आयपांढरीतली माणसं : दखलनीय व्यक्तिचित्रण!

आयपांढरीतली माणसं : दखलनीय व्यक्तिचित्रण!

नुकताच सुधाकर कवडे लिखित ‘आयपांढरीतली माणसं’ हा व्यक्तिचित्रणसंग्रह वाचण्यात आला. ‘चपराक प्रकाशन’ने प्रकाशित केलेल्या या संग्रहाचे मुखपृष्ठ संतोष घोंगडे यांनी अत्यंत लक्षवेधक असे चितारले आहे. प्राचार्य शिवाजीराव बागल यांनी ‘आयपांढरीतल्या माणसांचा’ कानोसा घेताना, ग्रंथाची पाठराखण करताना ओळख करुन दिली आहे. मलपृष्ठावर ख्यातकीर्त साहित्यिक प्रा. डॉ. द. ता. भोसले यांनी शुभेच्छारुपी निवेदन केलेले आहे.

पुढे वाचा

चारित्र्याचा महान आदर्श

चारित्र्याचा महान आदर्श

आपल्या वर्तमानाला आकार देऊन भविष्याची ऊर्जस्वल स्वप्ने सजवण्यासाठी इतिहासाच्या पानात डोकावून त्यातून योग्य तो बोध घेणे गरजेचे आहे. ज्यांना इतिहास माहीत नसतो त्यांचा वर्तमान आणि भविष्य अंधकारमय होतं हा इतिहास आहे. इतिहासात झालेल्या चुकांमधून बोध घेणे, त्या चुका पुन्हा होऊ नये यासाठी प्रत्येक इतिहास घडवू पाहणार्‍याला इतिहासाचं ज्ञान असणं आवश्यक आहे.

पुढे वाचा

रिलेशनशिप

रिलेशशिप

हातात डोकं गच्च धरून, जोर जोरात आदिती ओरडत होती. ‘‘जा इथून सगळे जण… कोणी नकोय मला… मला एकटं राहू द्या…. मला थोडी तरी शांतता हवीय… जाऽऽऽ… प्लिज… जाऽऽ… हात जोडते… पाया पडते…’’ पण तिचा आक्रोश कोणी ऐकायलाही तयार नव्हतं. आई, बाबा, ताई, मैत्रिणी सगळेजण तिच्या भोवती गोळा होऊन तिला विचारत होते, ‘‘काय केलंस तू हे? डॉक्टर ना तू? का? कशासाठी?’’ आणि आदितीकडे कोणत्याच प्रश्नांची उत्तरं नव्हती. खरंतर उत्तरं देता येऊ नयेत कोणाला असे प्रश्न तरी आयुष्यात का निर्माण व्हावेत?

पुढे वाचा

राज्यकर्ते बदलले, परिणाम का बदलला नाही?

राज्यकर्ते बदलले, परिणाम का बदलला नाही?

लोकशाहीमध्ये लोकांचा राजकीय तसेच प्रशासकीय प्रक्रियेतील सहभाग लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. जनसहभागाचा अर्थ आणि स्वरूप जनतेचा प्रशासकीय सहभाग म्हणजे प्रशासकीय प्रक्रियांवर लोकांचे नियंत्रण होय. हा सहभाग दोन प्रकारे अभ्यासता येऊ शकतो. एक म्हणजे जनतेचा सामान्य प्रशासनातील सहभाग आणि दुसरा म्हणजे जनतेचा विकास प्रशासनातील सहभाग. सामान्य प्रशासनातील जनतेचा सहभाग पुढीलप्रमाणे असल्याचे आढळून येते.

पुढे वाचा

बौद्धिक मागासपणाचे काय करणार?

बौद्धिक मागासपणाचे काय करणार?

मानवी जीवन हे विलक्षण आहे. आपापल्या सापेक्ष जीवनचौकटीत तो आपले आयुष्य जगत असतो, धारणा बनवत असतो. आपले व्यक्तिमत्व आपापल्या कुवतीप्रमाणे समृद्ध वा अवरुद्ध करण्याचा प्रयत्न करत असतो. या समृद्धीच्या वा अवरुद्धीची उंची-खोली मोजत बसण्याचे खरे तर कारण नाही. प्रत्येकाचे जीवन हा एक स्वतंत्र अनुभव असतो. कोणताही बाह्य विचार मनुष्य पूर्णपणे स्वीकारत नाही.

पुढे वाचा

सोच बदलो…तुम बदलोगे

सोच बदलो...तुम बदलोगे।

‘‘विचार सतत वाहतात पण त्यांचे सामर्थ्य कमी होत नाही. ते नदीप्रमाणे असतात. एक एक विचार येत गेला, नाहीसा होत गेला पण सत्ता चालली ती विचारांचीच! मनुष्याला या विचारांपासूनच प्रेरणा मिळत आली आहे. विचारांच्या सामर्थ्याची तुलना करावी अशी अन्य शक्ती या जगात नाही,’’ हे अनमोल चिंतन आहे… आचार्य विनोबा भावे यांचं! चांगल्या विचारांनीच माणूस घडत असतो. मात्र सकारात्मक विचार करणार्‍या लोकांची प्रगती लवकर होताना आपल्याला दिसून येईल. याउलट नकारात्मक विचार करणार्‍या व्यक्तिंना अनेक संकटांना, दुर्धर प्रसंगाना सामोरं जावं लागतं! साधारणतः बर्‍याच लोकांचं आपल्या विचारांकडे लक्ष नसतंच. दिवसभरात अनेक विचार प्रत्येकाच्या मनात…

पुढे वाचा

संवाद व स्वगत

संवाद व स्वगत

मानवाला मिळालेली सर्वात मोठी देणगी म्हणजे विचार करण्याची शक्ती. या विचार करण्याच्या शक्तीवरच मानवाच्या आयुष्याचा डोलारा उभा असतो. मानवाच्या प्रत्येक कृतीत काही ना काही तरी विचार असतोच. अगदी तान्हे बाळसुद्धा आपल्याला तहान, भूक लागली आहे हा विचार आपल्या रडण्यावाटे आईपर्यंत पोहोचवतच असते. या वयापासून मानव विचार करण्यास तयार होत असतो. आई, बाबा, इतर मंडळी या विचार प्रक्रियेला वळण देत असतात. तहान लागल्यावर स्वतःच्या हाताने पाणी घेण्याचा विचार आईच त्याच्या मनात रुजविते.

पुढे वाचा

मलमपट्टी नको; माणूस उभा करा!

मलमपट्टी नको; माणूस उभा करा!

कोरोनासारख्या जागतिक महामारीमुळं भयप्रद परिस्थिती निर्माण झालेली असतानाच विविध प्रांतात निसर्गाचं तांडवही अनुभवायला येत आहे. मागच्या वर्षी कोकण भागात निसर्ग चक्रीवादळानं हाहाकार उडवला. यंदाही तौैक्ते वादळानं होत्याचं नव्हतं झालं आहे. गेल्या वर्षी निसर्गाच्या तडाख्यानं कोकणवासीयांचं अतोनात नुकसान झालं. नारळ, पोफळी, फणस, कोकम, जायफळाच्या बागा क्षणार्धात उद्ध्वस्त झाल्या. शेकडो वर्षांची झाडं उन्मळून पडली. डोळ्यादेखत सगळं भुईसपाट होऊनही कोकणी माणसानं धीर सोडला नाही. न खचता, न डगमगता तो पुन्हा उभं राहण्याचा प्रयत्न करत होता.

पुढे वाचा