अत्रेंनी पाडलेला मुंबईचा बादशहा

‘हा सदोबा… लोकसभेत जायचं म्हणतोय. याला मी शोकसभेत पाठवेन,’ अशी बोचरी टीका करणार्‍या आचार्य अत्रे यांनी एका सभेत एक विधान केलं होतं. ते म्हणाले, ‘मी 13 ऑगस्टला जन्माला आलो. 15 ऑगस्टला स्वातंत्र्य मिळालं. दोन चांगल्या गोष्टींच्या मध्ये एक वाईट गोष्ट घडावी म्हणून 14 ऑगस्टला स. का. पाटील जन्माला आले.’ ‘मुंबईचा अनभिषिक्त सम्राट’ असं ज्यांचं वर्णन केलं जायचं त्या स. का. पाटील यांच्या विरूद्ध आचार्य अत्रे यांनी जंग जंग पछाडलं होतं. त्याचं कारण होतं, स. का. पाटील यांचा संयुक्त महाराष्ट्राला असलेला विरोध. त्यामुळंच 1967 च्या लोकसभा निवडणुकीत साऊथ बॉम्बे मतदारसंघातून पाटील…

पुढे वाचा

इंदिराजींना खडे बोल सुनावणारा नेता

राजकारण आणि समाजकारण ही एकाच गाडीची दोन चाके! पण राजकारणातून निवृत्ती घेतल्यानंतर समाजकार्यात टिकून राहणारे अपवादात्मक असतात. अशापैकी एक महत्त्वपूर्ण नाव म्हणजे मोहन धारिया! पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक ते केंद्रीय मंत्री असा अण्णांचा विलक्षण प्रवास आहे. राजकारणातून निवृत्ती घेत त्यांनी पाणी प्रश्नावर काम सुरू केलं आणि ‘वनराई’च्या माध्यमातून त्याला व्यापक स्वरूप दिलं. गावागावात त्यांनी अनेक झाडे लावली. बंधारे बांधले. पाण्याअभावी दुष्काळात होरपळणार्‍या अनेकांच्या आयुष्यात परिवर्तन घडवत त्यांनी हिरवीगार पालवी फोडली. स्वातंत्र्यलढ्यात योगदान देणारे धारिया 1964 ते 1971 या कालावधीत राज्यसभेवर होते. 1971 साली त्यांनी पुण्यातून काँग्रेसतर्फे लोकसभेची निवडणूक लढवली आणि त्यात…

पुढे वाचा

निवडणुका दरवर्षी का होत नाहीत? – किस्सा ए इलेक्शन – घनश्याम पाटील

पुण्याचे माजी महापौर आणि शरद पवार यांचे निष्ठावान अनुयायी अंकुश काकडे यांचे ‘हॅशटॅग पुणे’ हे पुस्तक मध्यंतरी उत्कर्ष प्रकाशनने प्रकाशित केले. या पुस्तकात त्यांनी पुण्याच्या सामाजिक, राजकीय संस्कृतीचा वेध घेतलाय. त्यात त्यांनी निवडणूक प्रचाराचे काही इरसाल किस्से सांगितले आहेत.

पुढे वाचा