१९६० नंतरच्या कवितांची सफर

१९६० नंतरच्या कवितांची सफर

‘साहित्य चपराक’ दिवाळी विशेषांक 2020 साहित्य चपराक मासिकाचे सभासद होण्यासाठी आणि ‘चपराक’ची नवनवीन पुस्तके मागविण्यासाठी संपर्क – 7057292092 कवितेसोबत चालताना…! मराठी कवितेत 1960 नंतरच्या कवितेचं वेगळेपण आहे. खरी सशक्त कविता 1960 नंतर आलेल्या संग्रहांनी मराठीला दिली आहे पण इथं तो इतिहास सांगायचा नाही. त्या कवितेवर समीक्षा करावयाची नाही. आता एकविसाव्या शतकाची दोन दशकं संपून गेल्यावर या कवितांबद्दल लिहिणं हे सिंहावलोकन आहे पण वैयक्तिक माझ्यासाठी हे स्मरणरंजन आहे. कळत्या वयापासून या कवितेची आवड लागली. नंतर स्वत: कविता लिहू लागलो. कवीसंमेलनात भाग घेणं सुरु झालं. हे गेली चाळीस वर्ष सुरु आहे. त्यामुळं…

पुढे वाचा

कवितेचं गाणं होतांना.. एक अनुभव !

‘आईचा मान कधी देवाला नाही’ नमस्कार मंडळी, आज मला माझ्या “प्रांजळ” ह्या काव्यसंग्रहातील ‘आईचा मान कधी देवाला नाही’ ह्या कवितेचे गाणं झालंय म्हणून खूप खूप आनंद होत आहे. आपल्या सगळ्यांच्याच अतिशय जिव्हाळ्याचा विषय ही आपली ‘आई’ असते आणि म्हणूनच जगभरातील मातृशक्तीला माझे हे गीत मी आज समर्पित करून ‘आई’प्रती कृतज्ञता व्यक्त करतो. तिचे उपकार तर ह्या जन्मीच काय; पण कधीच फेडता येणार नाहीत! त्यामुळे तिच्या ऋणात राहणेच जास्त योग्य आहे असे मला वाटलं; म्हणून ‘मातृशक्ती’ला माझी ही ‘गीतांजली’ समर्पित करतो आहे.

पुढे वाचा