महाराष्ट्राची धडाडती तोफ अशी ओळख असलेल्या एका युवा नेत्याची पुण्यात सभा होती. त्यांच्या सभांना अलोट गर्दी असायची. व्यासपीठावर ‘सर’ अशी ख्याती असलेले ज्येष्ठ नेते उपस्थित होते. युवा नेत्याने सभेच्या सुरूवातीलाच एक किस्सा सांगितला. तो सांगताना त्यांनी संबंधित प्रत्येक नेत्याच्या आवाजाची, लकबीची हुबेहुब नक्कल केली. ते म्हणाले, ‘‘पुण्यातला एक पत्रकार दिल्लीत गेला. त्याला वाटलं आपण राजधानीच्या शहरात आलोय तर काही नेत्यांच्या मुलाखती घेऊया! तो सर्वप्रथम सोनिया गांधी यांच्या 10 जनपथवर गेला. मोठ्या मुश्किलीने त्याने तिथे युवा नेते असलेल्या राहुल गांधी यांची मुलाखतीसाठी वेळ मिळवली. त्याने त्यांना एकच प्रश्न विचारला, ‘‘राहुलजी, दो…
पुढे वाचाTag: NCP
इंदिरा गांधी यांची सभा झाली; पण…
शरद पवार यांच्यामुळे बारामती देशात नेहमीच केंद्रस्थानी राहिली आहे. 1980 साली विधानसभेच्या निवडणुकीत शरद पवार काँग्रेस एसचे उमेदवार होते. त्यांच्याविरूद्ध तिथून मारूतराव चोपडे यांनी काँग्रेस आयच्या वतीने लढत दिली. त्यावेळी शरद पवार बारामतीतून पडतील, असा कयास असल्याने ही निवडणूक देशपातळीवर चर्चेत आली होती. त्यावेळी प्रेमलाकाकी चव्हाण या काँग्रेस आयच्या प्रांतअध्यक्ष होत्या. प्रेमलाकाकी म्हणजे पृथ्वीराज चव्हाण यांच्या आई. भाई गुलाम अली जिल्हाध्यक्ष तर किरण गुजर हे बारामती शहराचे अध्यक्ष होते. मारूतराव चोपडे हे धनगर समाजाचे मोठे प्रस्थ होते. ‘बारामती विधानसभा मतदारसंघात या समाजाचे प्राबल्य आहे. त्यामुळे इंदिरा गांधी यांची सभा झाली…
पुढे वाचापाणीदार दम
गावात नेत्यांची सभा होती. संध्याकाळी सहाची वेळ असली तरी या नेत्याने दिलेला गुंड प्रवृत्तीचा उमेदवार आणि त्याचे काही कार्यकर्ते उत्साहात तयारी करत होते. तशी गावात या नेत्याविषयी प्रचंड नाराजी होती. निवडणुकीचा अपवाद वगळता नेते कधीही गावात फिरकत नसत. गावातले सगळे प्रश्न ‘जैसे थे’ होते. या नेत्याचे जे चार कार्यकर्ते होते त्यांचीच मनमानी चालायची. त्यांच्या दहशतीमुळे सगळे गपगार असायचे. यावेळी मात्र गावानं एकत्र येऊन ठरवलं की, काहीही झालं तरी या नेत्याच्या उमेदवाराला मत द्यायचं नाही. उमेदवार गावातलाच असल्याने तोंडदेखल हजर राहणं गरजेचं होतं. मत मात्र नाही म्हणजे नाहीच! शहरातील धरणाचं पाणी…
पुढे वाचा…आणि पवारांना तिकीट मिळाले
शरद पवार 1967 साली सर्वप्रथम वयाच्या अवघ्या 26व्या वर्षी आमदार म्हणून निवडून आले. त्यावेळी उमेदवार ठरवण्याचा आणि तो जाहीर करण्याचा अधिकार काँगेस वर्किंग कमिटीच्या अध्यक्षांचा असायचा. प्रदेशाध्यक्ष विनायकराव पाटील यांनी शरद पवार यांना निवडणूक लढवण्याची विचारणा केली. त्यावेळी पवार युवक काँग्रेसचे काम सक्रियपणे करायचे. पवारांची उमेदवारी जाहीर होताच त्यांना बारामतीतून कडाडून विरोध झाला. सगळ्या ज्येष्ठ मंडळींनी सांगितलं, “आम्ही 12 उमेदवार इथून इच्छुक आहोत. आमच्यापैकी कुणालाही उमेदवारी दिली तरी त्याला आम्ही निवडून आणू पण अतिशय नवख्या आणि अनअनुभवी असलेल्या शरदला उमेदवारी दिली तर आम्ही त्याला पाडू!” या सगळ्या ज्येष्ठांनी एकत्र येत…
पुढे वाचा‘डमी’ उमेदवारांमुळे मिळाला विजय
ही गोष्ट आहे मराठवाड्यातील एका दुर्गम भागातील. तिथे एक ठेकेदार रस्त्यांची कामे करत होते. अनेक छोट्या-मोठ्या व्यवसायातून त्यांनी त्यांची उद्यमशीलता दाखवून दिली होती. नेकीने व्यवहार करताना आपण भले आणि आपले काम भले असा त्यांचा खाक्या! सामाजिक, राजकीय कार्याशी त्यांचा दूरान्वयानेही संबंध नव्हता. त्यांचे वडील मात्र सामाजिक कार्यात अग्रेसर होते. सामान्य माणूस त्यांच्या केंद्रस्थानी असायचा. त्यावेळी पदवीधर शिक्षक मतदारसंघातून त्यांच्या मुलाने निवडणूक लढवावी असा त्यांचा आग्रह होता. मुलानं सांगितलं की, ‘‘मला माझा व्यवसाय करू द्या. राजकारणात मला रस नाही.’’ वडील मात्र ऐकायला तयार नव्हते. त्यांनी सांगितलं, ‘‘तू निवडून आलास तर लोकांची…
पुढे वाचाकॉंग्रेसला ‘लकवा’ तर ‘घड्याळाची’ ‘चार्जिंग डाऊन’
सध्या महाराष्ट्रात पक्षनिष्ठा आणि घराणेशाहीवरुन मोठी रंगतदार चर्चा सुरु आहे. गल्ली-बोळातील सोम्या-गोम्यापासून ते अगदी विचारवंतांपर्यंत सगळेच निष्ठेच्या आणि घराणेशाहीच्या विरोधात बोलताना दिसत आहेत! मात्र असं असलं तरी दुसरी बाजू कोणीही पहायला तयार नाही. समाजात राजकारण सोडून इतर असे अनेक व्यवसाय आहेत की जिथे घराणेशाहीच चालते. उदाहरणार्थ डॉक्टरचा मुलगा डॉक्टर, इंजिनिअरचा मुलगा इंजिनिअर, वकीलाचा मुलगा वकील, क्रिक्रेटरचा मुलगा क्रिकेटर, सनदी अधिकार्याचा मुलगा सनदी अधिकारी आपल्याला चालतात; मात्र राजकारण्याच्या मुलाबाबत घराणेशाहीचा आरोप होताना पहायला मिळतो. अर्थात कोणत्याही राजकारण्यांचे समर्थन करण्याचा हेतू नाही मात्र स्वतःला एक न्याय आणि दुसर्याला दुसरा न्याय काय कामाचा?…
पुढे वाचा