हा किस्सा खरा आहे?

आज मांडणारा किस्सा खरा आहे का? निश्चितपणे खरा आहे! अस्सल आहे! चोवीस कॅरेट सोन्यासारखा! मग कुठला आहे? म्हणजे मतदारसंघ, गाव, शहर? कुठलाही असू शकतो! त्यातल्या भावना महत्त्वाच्या! कुणाबाबतचा आहे…? त्याचेही काही नाव नाही!! आपण फारतर ‘भाऊसाहेब’ म्हणूया! भाऊ आणि साहेब ही दोन्ही विशेषणं या क्षेत्रातील मंडळींची आवडती! म्हणून आजचे नायक भाऊसाहेब! तर हे भाऊसाहेब निवडणुकीला उभे राहिले. मागच्या वेळी लोकानी मोठ्या विश्वासानं त्यांना निवडून दिलं होतं. पण यांनी काय केलं…? अनेक योजनांत गैरव्यवहार, भ्रष्टाचार! कधी मतदारसंघात फिरकले नाहीत की कधी कुणाला कसली मदत केली नाही. तरीही त्यांचा आत्मविश्वास दांडगा. यावेळी…

पुढे वाचा

उद्योजकांना वापरा, कामे सामान्यांची करा! | किस्सा ए इलेक्शन – घनश्याम पाटील

बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ हे पुण्यातून काँग्रेसतर्फे खासदार म्हणून निवडून जायचे. ते केंद्रीय संरक्षण उत्पादन मंत्री होते. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचीही जबाबदारी त्यांनी सांभाळली. कै. न. वि. उर्फ काकासाहेब गाडगीळ यांचे ते चिरंजीव. काकासाहेब आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची चांगली मैत्री होती. एकदा बॅरिस्टर गाडगीळ दिल्लीला गेले असता डॉ. आंबेडकरांना भेटले. त्यावेळचा किस्सा ते रंगवून सांगायचे. त्यांच्या चेहर्‍यावर किस्से सांगताना कायम एक मिश्किल हास्य असायचं. बाबासाहेबांनी त्यांना विचारलं, ‘‘तू काय काम करतोस? दिल्लीत कसा आलास?’’

पुढे वाचा