‘‘आज्जे हे बग, चित्र्या वस्तीवरनं हिथं घरात आलाय बग!’’ नातवाच्या हाकाटीने कावरीबावरी झालेली मथुराबाई आपल्या जीर्ण झालेल्या इरकली नऊवारीचा पदर नीटनेटकाच असूनही पुन्हा ठीकठाक करत उजव्या हातानं कपाळावर ओढत ओसरीत आली. जणू काही कुणी जीवाभावाचं माणूस घरी आलंय आणि त्याच्या समोर अदबीनं जावं तशी मथुराबाई लगबगीनं बाहेर आली होती. मथुरा दारापाशी येताच चित्र्यानं तिचे हात चाटायला सुरूवात केली तशी मथुराआजीच्या डोळ्याला धार लागली. पदराचं टोक डोळ्याला पुसत ती झपकन आत गेली. त्या बरोबर चित्र्याही आत आला. मथुराआजीनं ढेलजेत बसकन मारली आणि डोळ्याला लागलेली धार पुसू लागली. ते बघून चित्र्या तिच्या…
पुढे वाचा