राजकारण आणि समाजकारण ही एकाच गाडीची दोन चाके! पण राजकारणातून निवृत्ती घेतल्यानंतर समाजकार्यात टिकून राहणारे अपवादात्मक असतात. अशापैकी एक महत्त्वपूर्ण नाव म्हणजे मोहन धारिया! पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक ते केंद्रीय मंत्री असा अण्णांचा विलक्षण प्रवास आहे. राजकारणातून निवृत्ती घेत त्यांनी पाणी प्रश्नावर काम सुरू केलं आणि ‘वनराई’च्या माध्यमातून त्याला व्यापक स्वरूप दिलं. गावागावात त्यांनी अनेक झाडे लावली. बंधारे बांधले. पाण्याअभावी दुष्काळात होरपळणार्या अनेकांच्या आयुष्यात परिवर्तन घडवत त्यांनी हिरवीगार पालवी फोडली. स्वातंत्र्यलढ्यात योगदान देणारे धारिया 1964 ते 1971 या कालावधीत राज्यसभेवर होते. 1971 साली त्यांनी पुण्यातून काँग्रेसतर्फे लोकसभेची निवडणूक लढवली आणि त्यात…
पुढे वाचाTag: punya nagari
कोणता झेंडा घेऊ हाती?
राजकारण हे एक असं क्षेत्र आहे जिथं कुणाच्याही घरादाराची रांगोळी सहजपणे होते. गंमत म्हणजे वरिष्ठ स्तरावरील नेते कधी एकमेकांशी शत्रूत्व करतात आणि कधी ‘तुझ्या गळा माझ्या गळा’ करतात हे सांगता येणे शक्य नसल्याने या सगळ्यात हाडवैर निर्माण होते ते मात्र सामान्य कार्यकर्त्यांत.
पुढे वाचापोलीस यंत्रणेचा गैरवापर थांबायला हवा
पोलीस हा सामान्य नागरिक आणि कायदा व सुव्यवस्थेच्या मध्ये उभा असलेला दुवा असतो. हा दुवा जेवढा सक्षम आणि कार्यक्षम पद्धतीने काम करेल तितकं सामाजिक स्वास्थ्य कायम रहायला मदत होईल.
पुढे वाचाउमद्या मराठवाड्याची नवी उमेद
मराठवाडा हे महाराष्ट्राचं हृदय आहे. आपल्या राज्यात जे काही चांगलं आहे त्यातलं सर्वोत्कृष्ट मराठवाड्यात आहे. महाराष्ट्रातलं जागतिक कीर्तिचं पर्यटनस्थळ कोणतं असेल तर अजिंठा-वेरूळच्या लेण्या! जगभरातून महाराष्ट्रात येणारे पर्यटक या लेण्या हमखास बघतात. महाराष्ट्रात या लेण्याइतकं बघण्यासारखं आकर्षक दुसरं काही नाही. महाराष्ट्राची कुलदेवता असलेली आई तुळजाभवानी मराठवाड्यात आहे.
पुढे वाचापुण्याचा विस्तार वैभवशाली ठरावा
भारताची आर्थिक राजधानी मुंबई असली तरी महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी ही पुणेच आहे. पुणे महापालिकेच्या हद्दीत आता नव्याने तेवीस गावांचा समावेश केल्याने भौगोलिकदृष्ट्या पुणे ही सर्वात मोठी महापालिका झाली आहे. पुणे शहर कोणाचे? असा प्रश्न केला तर एकच उत्तर येते ते म्हणजे छत्रपती शिवाजीराजांचे. पुणे लुटून, जाळून मुरार जगदेवानं कसब्यावर गाढवाचा नांगर फिरवला, पुणं बेचिराख केलं त्या पुण्यात छत्रपती शिवरायांनी जिजाऊसाहेबांच्या समोर सोन्याचा नांगर फिरवला. तेव्हापासून पुणं हे अत्यंत सुजलाम, सुफलाम आणि सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न आहे.
पुढे वाचादखलपात्र : वाचनीय अग्रलेखसंग्रह
माझ्या ‘दखलपात्र’ या अग्रलेख संग्रहाच्या दोन आवृत्या संपल्या. अनेक वाचक या पुस्तकांवर अजूनही अभिप्राय कळवतात. या पुस्तकानं मला अनेकांच्या मनात आणि हृदयात स्थान दिलं. आज दैनिक ‘पुण्य नगरी’च्या ‘मी आणि माझं वाचन’ या सदरात ज्येष्ठ लेखक श्री. दिलीप देशपांडे यांनी ‘दखलपात्र’विषयी लिहिले आहे. दिलीप देशपांडे सर, ‘पुण्य नगरी’चे संपादक श्रीकांत साबळे सर आणि पुरवणी संयोजक स्वप्नील कुलकर्णी यांचे आभार!
पुढे वाचा