एक मुलाखत

एक मुलाखत - रविंद्र कामठे यांचा लेख.

1989 चा तो काळ होता. म्हणजे त्याला आज जवळ-जवळ 30 वर्षे झालीत. तरीही असं वाटतंय की हे सगळं अगदी काल-परवाच घडलंय की काय! हो, अगदी खरं आहे हे. हे माझ्याच नाही तर तुमच्या सुद्धा बाबतीत असंच काहीसं घडलेलं असणार, घडत असणार. मी फक्त मन मोकळं करून हे अनुभव शब्दबद्ध करून माझ्या ह्या अविस्मरणीय स्मृतींचा हा अनमोल ठेवा जतन करण्याचा एक छोटासा प्रयत्न करतोय. तसेच त्यानिमित्ताने तुम्हा रसिक वाचकांशी संवाद साधण्याचे हे एक उत्तम असे साधन समजतोय. चूक भूल माफ असावी! आकुर्डीतील एका खाजगी कंपनीमध्ये 1989-1994 ह्या काळात मी कामाला होतो.…

पुढे वाचा

पहिली नोकरी

अनुभवाच्या शिदोरीतून- पहिली नोकरी

मी गरवारे महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेचा विद्यार्थी. त्यातल्या त्यात सोपे जावे म्हणून वाणिज्य शाखा निवडलेली आणि चक्क पहिल्याच प्रयत्नांत पासही झालेलो! म्हणजे तसे काही फार चांगले मार्क नव्हते मिळाले पण साधारण 55% वगैरे असतील. माझ्या मानाने आणि मी केलेल्या अभ्यासावरून हे सुद्धा मला अमंळ जास्तच वाटले होते हो! फार खोलात जावून मी अभ्यास कसा केला आणि किती केला असले प्रश्‍न विचारू नका, कारण आता ह्या गोष्टीला जवळ-जवळ 35 वर्षे होवून गेलीत. आमच्या काळात शिक्षणाला महत्त्व की काय ते नुकतेच कुठे यायला लागले होते एवढेच. आमच्या आख्ख्या खानदानात मी म्हणे पहिला-वहिला पदवीधर…

पुढे वाचा

प्रवास चंद्रपूरचा

अनुभवाच्या शिदोरीतून

साधारण 1989-1994 ह्या पाच वर्षांचा तो काळ! काल अगदी सहज माझ्या स्मृतीपटलावर तरळून गेला. एखादी जुनी चित्रफितच मी पाहतो आहे की काय इतका तो काळ माझ्या नजरेसमोर अगदी काल-परवा घडल्याप्रमाणे एकेका प्रसंगाची आठवण करून देत होता. खूप कष्टाचे पण आयुष्यातील मोलाचे असे ते सर्व अविस्मरणीय क्षण आजही आठवले तरी अंगावर रोमांच उभे राहतात आणि ह्या आठवणींमध्ये रमून जायला होते. 1989 साली मी आकुर्डी येथील एका खाजगी कंपनीमध्ये सहाय्यक विपन्नन अधिकारी पदावर रुजू झालो होतो. मी रहायला धनकवडीला आणि कंपनी आकुर्डीला. त्यात कंपनीची बस नव्हती आणि येण्याजाण्याची सोय आपली आपण करायची…

पुढे वाचा

आयुष्यावर बोलतो काही!

जगण्यासाठी मरतो कशाला, मरण्यासाठीच जगणे हे कर्म तू करीत रहा, फळ ज्याचे त्यातच आहे नको करूस क्रोध त्रागा, जो तुलाच तुझ्यापासून दुरावेल तू तुझाच आहेस, परंतु सर्वांना हवा आहेस दु:ख हे सर्वांनाच असते, नाही त्यातून तुझी सुटका दु:खातही सुख शोधावे, हेच जीवनाचे सार्थक आहे

पुढे वाचा