ग्रामीण जीवनातील खेळ

खेळ ही काही चांगल्या प्रकारे वेळ घालविण्याची आणि आनंद मिळविण्याची किंवा करमणुकीची साधी गोष्ट नाही. माणसाचे आरोग्य आणि खेळ खांचा घनिष्ठ आणि आंतरिक संबंध आहे. आपल्या पंचेद्रियांची सक्षमता, कौशल्यविकास याच्याशी तो निगडित आहे. खेळ हा क्षणार्धात अचूक निर्णय घेण्याच्या क्षमतेचा ऊर्जा घटक आहे. मुक्त हालचालीसाठी शरीर चापल्य याच्याशी तो निगडित आहे. खेळ हा सांघिक भावनेला सशक्त करणारा एकमेव घटक आहे. एवढेच नव्हे तर माणसाची जीवनाकडे आणि जगाकडे पाहण्याची दृष्टी तुम्ही कोणता खेळ खेळता यावर अवलंबून असते.

पुढे वाचा

कडू पण गुणकारी औषध #balkatha – हर्षल कोठावदे

राम आणि शाम नावाचे दोन मित्र असतात. ते एकाच शाळेत शिकत असतात. त्यांची गट्टी खूप छान जमलेली असते परंतु दोघांच्या वर्तनात एक बदल असतो, तो म्हणजे आईच्या लाडामुळे… रामची आई नेहमी त्याला चांगल्या गोष्टी सांगत असते. रामचे काही चुकले तर त्याला रागवते, फटकारते. उदाहरणार्थ :- आईने जेवणाचा डबा पोळी-भाजीचा दिला, जर रामने नाही खाल्ला, रामने नाटक केले तर आई त्याला समजावून सांगते, रागवते. त्याने अभ्यास नाही केला तर आई अभ्यासाचे महत्त्व समजावून सांगते. रामला या गोष्टींचा राग यायचा पण आईच्या आग्रहास्तव आईचे म्हणणे त्याला ऐकावे लागे. याउलट परिस्थिती शामची असते. शामने जसा…

पुढे वाचा

माझी आई

आई म्हणजे आठवण कधीच न सरणारी शाळेत असलो तरी सतत आठवणारी आई म्हणजे अजब रसायन धपाटे तिचे मला वळण लावणारे लागलं कुठे काही तर डोळे तिचे नकळत माझ्यासाठी रडणारे आई… नाही फक्त एक साद ती म्हणजे माझे आयुष्य तिने दिलेला आशीर्वाद अन् बोल घडवतात माझे भविष्य म्हणते आई मी आहे तिचा लाडका बाळ पण खरं सांगू का? माझ्यासाठी ती आहे मायेचं पांघरूण अन् परतीचं आभाळ! – स्नेहा कोळगे

पुढे वाचा

माझा आवडता तिरंगा!

भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन संघातील कसोटी क्रिकेट सामन्याचा चौथा दिवस होता.  मी आणि माझा नातू भारत सामना पाहण्यासाठी कारमध्ये बसून निघालो. भारतीय संघाचा संभाव्य विजय यामुळे रस्त्यावर वाहनेच वाहने होती.     मैदानापासून काही अंतरावर गाडी लावून आम्ही पायीच मैदानाकडे निघालो. आबालवृद्ध उत्साहाने, आनंदाने मैदानाकडे जात होते. रस्त्याच्या दुतर्फा चेहर्‍यावर तिरंगा रंगविणारे लोक बसले होते. तिरंगा ध्वज विकणारे लोक हातातील ध्वज उंचावून लक्ष वेधून घेत होते.

पुढे वाचा

लाडोबांचा लाडोबा!

‘चपराक’ प्रकाशनाने प्रकाशित केलेला, बालकांना मोहिनी घालणारा दिवाळी अंक म्हणजे लाडोबा! चपराक प्रकाशन, पुणे यांची अतिशय आकर्षक अशी ही निर्मिती! लाडोबा ह्या अंकात घराघरातील लाडोबांना साहित्याची नाविन्यपूर्ण मेजवानी संपादक घनश्याम पाटील यांनी दिली आहे. त्यामुळे लाडोबा लाडक्या वाचकांच्या पसंतीस उतरेल हे नक्की!

पुढे वाचा

आजोबा आणि सांताक्लॉज ( कथा )

आईबाबा ऑफिसला जायचे. दिवसभर घरात फक्त आजोबा आणि बडबड्या शुभम. घरात शुभमचा पसारा आणि त्याची घरभर पसरलेली बडबड. या दोनच गोष्टीने घर भरलेलं असायचं. दिव्याखाली अंधार का असतो? पृथ्वी गोलच का असते? ती त्रिकोणी का नसते? भाजीपाला हिरवा का असतो? रात्री अंधार का असतो? सारखे पोहून मासे दमत कसे नाहीत? टीव्हीत माणसे कुठून येतात? असे किती अन् काय काय प्रश्न शुभमला पडतात! या इतकुशा पोराला इतके प्रश्न पडतातच कसे? याचं आजोबांना भारी अप्रूप वाटायचं. शुभमला बघताना आजोबांना त्यांचं बालपण आठवायचं.

पुढे वाचा

माइंड रीडर (कथा) – राजीव तांबे

जागतिक कीर्तीचे ख्यातनाम शास्त्रज्ञ डॉ. सॅम बर्डींनी फोन घेतला. भारताचे पंतप्रधान म्हणाले, ‘‘एका अत्यंत महत्त्वाच्या आणि गोपनीय कामासाठी तुमची मदत हवी आहे. लगेचच दिल्लीत पोहोचा. आता यानंतर श्री. अशोक शर्मा तुमच्याशी संपर्क साधतील.’’

पुढे वाचा