माय लेक -राजेंद्र दिघे

माय नितळ गोडवा लेक साखर पाडवा माय प्रेमाचा निर्झर लेक आनंदी पाझर माय कष्टाची भाकर लेक लाडाची कदर माय सुंदर आभाळ लेक नितळ निर्मळ माय अंगणी तुळस लेक घराची कळस माय प्रेमाचा सागर लेक कुळाचा जागर माय वाढता मांडव लेक नात्यांचा सांकव माय गोकूळ आरसा लेक वंशाचा वारसा माय सुखाचा आगर लेक दुःखाला झालर -राजेंद्र दिघे

पुढे वाचा

माझी आई

आई म्हणजे आठवण कधीच न सरणारी शाळेत असलो तरी सतत आठवणारी आई म्हणजे अजब रसायन धपाटे तिचे मला वळण लावणारे लागलं कुठे काही तर डोळे तिचे नकळत माझ्यासाठी रडणारे आई… नाही फक्त एक साद ती म्हणजे माझे आयुष्य तिने दिलेला आशीर्वाद अन् बोल घडवतात माझे भविष्य म्हणते आई मी आहे तिचा लाडका बाळ पण खरं सांगू का? माझ्यासाठी ती आहे मायेचं पांघरूण अन् परतीचं आभाळ! – स्नेहा कोळगे

पुढे वाचा