आमचे वैचारिक पालक वृत्तपत्रे

आमचे वैचारिक पालक वृत्तपत्रे

– प्रवीण दवणे ‘चपराक दिवाळी विशेषांक 2013’ एका हाताच्या अंतरावर असणारी प्रसारमाध्यमे अगदी मघाचच्या सेकंदाला घडलेली बातमी देत असोत; अजूनही कोट्यवधी घरं सकाळच्या एका बेलची किंवा हळूच वाजणार्‍या कडीची वाट पाहत असतात. एक उबदार घडी, कडीत वाट पाहत असते आपली; अन् आपण त्या ‘घडी’ची! वृत्तपत्रात बातमी वाचल्यावाचून तिचं ‘बातमीतपण’ मुळी जाणवत नाही. मथळ्यांमधून उतरत जाणारी न् वेगळी असेल तर चहाच्या एक घोट घेऊन घरातल्या कुणालातरी वाचून दाखवल्यावाचून ‘बातमी’ पूर्ण होत नाही; हे निर्विवाद सत्य आहे.

पुढे वाचा

ही वाट वैखरीची

ही वाट वैखरीची

माझ्या मनात वक्तृत्वाविषयीची आवड निर्माण करण्याचे काम प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी केले. त्यांचे व्याख्यान ऐकल्यानंतर शब्दशक्तीच्या अफाट ताकतीचा प्रत्यय मला आला. जाणत्या वयात मी त्यांच्या संपर्कात आलो. प्राचार्यांनी वक्तृत्वाची जी वाट चोखाळली, त्या वाटेने जावे असे मला वाटले. मी अभियांत्रिकी शाखेचा पदवीधर. तसा माझा साहित्याशी संबंध नव्हता पण साहित्यप्रेमाने आणि वेडाने मला या क्षेत्रात आणले. गेली पंधरा वर्षे अव्याहतपणे व्याख्यानाच्या निमित्ताने माझी भ्रमंती महाराष्ट्रात आणि बृहन्महाराष्ट्रात सुरू आहे. श्रोत्यांनी आणि संयोजकांनीच मला विषय दिले आणि मी बोलत राहिलो. व्याख्यानांच्या निमित्ताने माझी ग्रामीण भागाशी नाळ जोडली गेली. जिवाभावाची अनेक माणसे या…

पुढे वाचा

शेती… संप आणि शेतीचे भवितव्य!

जयाजी सूर्यवंशी नामक नेता होण्याची घाई झालेल्या अर्धवट माणसामुळे शेतकरी संपासारख्या संपाला विचित्र वळण लागले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचाही अपरिपक्वपणा यानिमित्ताने पुढे आला. आता संपातून अखेरीस काय साध्य होईल हे सांगता येत नसले तरी यामुळे निर्माण झालेल्या गंभीर प्रश्‍नांवर चर्चा करणे भाग आहे.

पुढे वाचा