोच नव्हतो त्यामुळे आपण कुठे चाललो आहोत हे मला कळतच नव्हते. पूर्ण अनभिज्ञ होतो मी ह्या सगळ्यापासून आणि ते समजून घेण्याचे माझे वयही नव्हते हो! रस्त्याच्या दुतर्फा दोन मजली…

पुढे वाचा

भूखंड खरेदीचा कानाला खडा

भूखंड खरेदीचा कानाला खडा

ह्या गोष्टीला आता 15 वर्षे झाली असतील. अचानक मला माझ्या एका भूखंड व्यवहाराची आठवण झाली व तो एक विलक्षण अनुभव शब्दबद्ध करावासा वाटला कारण आपल्या प्रारब्धात जे असते तेच घडते. ते कसे… 2003ला मी पुण्यातल्याच एका छोट्याशा कारखान्यात नोकरी करत असताना काहीसे वेगळे करायची इच्छा होती आणि सहज विचार करता करता माझ्या सुपिक डोक्यात एक कल्पना आली की आमच्या शेजारचा भूखंड सद्य स्थितीत असलेल्या घरासहित विकत घ्यावा व त्याचे रुपांतर एका हॉस्टेलमध्ये करावे किंवा अगदीच काही नाही झाले तर भाड्याने देऊन त्यातून उत्पन्न घ्यावे. हे सगळे डोक्यात यायचे कारण आमच्या…

पुढे वाचा