वर्षभर भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव यावर्षी देशभर साजरा होत आहे.भारतीयांच्या मनामनात भारतीय स्वातंत्र्याच्याबददल प्रेम ठासून भरलेले असणे साहजिक आहे. प्रत्येक भारतीय आपण भारतीय म्हणून मनात भारतीय स्वातंत्र्य सैनिक, क्रांतीकारक,राष्ट्रपुरूषांबददलची कृतज्ञता व्यक्त करत आहे.भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने यावर्षी सरकार,विविध सामाजिक संघटना,संस्था विविध कार्यक्रम करत अमृत महोत्सव साजरा करत आहे. प्रत्येक जन अत्यंत उत्सवाने सहभाग देत आहे. काही लोक देशभक्तीचा विचार मनात कायम ठेऊन असतात. आपला व्यवसाय जोपासत असतानाही राष्ट्रभक्तीशी तडजोड करत नाही. काही लोक नेहमीच आपले वेगळेपण कायम ठेवत असतात. त्यांच्या पाऊलवाटा नेहमीच वेगळ्या दिशेने चालत असतात. त्याकरीता त्यांची धडपड…
पुढे वाचाTag: चपराक
माणूस व माणुसकी जाणिवेचं अंतरंग : दरवळ
‘अक्षर गणगोत’ या अंकात विनोद श्रा. पंचभाई यांनी ‘दरवळ’चे लिहिलेले परीक्षण. संपादक पांडुरंग पुठ्ठेवाड यांचे यांचे विशेष आभार. माणूस व माणुसकी जाणिवेचं अंतरंग : दरवळ मध्यंतरी हिंदीतील एका मोठ्या साहित्यिकाच्या पुढील ओळी वाचनात आल्या… “आवाज उंची होगी,तो कुछ लोग सुनेंगे! अगर बात उंची होगी,तो बहोत सारे लोग सुनेंगे!” या ओळी लेखक घनश्याम पाटील यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या “दरवळ” या पुस्तकासाठी तंतोतंत लागू पडतात. कारण ‘दरवळ’ वाचताना त्यातील प्रत्येक लेखातील प्रत्येक परिच्छेदातून आपल्याला निश्चितच लिखाणातील उंचीचा वेगळेपणा जाणवतो. परिणाम साधणाऱ्या वाक्यांची उंची जाणवते! त्यांनी प्रत्येक लेख अत्यंत पोटतिडिकेनं लिहिलेला आहे याची पदोपदी प्रचीती…
पुढे वाचादरवळ
मराठी साहित्य परिषद, तेलंगण राज्य, हैदराबाद यांच्या ‘पंचधारा’ या मुखपृष्ठात परभणी येथील सुप्रसिद्ध लेखिका मनीषा कुलकर्णी-आष्टीकर यांनी ‘दरवळ’ या पुस्तकाची लिहिलेली समीक्षा. हे पुस्तक घरपोच मागवण्यासाठी संपर्क – ७०५७२९२०९२
पुढे वाचादीपस्तंभ
“मातोश्रीची करिता सेवा, तो प्रिय होतो वासुदेवा पुंडलिकाचा ठेवावा, इतिहास तो डोळ्यापुढे” अशी एक ओवी ह.भ.प. श्री. दासगणू महाराजांनी लिहिलेल्या ‘श्री गजानन विजय’ ग्रंथात आहे. आईवडिलांची सेवा करून वासुदेवाला प्रिय व्हा असा उपदेश त्यांनी या ओवीतून केला आहे.
पुढे वाचाजयाते कामधेनू माये!
प्रतिमा पूजन झाले. सगळे आपापल्या जागेवर बसले. सूत्रसंचालकाने भाषण करण्यासाठी माझे नाव पुकारले. मी प्रतिमेला नमस्कार केला आणि भाषण करण्यासाठी डायसकडे गेलो. सभोवार दृष्टी फिरवली. आता भाषणाला सुरूवात करणार इतक्यात हर्षदा उभी राहिली.
पुढे वाचाजागो मोहन प्यारे!
“एक मेसेज सध्या मोबाईलवर व्हायरल होतो आहे. “महानगरपालिकेचे लोक पन्नास वर्षांपेक्षा अधिक वयाच्या लोकाच्या कोविड टेस्ट घ्यायला आले तर फक्त नकार द्या. ते म्हणतील की हे अनिवार्य आहे. कायदेशीर आहे. सोसायटीचा वॉचमन ‘सरकारी अधिकारी’ अशी बतावणी केली की ‘पॉश’ दिसणाऱ्या माणसाला काहीही न विचारता, काहीही चौकशी न करता सोसायटीमध्ये प्रवेश देतो.”
पुढे वाचापोलिसांची मानसिकता!
कुठे लाठीहल्ला, कुठे अश्रुधारांचा वापर, कुठे हवेत गोळीबार, कुठे प्रत्यक्ष गोळीबार झाला की सामान्य नागरिकांपासून ते राजकारण्यांपर्यंत, अगदी गल्ली ते दिल्ली जर कुणाला जबाबदार धरले जात असेल तर ते म्हणजे पोलीस यंत्रणेला! पण खरेच का प्रत्येकवेळी, प्रत्येक ठिकाणी पोलिसच जबाबदार असतात काय? बारा-पंधरा तास सेवा बजावणारे पोलीस इतके निर्दयी, निष्ठुर आहेत का की ते निष्पाप लोकाच्या जीवावर उठतील?
पुढे वाचाजागतिक शांतता आणि भारत
अलीकडेच एक बातमी माझ्या वाचनात आली, ती पुढीलप्रमाणे, ‘भारत-चीन सीमेवर गोळीबार’ नवी दिल्ली : भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमध्ये शांतता राखण्यासाठी विविध स्तरावर चर्चा केल्या जात आहेत. अशातच दोन्ही देशातील तणावाच्या पार्श्वभूमीवर एक मोठी बातमी. मॉस्कोत भारत – चीन परराष्ट्र मंत्र्यांच्या चर्चेआधी एलएसीवर गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे.
पुढे वाचाकवितेचं गाणं होतांना.. एक अनुभव !
‘आईचा मान कधी देवाला नाही’ नमस्कार मंडळी, आज मला माझ्या “प्रांजळ” ह्या काव्यसंग्रहातील ‘आईचा मान कधी देवाला नाही’ ह्या कवितेचे गाणं झालंय म्हणून खूप खूप आनंद होत आहे. आपल्या सगळ्यांच्याच अतिशय जिव्हाळ्याचा विषय ही आपली ‘आई’ असते आणि म्हणूनच जगभरातील मातृशक्तीला माझे हे गीत मी आज समर्पित करून ‘आई’प्रती कृतज्ञता व्यक्त करतो. तिचे उपकार तर ह्या जन्मीच काय; पण कधीच फेडता येणार नाहीत! त्यामुळे तिच्या ऋणात राहणेच जास्त योग्य आहे असे मला वाटलं; म्हणून ‘मातृशक्ती’ला माझी ही ‘गीतांजली’ समर्पित करतो आहे.
पुढे वाचाज्ञानाचा दिवा, घरोघरी लावा
“दान दिल्याने ज्ञान वाढते, त्या ज्ञानाचे मंदिर हे सत्य शिवाहून सुंदर हे… इथे मोल ना दामाचे, मोती होतील घामाचे सरस्वतीच्या प्रेमाचे, प्रतीक रम्य शुभंकर हे… चिरा चिरा हा घडवावा, कळस कीर्तीचा चढवावा अज्ञानी तो पढवावा, थेंब आम्ही तर सागर हे… त्यागाला या नाव नसे, पुण्यवान हा देश असे कल्पतरू हा उभा दिसे, त्या छायेतील मंदिर हे”
पुढे वाचा