विनोबांची शिक्षणछाया – प्रस्तावना

युगपुरुष स्वामी विवेकानंद यांनी सांगितलं होतं, ‘‘आपल्या देशाला बौद्धिक क्षत्रियांची गरज आहे आणि असे क्षत्रिय निर्माण झाले तर शस्त्रास्त्रांची मुळीच कमतरता पडणार नाही!’’ हे असे क्षत्रिय निर्माण झालेच तर ते काय करतील? तर मानवधर्माची पताका सर्वत्र डौलात फडकत ठेवतील!

पुढे वाचा

शिक्षणाबद्दलची दूरदृष्टी

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींनी सार्‍या विश्वासाठी आर्ततेनी भाकलेली प्रार्थना म्हणजे पसायदान! सार्‍या विद्यार्थी समूहांसाठी शिक्षकांकडे मागितलेले असेच मूल्यशिक्षणाचे दान म्हणजे ‘चपराक’ने प्रकाशित केलेल संदीप वाकचौरे यांचे ‘शिक्षणाचे पसायदान.’ या पुस्तकाची मांडणी तीस प्रकरणात केली आहे. शिक्षणाबद्दलचा दूरदृष्टीपणा व शिक्षकांकडून नेमके कोणते वर्तन अपेक्षित आहे, याचे प्रभावी विवेचन या पुस्तकात आहे. एखादा शिक्षक चुकला तर तो भावी पिढी सार्थतेने घडवू शकणार नाही, हे लेखकाचे विधान महत्त्वाचे आहे. ‘शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी’ याप्रमाणे एखाद्या शिक्षकाने ज्ञानदानाचे काम चोख बजावायचे ठरवले तरच त्यांच्या विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भवितव्य घडेल. अब्दुल कलामांना त्यांचे प्राथमिकचे शिक्षक जास्त…

पुढे वाचा

अंक आणि अक्षर बनवतील साक्षर

अंक आणि अक्षर बनवतील साक्षर

नुकताच पाच सप्टेंबरला आपण शिक्षक दिन साजरा केला. विद्यार्थ्याला घडवण्याचं, शिक्षण देण्याचं, साक्षर करण्याचं, संस्कार करण्याचं काम शिक्षक अगदी मनापासून जीव तोडून करत असतात. तन, मन, धन खर्च करून राबत असतात. या शिक्षकांच्या ज्ञानदानाच्या पवित्र कार्याचं स्मरण करून त्यांना अभिवादन करण्यासाठी आपण ‘शिक्षक दिन’ साजरा करतो! पण लोकाना साक्षर करण्याचे काम फक्त शिक्षकांचे आहे का? फ़क्त सरकारचेच आहे का? याचे उत्तर ‘नाही’ असेच द्यावे लागेल.

पुढे वाचा

ज्ञानाचा दिवा, घरोघरी लावा

ज्ञानाचा दिवा, घरोघरी लावा

“दान दिल्याने ज्ञान वाढते, त्या ज्ञानाचे मंदिर हे सत्य शिवाहून सुंदर हे… इथे मोल ना दामाचे, मोती होतील घामाचे सरस्वतीच्या प्रेमाचे, प्रतीक रम्य शुभंकर हे… चिरा चिरा हा घडवावा, कळस कीर्तीचा चढवावा अज्ञानी तो पढवावा, थेंब आम्ही तर सागर हे… त्यागाला या नाव नसे, पुण्यवान हा देश असे कल्पतरू हा उभा दिसे, त्या छायेतील मंदिर हे”

पुढे वाचा