मन फुलपाखरू

मन फुलपाखरू

सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत असंख्य विचार आपल्या मनात येत असतात. एका अभ्यासकाने या विचारांची संख्या मोजण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या असं लक्षात आलं की ही संख्या दिवसागणिक सत्तर-पंचाहत्तर हजार वगैरे आहे. आश्चर्य वाटलं ना!

पुढे वाचा

मैत्र मैत्री आणि मैत्रेय अर्थात दोस्ताना

मैत्र मैत्री आणि मैत्रेय अर्थात दोस्ताना

आम्ही तीन मित्र जवळजवळ तीस वर्षांनी पुण्यात भेटलो. तिघांचे शिक्षण सोलापूरला शाळा व कॉलेज असं एकत्र झालं. शाळेमध्ये आणखी इतरही काही मित्र होते. एक दीपक नावाचा मित्र शाळेत बरोबर होता. आम्हा दोघांच्याही फॅमिली मोठया होत्या. हा मित्र लक्षात राहण्याचे कारण म्हणजे तो मला सिनेमाच्या गोष्टी सांगत असे. गोष्टी इतक्या रंगवून सांगत असे की ‘सिनेमा’ पाहिल्यासारखे वाटत असे!

पुढे वाचा

आसक्ती

आसक्ती

आपण सगळे जाणतो की महाभारतात युधिष्ठिराने द्यूत नावाचा खेळ (जुगार) खेळताना द्रौपदीला पणाला लावलं होतं. दुर्योधनाने शकुनीच्या मदतीने द्रौपदी ला जिंकलं होतं. द्रौपदी दुर्योधनाची दासी झाली होती. युधिष्ठिर पहिल्यांदा स्वतः जवळचं धन द्यूतात पणाला लावून हरला. नंतर स्वतःचं राज्य त्यानं द्यूतात पणाला लावलं, ते ही तो हरला. त्या नंतर त्यानं स्वतःला पणाला लावलं आणि तो स्वतः दुर्योधनाचा दास झाला. त्यानंतर त्यानं स्वतःच्या भावांना पणाला लावलं. त्यांनाही तो द्यूतात हरला. त्याचे भाऊ दुर्योधनाचे दास झाले आणि सरतेशेवटी तो हरलेलं सगळं परत मिळवण्यासाठी द्रौपदीला पणाला लावून द्यूतात हरला आणि द्रौपदीही दुर्योधनाची दासी…

पुढे वाचा

आईचं पत्र हरवलं!

आईचं पत्र हरवलं!

माझ्या आईचं पत्र हरवलं! ——————————— ‘माझ्या आईचं पत्र हरवलं, ते मला सापडलं’ असा एक खेळ आम्ही लहानपणी खेळत होतो. टी व्ही आणि मोबाईल नसलेल्या त्या काळात मैदानी खेळांना प्राधान्य असायचं. क्वचितच आम्ही मुलं घरात असायचो! आंधळी कोशिंबीर, ऊन सावली, डोंगर का पाणी, डबा ऐसपैस, हुतुतू, आट्यापाट्या, गोट्या, भोवरा, लपाछपी, विषामृत, विटी दांडू असे इतर खेळही त्यावेळी आम्ही खेळत होतो. कदाचित आजच्या मुलांना यातील काही खेळांची नावं, ऐकून देखील माहिती नसतील. पण तुमच्या आई-बाबांना, आजी -आजोबांना विचाराल तर ते भरभरून बोलतील या खेळांवर आणि जुन्या काळातील आठवणीत रमूनही जातील! या खेळांना…

पुढे वाचा

डोळे हे जुलमी गडे!

डोळे हे जुलमी गडे!

“डोळे हे जुलमी गडे रोखुनी मज पाहू नका जादूगिरी त्यात पुरी येथ उभे राहू नका” हे कविवर्य भा. रा.तांबे यांच्या गीताचे बोल आहेत. अनंत काळापासून शृंगारामध्ये डोळ्यांना अनन्यसाधारण महत्व आहे. माणसाचे डोळे अनेक रंगांचे व अनेक छटांचे असतात. जसे की काळे, पिंगट, घारे, निळे, टपोरे. डोळ्यांमधून वेगवेगळ्या भाव-भावना व्यक्त होतात.

पुढे वाचा

जागो मोहन प्यारे!

जागो मोहन प्यारे!

“एक मेसेज सध्या मोबाईलवर व्हायरल होतो आहे. “महानगरपालिकेचे लोक पन्नास वर्षांपेक्षा अधिक वयाच्या लोकाच्या कोविड टेस्ट घ्यायला आले तर फक्त नकार द्या. ते म्हणतील की हे अनिवार्य आहे. कायदेशीर आहे. सोसायटीचा वॉचमन ‘सरकारी अधिकारी’ अशी बतावणी केली की ‘पॉश’ दिसणाऱ्या माणसाला काहीही न विचारता, काहीही चौकशी न करता सोसायटीमध्ये प्रवेश देतो.”

पुढे वाचा

जागतिक शांतता आणि भारत

जागतिक शांतता आणि भारत

अलीकडेच एक बातमी माझ्या वाचनात आली, ती पुढीलप्रमाणे, ‘भारत-चीन सीमेवर गोळीबार’ नवी दिल्ली : भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमध्ये शांतता राखण्यासाठी विविध स्तरावर चर्चा केल्या जात आहेत. अशातच दोन्ही देशातील तणावाच्या पार्श्वभूमीवर एक मोठी बातमी. मॉस्कोत भारत – चीन परराष्ट्र मंत्र्यांच्या चर्चेआधी एलएसीवर गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे.

पुढे वाचा

अंक आणि अक्षर बनवतील साक्षर

अंक आणि अक्षर बनवतील साक्षर

नुकताच पाच सप्टेंबरला आपण शिक्षक दिन साजरा केला. विद्यार्थ्याला घडवण्याचं, शिक्षण देण्याचं, साक्षर करण्याचं, संस्कार करण्याचं काम शिक्षक अगदी मनापासून जीव तोडून करत असतात. तन, मन, धन खर्च करून राबत असतात. या शिक्षकांच्या ज्ञानदानाच्या पवित्र कार्याचं स्मरण करून त्यांना अभिवादन करण्यासाठी आपण ‘शिक्षक दिन’ साजरा करतो! पण लोकाना साक्षर करण्याचे काम फक्त शिक्षकांचे आहे का? फ़क्त सरकारचेच आहे का? याचे उत्तर ‘नाही’ असेच द्यावे लागेल.

पुढे वाचा

देणाऱ्याने देत जावे

देणाऱ्याने देत जावे

अनंत काणेकरांचा ‘दोन मेणबत्त्या’ नावाचा लघुनिबंध आम्हाला शाळेत असताना अभ्यासक्रमात होता. या लघुनिबंधातील पुढील वाक्य आयुष्यभर लक्षात राहिलं, ‘दुसऱ्यासाठी जगलास तर जगलास स्वतःसाठी जगलास तर मेलास’

पुढे वाचा