पर्मनंट माजी मुख्यमंत्री

इलेक्शनचे किस्से लिहिताना नेत्यांचे काही धमाल किस्से मांडणंही गरजेचं आहे. बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांचं नाव सिमेंट घोटाळ्यात आल्यानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला. त्यांच्या जागी कोणाची वर्णी लागणार याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. वसंतदादा पाटील, प्रतिभाताई पाटील हे मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदात दिल्लीत ठाण मांडून बसले होते. अशा परिस्थितीत महाराष्ट्राला मराठा नेतृत्व मिळावं अशी इंदिरा गांधी यांची इच्छा होती. सातार्‍याच्या अभयसिंहराजे भोसले यांचं नाव त्यांना अपेक्षित होतं पण चुकून त्यांनी बाबासाहेब भोसले यांचं नाव पुढे केलं असं सांगितलं जातं. मुख्यमंत्रीपदी बाबासाहेब भोसले यांचं नाव जाहीर होताच त्यांचा स्वतःचाही त्यावर विश्वास बसला नव्हता.…

पुढे वाचा

चष्म्यामुळे झाला पराभव

केशवराव नारायण गालट तथा बाबासाहेब धाबेकर हे अकोला जिल्ह्याच्या बार्शीटाकळी तालुक्यातील धाबा या गावचे सुपुत्र. राजकारणात बाबासाहेब धाबेकर याच नावाने ते सुपरिचित होते. धाबे गावच्या ग्रामपंचायत सदस्यापासून त्यांचा राजकीय प्रवास सुुरू झाला. पुढे उपसरपंच, सरपंच, पंचायत समिती सदस्य, सभापती, जि. प. सदस्य, अकोला जिल्हा परिषदेचे बारा वर्षे अध्यक्ष असा त्यांचा राजकीय प्रवास होता. ते अकोला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असतानाचा काळ हा सुवर्णकाळ समजला जातो. त्यावेळी त्यांनी अकोला जिल्ह्यात राबवलेल्या अनेक योजना पुढे राज्यभर लागू झाल्या. आमदार आणि कॅबिनेट मंत्री म्हणूनही त्यांची कारकिर्द यशस्वी ठरली. 2009 साली त्यांनी लोकसभेचीही निवडणूक लढवली…

पुढे वाचा

…आणि पवारांना तिकीट मिळाले

शरद पवार 1967 साली सर्वप्रथम वयाच्या अवघ्या 26व्या वर्षी आमदार म्हणून निवडून आले. त्यावेळी उमेदवार ठरवण्याचा आणि तो जाहीर करण्याचा अधिकार काँगेस वर्किंग कमिटीच्या अध्यक्षांचा असायचा. प्रदेशाध्यक्ष विनायकराव पाटील यांनी शरद पवार यांना निवडणूक लढवण्याची विचारणा केली. त्यावेळी पवार युवक काँग्रेसचे काम सक्रियपणे करायचे. पवारांची उमेदवारी जाहीर होताच त्यांना बारामतीतून कडाडून विरोध झाला. सगळ्या ज्येष्ठ मंडळींनी सांगितलं, “आम्ही 12 उमेदवार इथून इच्छुक आहोत. आमच्यापैकी कुणालाही उमेदवारी दिली तरी त्याला आम्ही निवडून आणू पण अतिशय नवख्या आणि अनअनुभवी असलेल्या शरदला उमेदवारी दिली तर आम्ही त्याला पाडू!” या सगळ्या ज्येष्ठांनी एकत्र येत…

पुढे वाचा