हैदराबाद मुक्तिसंग्रामाचा लढा आपल्यापैकी अनेकांना ज्ञात आहे. हैदराबाद राज्यातील निजामांच्या सरकारी धोरणांना विरोध करणारे कम्युनिस्ट नेते म्हणजे पेंड्याला राघव. त्यांनी अस्पृशता, महिलांवर होणारे अत्याचार याविरूद्ध आवाज उठवला. तेलंगणातील शेतकर्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी त्यांनी संघर्ष उभारला. सरकारविरोधी भूमिका घेतली म्हणून हैदराबाद पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली आणि त्यांना तुरूंगात डांबले. ते वर्ष होते 1952 चे. त्यावर्षी तिथे लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र आल्या होत्या. राघव यांनी विधानसभा आणि लोकसभेसाठी तीन मतदारसंघातून अर्ज भरले. तुरूंगातूनच त्यांनी निवडणूक लढवली आणि या तीनही मतदारसंघातून विजय मिळवला.
पुढे वाचा