भारतीय संगीताचा इतिहास

अग्निमीळे पुरोहितं यज्ञस्य देवं रत्वीजम | होतारं रत्नधातमम || अग्निः पूर्वेभिर्र्षिभिरीड्यो नूतनैरुत | स देवानेह वक्षति || – ऋग्वेद संपूर्ण जगात निरपवादपणे आद्य वाङ्मय, म्हणून मानला गेलेला आपल्या भरतभूमीत जन्माला आलेला, ऋग्वेद ! ऋग्वेदातील मंत्र म्हणण्याची, गाण्याची एक पद्धत शास्त्रमान्य आहे. ते मंत्र कसे गावेत, हे सांगीतले आहे, ते सामवेदात ! सृष्टीनिर्माता म्हणून आपण ब्रह्मदेवाला मानले आहे, याचाच आधार घेत, आपण स्वराचे मोठेपण अधोरेखित करतो, ते त्याला ‘नादब्रह्म’ म्हणत, याचे पावित्र्य म्हणूनच निरपवाद आहे. या नादब्रह्माच्या निर्मितीला आपण अजून दुसरी बाजू मानतो, ती म्हणजे भगवान शंकराचे तांडव नृत्य, त्यातून निघालेला…

पुढे वाचा

रंगोत्सवाची अखंड उधळण करणारा कलावंत भारत गदगे

जन्मजात चित्रकाराला एक हक्क असतो रंगात खेळण्याचा! त्याला बंधन नसतं वयाचं, वेळेचं, काळाचं!! त्याचा एकच ध्यास असतो कॅनव्हासवर रंग उधळण्याचा आणि त्याच रंगात रसिकांना रंगवण्याचा.

पुढे वाचा

कॅमेर्‍याचे पांग फेडणारा छायादिग्दर्शक – राहुल जनार्दन जाधव

जर तुमच्यापुढे ‘गलेलठ्ठ पगाराची कायमस्वरूपी सरकारी नोकरी’ आणि ‘आवडीच्या पण अनिश्चित क्षेत्रातील सहाय्यक प्रशिक्षणार्थी’ या दोन प्रस्तावांपैकी  एक स्वीकारण्याचा पर्याय असेल तर कोणता निवडाल? विशेषतः तेव्हा, जेव्हा परिस्थितीने तुम्हाला एकेका पैशाचे महत्त्व चटके देऊन समजावले असेल. आपल्यापैकी बहुतांश लोक आधी आर्थिक स्थिरतेचा विचार करतील मग त्यातून वेळ मिळाला तर छंद, हौस, आवड वगैरे! पण त्याने मात्र वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षी एम.पी.एस.सी. पास करून मिळवलेल्या सरकारी नोकरीपुढे छायाचित्रकाराचा सहाय्यक होणे निवडले. 80च्या दशकात असा निर्णय घेणे चौकटीबाहेरचे होते. त्यावेळी छायाचित्रकलेकडे पूर्ण वेळ व्यवसाय म्हणून क्वचितच पाहिले जायचे. तरीही पूर्णवेळ छायाचित्रकार होण्याचा…

पुढे वाचा

अधिक-उणे – मराठी चित्रपटसृष्टीचे

मराठी चित्रपट निर्मात्यांना जेवढ्या सोयी आणि सवलती राज्य शासनाने दिलेल्या आहेत तेवढ्या अन्य कोणालाही देवू केलेल्या नाहीत. चित्रपट निर्मितीसाठी आर्थिक सहाय्य, चित्रपट निर्मिती झाल्यानंतर सिमेना करमुक्त करण्याकरता शासनाची होणारी मदत, निर्माण झालेला सिनेमा चांगल्या चित्रपटगृहात लावता यावा म्हणून शासकीय मदत आणि एवढे सगळे करूनही या चित्रपटांना फारसा पे्रक्षकवर्ग मात्र मिळत नाही. शासन चित्रपट निर्मात्यांना निर्मितीपासून ते चित्रपटगृह देण्यापर्यंत अनेक सोयी सवलती देवू शकते पण चित्रपटगृहात प्रेक्षक नेवून बसविणे हे शासनाला शक्य नाही. त्या दर्जाची, गुणवत्तेची निर्मिती ही त्या निर्मात्यालाच करता यायला हवी की जी निर्मिती होत नाही. गेल्या काही वर्षात…

पुढे वाचा