कॅमेर्‍याचे पांग फेडणारा छायादिग्दर्शक – राहुल जनार्दन जाधव

जर तुमच्यापुढे ‘गलेलठ्ठ पगाराची कायमस्वरूपी सरकारी नोकरी’ आणि ‘आवडीच्या पण अनिश्चित क्षेत्रातील सहाय्यक प्रशिक्षणार्थी’ या दोन प्रस्तावांपैकी  एक स्वीकारण्याचा पर्याय असेल तर कोणता निवडाल? विशेषतः तेव्हा, जेव्हा परिस्थितीने तुम्हाला एकेका पैशाचे महत्त्व चटके देऊन समजावले असेल. आपल्यापैकी बहुतांश लोक आधी आर्थिक स्थिरतेचा विचार करतील मग त्यातून वेळ मिळाला तर छंद, हौस, आवड वगैरे! पण त्याने मात्र वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षी एम.पी.एस.सी. पास करून मिळवलेल्या सरकारी नोकरीपुढे छायाचित्रकाराचा सहाय्यक होणे निवडले. 80च्या दशकात असा निर्णय घेणे चौकटीबाहेरचे होते. त्यावेळी छायाचित्रकलेकडे पूर्ण वेळ व्यवसाय म्हणून क्वचितच पाहिले जायचे. तरीही पूर्णवेळ छायाचित्रकार होण्याचा…

पुढे वाचा

मुडदा बशिवला मेल्याचा!

  कुणाच्याही मृत्युची अपेक्षा ठेवणं वाईटच! त्याचं समर्थन नाही होऊ शकत! मात्र एखादा माणूस अतिरेक करत असेल, एखाद्याला तो जमिनीचा भार वाटत असेल, त्याच्यामुळं एखाद्याचं वैयक्तिक किंवा समाजाचं मोठं नुकसान होत असेल तर मो मेला पाहिजे असं अनेकांना वाटतं. त्याच्या अशा ‘वाटण्या’नं समोरचा मरणार नसतो. तरीही अनेकजण तळतळाट देतात. समोरचा संपला पाहिजे अशी इच्छा व्यक्त करतात. काही वेळा हे वैयक्तिक शत्रुत्वातून घडतं, काहीवेळी व्यापक समाजहिताच्या विचारानं होतं. मग त्यासाठी काहीवेळा कटकारस्थानं रचली जातात, हल्ले होतात. खून पडतात. शत्रू मेला पाहिजे म्हणून पूर्वीच्या काळी तर घनघोर लढायाही झाल्या आहेत. समोरचा ‘मेलाच…

पुढे वाचा

करना है कुछ करके दिखाना है..

चार  किमी पोहणे, १८० किमी सायकलिंग आणि त्यानंतर ४२.२ किमी पळणे असा क्रम तुम्हाला कोणी दिला आणि कसलीही विश्रांती न घेता ठरलेल्या वेळेत हे सगळं पूर्ण करायला सांगितलं तर तुम्ही काय कराल? ‘आयर्न मॅन’ नावाची अशी एक स्पर्धा असते आणि त्यात हा विक्रम करावा लागतो. इतकं सगळं केल्यावर तुम्हाला पोलादी पुरूष म्हणून मान्यता मिळते. वयाच्या पस्तीशीनंतर या स्पर्धेविषयी कळल्यानंतर कठोर परिश्रम घेत एकदा नव्हे तर ऑस्ट्रेलिया आणि जर्मनी अशा दोन देशात झालेल्या या स्पर्धेत दोनवेळा यश मिळवणारे अलौकिक व्यक्तिमत्त्व म्हणजे निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथील डॉ. अरूण गचाले! बालरोगतज्ज्ञ असलेल्या…

पुढे वाचा

अधिक-उणे – मराठी चित्रपटसृष्टीचे

मराठी चित्रपट निर्मात्यांना जेवढ्या सोयी आणि सवलती राज्य शासनाने दिलेल्या आहेत तेवढ्या अन्य कोणालाही देवू केलेल्या नाहीत. चित्रपट निर्मितीसाठी आर्थिक सहाय्य, चित्रपट निर्मिती झाल्यानंतर सिमेना करमुक्त करण्याकरता शासनाची होणारी मदत, निर्माण झालेला सिनेमा चांगल्या चित्रपटगृहात लावता यावा म्हणून शासकीय मदत आणि एवढे सगळे करूनही या चित्रपटांना फारसा पे्रक्षकवर्ग मात्र मिळत नाही. शासन चित्रपट निर्मात्यांना निर्मितीपासून ते चित्रपटगृह देण्यापर्यंत अनेक सोयी सवलती देवू शकते पण चित्रपटगृहात प्रेक्षक नेवून बसविणे हे शासनाला शक्य नाही. त्या दर्जाची, गुणवत्तेची निर्मिती ही त्या निर्मात्यालाच करता यायला हवी की जी निर्मिती होत नाही. गेल्या काही वर्षात…

पुढे वाचा

जन्मभरी तो फुलतचि होता…

जगातील सर्वाधिक उत्तुंग मनोरे कोणते? असा प्रश्न मला कधी पडतच नाही. हा प्रश्न न पडण्याचं कारण म्हणजे आपल्या राष्ट्रानं जगाला अनेक भव्यदिव्य मनोरे दिलेत. या मनोऱ्यांनी त्यांच्या कार्यकर्तृत्त्वानं त्यांची उंची आपापल्या क्षेत्रात सातत्यानं दाखुवून दिली. महाकवी केशवसुत ते मर्ढेकर या परंपरेचा विचार करता असाच एक बलदंड मनोरा मला खुणावतो, भुरळ पाडतो. या विलक्षण प्रतिभेच्या मनोऱ्याचं नाव म्हणजे लोककवी मनमोहन नातू! ११-११-१९११ ला जन्मलेल्या मनमोहनांनी ७ मे १९९१ ला जगाचा निरोप घेतला; मात्र त्यांच्या साहित्यिक योगदानातून हा प्रतिभेचा जागृत ज्वालामुखी कायम धगधगत आहे. कुणी शाईने लिहिली कविता कुणी रक्ताने लिहिली कविता करी…

पुढे वाचा

‘परंपरा’ नको, ‘अभिमान’ बाळगा

‘‘शरद पवार यांनी वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसल्याची चर्चा गेली अनेक वर्षे महाराष्ट्रात रंगत आहे. आमच्या पिढीला त्याविषयी फारसे काही माहीत नसल्याने पवार साहेबांनीच त्यावर भाष्य करणारी ‘खंजीर’ नावाची राजकीय कादंबरी लिहिल्यास ती वाचकप्रिय ठरेल आणि त्या कादंबरीला मराठीतला ‘ज्ञानपीठ’ही मिळेल,’’ असे मी एका लेखात लिहिले होते. हाच धागा पकडत अभियांत्रिकी शाखेच्या दुसर्‍या वर्गात शिकत असलेल्या एका विद्यार्थ्याने मला दूरध्वनी केला. तो म्हणाला, ‘‘दादा, मला हे माहीत आहे की तुम्ही कधीही खोटे लिहित नाही. मात्र पवार साहेबांनी खरेच वसंतदादा पाटलांचा ‘मर्डर’ केलाय का हो?’’ अज्ञानापोटी झालेल्या त्याच्या गैरसमजाबद्दल हसावे…

पुढे वाचा

प्रथा – परंपरा नाकारताना!

कुजबुज, हेटाळणी, कुचेष्टा, प्रखर विरोध प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे वाळीत टाकणं… ही सगळी चढती भांजणी आहे एखादी प्रथा किंवा परंपरा नाकारताना समाजाकडून येणार्‍या प्रतिक्रियांची.

पुढे वाचा

हे देवाघरचे देणे!

प्रेम नाही मिळाले म्हणून द्वेष? घृणा? सूड? मग प्रेमच कसले? अलीकडच्या माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटनांना पाहिले की मन सुन्न होते आणि विचारात पडते की इतक्या खालच्या पातळीवर जाईपर्यंत माणसाचा आत्मा, विवेक, त्याच्यातील दयाभाव कसा काय झोपू शकतो? की या सगळ्याला जागे ठेवण्याच्या अभ्यासात/जागरणात समाज आणि संस्कृतीचा सहभाग कमी व्हायला लागलाय?

पुढे वाचा