आधुनिक पिढी

आधुनिक पिढी

21 व्या शतकात जन्माला आलेली ही पिढी फारच चौकस आहे. कोणत्याही गोष्टीबद्दलची सखोल माहिती मिळाल्याशिवाय शांत बसत नाही. नोकरी अथवा व्यवसाय करण्यासाठी संगणकाच्या मदतीने ते पूर्ण माहिती आत्मसात करून घेतात. ती माहिती पटली तरच ते त्यावर कृती करतात. या पिढीने काळाची पावले लवकर ओळखली आहेत. पुस्तकी ज्ञानाबरोबरच ते संगणकीय ज्ञानालाही तेवढेच महत्त्व देतात. संगणकीय ज्ञानामुळे त्याच्या विचारशक्तीलाही एक प्रकारचा वेग मिळाला आहे. ते कोणत्याही गोष्टीचा सखोल अभ्यास करून ती गोष्ट जास्तीत जास्त सुलभ करण्यामागे त्यांचा कटाक्ष असतो. फेसबुक, व्हॉट्स अ‍ॅप्स, ट्वीटर यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानांनी युक्त अशी विविध सोशल मीडियाची उपलब्धता…

पुढे वाचा

संवाद व स्वगत

संवाद व स्वगत

मानवाला मिळालेली सर्वात मोठी देणगी म्हणजे विचार करण्याची शक्ती. या विचार करण्याच्या शक्तीवरच मानवाच्या आयुष्याचा डोलारा उभा असतो. मानवाच्या प्रत्येक कृतीत काही ना काही तरी विचार असतोच. अगदी तान्हे बाळसुद्धा आपल्याला तहान, भूक लागली आहे हा विचार आपल्या रडण्यावाटे आईपर्यंत पोहोचवतच असते. या वयापासून मानव विचार करण्यास तयार होत असतो. आई, बाबा, इतर मंडळी या विचार प्रक्रियेला वळण देत असतात. तहान लागल्यावर स्वतःच्या हाताने पाणी घेण्याचा विचार आईच त्याच्या मनात रुजविते.

पुढे वाचा

वात, वारा आणि हवा

वात, वारा आणि हवा

वरवर पहाता या तिन्ही शब्दांचा अर्थ सारखाच आहे. हवा वाहू लागली की त्याला वारा म्हणतात हे आपण शाळेतच शिकलो आहोत. हे तिन्ही शब्द जरी समानार्थी असले तरी प्रत्येक शब्द विशिष्ठ ठिकाणीच शोभून दिसतो/चपखल बसतो.

पुढे वाचा

आठवणीतील चित्रपटगृहे

आठवणीतील चित्रपटगृहे

साधारणतः १९५१ ते १९७० ही जी २० वर्षे होती तो काळ भारतीय हिंदी चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ ओळखला जातो. खरोखरच त्या काळात एकापेक्षा एक सरस नितांत सुंदर अशा चित्रपटांची रेलचेल होती. त्या काळातील प्रत्येक अभिनेत्याने तसेच अभिनेत्रीने आपल्या अंगभूत अभिनयाने रसिकांच्या मनावर राज्य केले होते. चित्रपट संगीताने त्या काळात सुवर्णकळसच गाठला होता. श्रवणीय तसेच अनवट चालीची गाणी देऊन संगीतकारांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले होते. काही चित्रपटांत आठ ते दहा गाणी असूनही सगळीच गाणी श्रवणीय असायची. अभिरुचीसंपन्न गीतलेखक, गायक, संगीतकार असल्यामुळे त्यांची गाणी म्हणजे बंदा रूपया असायचा. संगीतकार आपल्या जादुई पोतडीतून एकापेक्षा एक वरचढ…

पुढे वाचा

आठवणींचा सुगंध

आठवणींचा सुगंध

मानवाला मिळालेली सर्वात मोठी देणगी म्हणजे आपल्या ठायी असलेली स्मरणशक्ती. प्रत्येकाच्या मनात या स्मरणशक्तीसाठी एक कोपरा राखलेला असतो. हव्याहव्याशा वाटणार्‍या आठवणी मनातील या कोपर्‍यात दडविलेल्या असतात. हळूवार फुंकर मारताच या आठवणी ताज्या होऊन आपल्या मनाभोवती व विचारांभोवती रूंजी घालून आपल्याला वेगळ्याच विश्वात घेऊन जातात.

पुढे वाचा