हा किस्सा खरा आहे?

आज मांडणारा किस्सा खरा आहे का? निश्चितपणे खरा आहे! अस्सल आहे! चोवीस कॅरेट सोन्यासारखा! मग कुठला आहे? म्हणजे मतदारसंघ, गाव, शहर? कुठलाही असू शकतो! त्यातल्या भावना महत्त्वाच्या! कुणाबाबतचा आहे…? त्याचेही काही नाव नाही!! आपण फारतर ‘भाऊसाहेब’ म्हणूया! भाऊ आणि साहेब ही दोन्ही विशेषणं या क्षेत्रातील मंडळींची आवडती! म्हणून आजचे नायक भाऊसाहेब! तर हे भाऊसाहेब निवडणुकीला उभे राहिले. मागच्या वेळी लोकानी मोठ्या विश्वासानं त्यांना निवडून दिलं होतं. पण यांनी काय केलं…? अनेक योजनांत गैरव्यवहार, भ्रष्टाचार! कधी मतदारसंघात फिरकले नाहीत की कधी कुणाला कसली मदत केली नाही. तरीही त्यांचा आत्मविश्वास दांडगा. यावेळी…

पुढे वाचा

चष्म्यामुळे झाला पराभव

केशवराव नारायण गालट तथा बाबासाहेब धाबेकर हे अकोला जिल्ह्याच्या बार्शीटाकळी तालुक्यातील धाबा या गावचे सुपुत्र. राजकारणात बाबासाहेब धाबेकर याच नावाने ते सुपरिचित होते. धाबे गावच्या ग्रामपंचायत सदस्यापासून त्यांचा राजकीय प्रवास सुुरू झाला. पुढे उपसरपंच, सरपंच, पंचायत समिती सदस्य, सभापती, जि. प. सदस्य, अकोला जिल्हा परिषदेचे बारा वर्षे अध्यक्ष असा त्यांचा राजकीय प्रवास होता. ते अकोला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असतानाचा काळ हा सुवर्णकाळ समजला जातो. त्यावेळी त्यांनी अकोला जिल्ह्यात राबवलेल्या अनेक योजना पुढे राज्यभर लागू झाल्या. आमदार आणि कॅबिनेट मंत्री म्हणूनही त्यांची कारकिर्द यशस्वी ठरली. 2009 साली त्यांनी लोकसभेचीही निवडणूक लढवली…

पुढे वाचा

मतपत्रिकांवर ओठांची छाप

‘छोरा गंगा किनारे वाला’ अशी ओळख असलेेले ‘बिग बी’ अमिताभ बच्चन हे राजकारणात होते आणि एका अत्यंत प्रतिष्ठेच्या लढाईत अलाहाबाद लोकसभा मतदारसंघातून दोन लाख मतांनी विजयी झाले होते. ही गोष्ट आहे 1984 सालची. त्यावेळी अमिताभ यांचे अनेक सिनेमे सुपरहिट ठरले होते आणि ‘सुपरस्टार’ म्हणून त्यांना अफाट लोकप्रियताही मिळाली होती. राजीव गांधी यांच्याशी त्यांची घनिष्ट मैत्री होती. या मैत्रीचा आधार घेत राजीवजींनी त्यांना निवडणूक लढवण्याची गळ घातली. उत्तर भारतात त्यावेळी काँग्रेसचे पानिपत झालेले असल्याने काँग्रेसतर्फे ही खेळी करण्यात आली. राजीव गांधी यांचा हट्ट मोडता न आल्याने अमिताभ यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरावे…

पुढे वाचा