निजात्मप्राप्ती साधावी!

निजात्मप्राप्ती साधावी!

बालपणापासूनच माझ्या घरात संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला रामरक्षा म्हणण्याची पद्धत होती. त्यातून मनाला एक वेगळ्या प्रकारची शांती मिळत असे. रोज कानी पडणार्‍या त्या सात्त्विक शब्दांमुळे वाणी शुद्ध होत असे. ही पद्धत वर्षानुवर्षे आमच्या घरात चालू होती.

पुढे वाचा

सद्गुरू… सौख्याचा सागरू!

सद्गुरू... सौख्याचा सागरू!

एखादं बाळ जन्माला आल्यावर जेव्हा त्याच्या पाठीत बळ येतं, तेव्हा ते पालथं पडतं. मग काही दिवसांनी त्याच्या हातात बळ आलं की ते रांगायला लागतं… आणि कालांतरानं त्या बाळाच्या पायात बळ येतं तेव्हा ते चालायला शिकतं. त्यावेळी ते बाळ आपलं पहिलं पाऊल आपल्या आईच्या साक्षीनं टाकतं!

पुढे वाचा

यशाची केमिस्ट्री शिकवणारे शिंदे गुरुजी

यशाची केमिस्ट्री शिकवणारे शिंदे गुरुजी

इसवी सन 2000 साली माझे बारावीचे शिक्षण पूर्ण झाले. बारावी हा करिअर आणि शैक्षणिक आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा टर्निंग पॉईंट असतो. बारावीच्या शिक्षणाला सुरुवात ही साधारणतः वयाच्या सोळाव्या वर्षी होते. आपण सोळावे वर्ष हे धोक्याचे वर्ष मानतो कारण हे वर्ष तारुण्याच्या प्रदार्पणाचे वर्ष मानले जाते.

पुढे वाचा

पतंगे गुरूजी

पतंगे गुरूजी

माणसाच्या आयुष्यात शालेय जिवनातील संस्काराचे महत्त्व असतेच. माझे बहुतांश आयुष्य ग्रामीण भागात गेले. जुन्या निलंगा आणि नवीन शिरूर अनंतपाळ तालुक्यातील येरोळ हे आमचे गांव.

पुढे वाचा

गुरुत्वाकर्षण

गुरुत्वाकर्षण

आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला वेगवेगळे लोक, मार्गदर्शक, सल्लागार, मित्र, मैत्रिणी, सहकारी, नातेवाईक, आप्तेष्ट, वाचक, रसिक, विरोधक, निंदक ह्या रुपात भेटत असतात. हेच ते आपले खरे गुरु असतात. यंदाच्या गुरूपौर्णिमेनिमित्त मला लाभलेल्या ह्या गुरूंची आठवण झाली व अतिशय कृतज्ञपणे मला ह्या लेखाद्वारे माझी गुरुदक्षिणा अर्पण करावीशी वाटली. आयुष्यात मला लाभलेल्या ह्या गुरुंबद्दल मला कायमच आकषर्ण वाटले आहे. गुरुत्वाकर्षण म्हणा हवे तर!

पुढे वाचा

गुरू हा संतकुळीचा राजा

गुरू हा संतकुळीचा राजा

गुरू हा फारच भव्य, व्यापक, उदात्त आणि आदर्श शब्द आहे. त्यामानाने शिक्षक हा मर्यादित अर्थ असणारा व्यवहारी शब्द आहे. भारतीय संस्कृतीच्या संदर्भात गुरू हा शब्द बहुधा आध्यात्मिक अर्थाने वापरला जातो. ‘गुरूवीण उनभव कैसा कळे?’ असा प्रश्‍न संत ज्ञानेश्‍वर माऊलींनी विचारलेला आहे. अर्थात गुरूशिवाय आध्यत्मिक अनुभव येणार नाही असा त्याचा अर्थ आहे. आध्यात्मिक गुरूंना सद्गुरू असेही म्हणतात. या आध्यत्मिक गुरूंचे किंवा सद्गुरूंचे माहात्म्य संतसाहित्यात आपणास पानापानांवर असलेले दिसून येते. भारतीय आध्यात्मिक क्षेत्रात अशा गुरूशिष्यांच्या शतावधी परंपरा आणि जोड्या असलेल्या आपणास दिसतात.

पुढे वाचा

माझा जगावेगळा सद्गुरू, माझा सखा श्रीहरी!

माझा जगावेगळा सद्गुरू, माझा सखा श्रीहरी!

मागच्या काही वर्षापासून माझे बाबा सतत सुचवताहेत की, ‘‘ताई, वयाच्या या टप्प्यावर तू आता एखादा गुरू कर!’’ त्यांचं मन राखण्यासाठी मी त्यांना ‘हो’ म्हणत वेळ मारून नेते; पण मग विचार करत राहते की, खरं तर आई ही मुलाचा पहिला गुरू असते मात्र त्यानंतर सांगायचं तर माझा सुपुत्र श्रीहरी हाच माझा गुरू आहे. त्यानंच मला खरं जगणं शिकवलं, आयुष्याचा सुदंर अर्थ दाखवून दिला. फक्त आणि फक्त त्याच्यामुळेच आज मी इतकं मोठं शिवधनुष्य पेलण्याचं धाडस करू शकले.

पुढे वाचा