लोकप्रतिनिधी कामाचा

संपूर्ण भारतातील नव्हे तर आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका कोणती हे आपणास माहीत आहे का? या प्रश्नाचे आपणा सर्वांना अभिमान वाटावा असे उत्तर आहे, ते म्हणजे पिंपरी-चिंचवड! ही किमया साधण्यात आणि या नगरीच्या उत्थानात सर्वाधिक योगदान देणार्‍या नेत्याचं नाव आहे अण्णासाहेब मगर. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या प्रांगणात त्यांचा पूर्णाकृती पुतळा आहे. 1952 साली अण्णासाहेब प्रथम आमदार म्हणून निवडून आले. त्यावेळी हा हवेली मतदारसंघ होता. अण्णासाहेबांनी आमदार झाल्यावर विविध कामांचा जो धडाका लावला त्यामुळे त्यांचे नाव जिल्ह्यात सर्वत्र पोहोचले. 1957 च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला मात्र ते खचले नाहीत. हाती घेतलेले समाजसेवेचे व्रत…

पुढे वाचा