चपराकचा अनोखा अमृत महोत्सव

वर्षभर भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव यावर्षी देशभर साजरा होत आहे.भारतीयांच्या मनामनात भारतीय स्वातंत्र्याच्याबददल प्रेम ठासून भरलेले असणे साहजिक आहे. प्रत्येक भारतीय आपण भारतीय म्हणून मनात भारतीय स्वातंत्र्य सैनिक, क्रांतीकारक,राष्ट्रपुरूषांबददलची कृतज्ञता व्यक्त करत आहे.भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने यावर्षी सरकार,विविध सामाजिक संघटना,संस्था विविध कार्यक्रम करत अमृत महोत्सव साजरा करत आहे. प्रत्येक जन अत्यंत उत्सवाने सहभाग देत आहे. काही लोक देशभक्तीचा विचार मनात कायम ठेऊन असतात. आपला व्यवसाय जोपासत असतानाही राष्ट्रभक्तीशी तडजोड करत नाही. काही लोक नेहमीच आपले वेगळेपण कायम ठेवत असतात. त्यांच्या पाऊलवाटा नेहमीच वेगळ्या दिशेने चालत असतात. त्याकरीता त्यांची धडपड…

पुढे वाचा

अंतर्मुखता हे सामर्थ्य

त्यांची बदली नागपूरहून पुण्यात झाली. पुण्यातले रस्ते फारसे परिचित नव्हते. त्यावेळी डेक्कनवरून अलका टॉकिजकडे दुचाकीवरून जाण्यास परवानगी नव्हती. ते नेमके त्या रस्त्यावरून गेले. पोलीसमामांनी अडवलं. नो एन्ट्रीत आल्याबद्दल दंड सांगितला. यांनीही हळहळत तो भरला. पावती हातात आल्यावर ते त्या पोलीसमामांना म्हणाले, ‘‘मीही वायरलेसला पीएसआय आहे. नुकतीच बदली झाल्याने अजून रस्ते माहीत नाहीत.’’ दंड घेणारे पोलीस कर्मचारी ओशाळले. ते म्हणाले, ‘‘साहेब आधी सांगायचं ना! पावती कशाला फाडली?’’ यांनी सांगितलं, ‘‘नाही. माझी चूक होती. त्याचा दंड तर भरावाच लागेल ना? यापुढे गाडी चालवताना काळजी घेतो…’’ आजच्या काळात आख्यायिका वाटावी अशी ही सत्य…

पुढे वाचा

नाकर्ती घराणी नाकारा

  महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर राज्याच्या प्रत्येक भागात वेगवेगळी राजकीय घराणी निर्माण झाली. प्रत्येक जिल्ह्यात किमान दोन-तीन घराणी स्थिरावलेली दिसतात. या घराण्यांनी कोणताही राजकीय अभिनिवेष किंवा कोणतीही विचारधारा आदर्शवत माणून वाटचाल केली नाही. आपल्या सोयीनुसार यातील बहुतेकांनी सातत्यानं पक्षांतर केलं. ते वेगवेगळ्या पक्षात गेले, स्थिरावले, आपल्या भूमिका आणि विचार बदलले. येनकेनप्रकारेण सत्तेत कसं राहता येईल याचं कसब त्यांना अवगत आहे. काँग्रेस पक्षाचा विचार करता आमच्या विलासराव देशमुखांचं घराणं, शंकरराव चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, पतंगराव कदमांचं घराणं काँग्रेसमध्ये स्थिरावलेलं दिसतं. शिवाजीराव पाटील निलंगेकर, डॉ. पद्मसिंह पाटील आदींच्या वारसांनी पक्ष बदलून आपलं बस्तान बसवलं.…

पुढे वाचा

जन्मभरी तो फुलतचि होता…

जगातील सर्वाधिक उत्तुंग मनोरे कोणते? असा प्रश्न मला कधी पडतच नाही. हा प्रश्न न पडण्याचं कारण म्हणजे आपल्या राष्ट्रानं जगाला अनेक भव्यदिव्य मनोरे दिलेत. या मनोऱ्यांनी त्यांच्या कार्यकर्तृत्त्वानं त्यांची उंची आपापल्या क्षेत्रात सातत्यानं दाखुवून दिली. महाकवी केशवसुत ते मर्ढेकर या परंपरेचा विचार करता असाच एक बलदंड मनोरा मला खुणावतो, भुरळ पाडतो. या विलक्षण प्रतिभेच्या मनोऱ्याचं नाव म्हणजे लोककवी मनमोहन नातू! ११-११-१९११ ला जन्मलेल्या मनमोहनांनी ७ मे १९९१ ला जगाचा निरोप घेतला; मात्र त्यांच्या साहित्यिक योगदानातून हा प्रतिभेचा जागृत ज्वालामुखी कायम धगधगत आहे. कुणी शाईने लिहिली कविता कुणी रक्ताने लिहिली कविता करी…

पुढे वाचा

सहकार चळवळीचा दीपस्तंभ

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आपल्या देशाने सर्व क्षेत्रात नेत्रदीपक प्रगती साधली. यात सगळ्यात मोठा वाटा होता तो अर्थातच सहकाराचा! त्यातही देशाचा विचार करता सहकार क्षेत्रात महाराष्ट्राने नेहमीच अव्वल योगदान दिले आहे. देशातील पहिला सहकारी साखर कारखाना काढणारे पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील नगर जिल्ह्यातील लोणी बुद्रुकचे. सहकार क्षेत्रात मोलाचे योगदान देणार्‍या धुरिणांची एकत्रित माहिती आजवर मराठी साहित्यात नव्हती. मात्र भालचंद्र कुलकर्णी यांनी सहकार भारती या संस्थेच्या माध्यमातून हा महत्त्वपूर्ण प्रकल्प तडीस नेला असून त्यांच्या संपादनाखाली प्रकाशित झालेल्या ‘सहकार महर्षी’ या दणदणीत ग्रंथाचे प्रकाशन नुकतेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. यात थोड्याथोडक्या…

पुढे वाचा

मराठीला प्रतिसादशून्यतेचं ग्रहण!

डोंबिवली येथे झालेल्या 90व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ‘नवोदित लेखन : अपेक्षा आणि आव्हाने’ या विषयावरील चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. मनस्विनी लता रवींद्र, प्रशांत आर्वे, रवी कोरडे आणि ‘चपराक’चे संपादक प्रकाशक घनश्याम पाटील यात सहभागी झाले होते. सचिन केतकर या सत्राचे समन्वयक होते. या चर्चासत्रातील घनश्याम पाटील यांचे भाषण खास ‘चपराक’च्या वाचकांसाठी.

पुढे वाचा

उदासीनांना लटकवा!

अकार्यक्षम प्रशासनानं सातत्यानं देशाची दुरावस्था झाली आहे. यामुळं राज्यकर्त्यांची डोकेदुखीही वाढली आहे. अर्थात अशा गोष्टींसाठी केवळ प्रशासन जबाबदार नसतं तर ते प्रशासन राबवणारे राज्यकर्तेही तितकेच जबाबदार असतात.

पुढे वाचा

माणूस व माणुसकी जाणिवेचं अंतरंग : दरवळ

माणूस व माणुसकी जाणिवेचं अंतरंग : दरवळ

‘अक्षर गणगोत’ या अंकात विनोद श्रा. पंचभाई यांनी ‘दरवळ’चे लिहिलेले परीक्षण. संपादक पांडुरंग पुठ्ठेवाड यांचे यांचे विशेष आभार.  माणूस व माणुसकी जाणिवेचं अंतरंग : दरवळ   मध्यंतरी हिंदीतील एका मोठ्या साहित्यिकाच्या पुढील ओळी वाचनात आल्या… “आवाज उंची होगी,तो कुछ लोग सुनेंगे! अगर बात उंची होगी,तो बहोत सारे लोग सुनेंगे!” या ओळी लेखक घनश्याम पाटील यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या “दरवळ” या पुस्तकासाठी तंतोतंत लागू पडतात. कारण ‘दरवळ’ वाचताना त्यातील प्रत्येक लेखातील प्रत्येक परिच्छेदातून आपल्याला निश्चितच लिखाणातील उंचीचा वेगळेपणा जाणवतो. परिणाम साधणाऱ्या वाक्यांची उंची जाणवते! त्यांनी प्रत्येक लेख अत्यंत पोटतिडिकेनं लिहिलेला आहे याची पदोपदी प्रचीती…

पुढे वाचा

दरवळ

दरवळ

मराठी साहित्य परिषद, तेलंगण राज्य, हैदराबाद यांच्या ‘पंचधारा’ या मुखपृष्ठात परभणी येथील सुप्रसिद्ध लेखिका मनीषा कुलकर्णी-आष्टीकर यांनी ‘दरवळ’ या पुस्तकाची लिहिलेली समीक्षा. हे पुस्तक घरपोच मागवण्यासाठी संपर्क – ७०५७२९२०९२

पुढे वाचा

विचारांचा दरवळ

विचारांचा दरवळ

– संजीवनी घळसासी पत्रकार, लेखक, प्रकाशक, संपादक अशा अनेक जबाबदार्‍या एका विशिष्ठ ध्येयाने, निष्ठेने, पूर्ण क्षमतेने, उत्साहाने व आनंदाने पार पाडणारे ‘चपराक प्रकाशन’चे प्रकाशक घनश्याम पाटील यांचे नुकतेच प्रकाशित झालेले ‘दरवळ’ हे पुस्तक वाचले. हे पुस्तक त्यांच्या अनेक पूर्वप्रकाशित लेखांचा संग्रह आहे. हे पुस्तक अनेक विषयांना स्पर्श करते व त्यातुन लेखकाचा आदर्शवाद अधोरेखित करते.

पुढे वाचा