समतावादी लोकराजा – राजर्षी शाहू महाराज

आपल्या संस्थानात मागासवर्गीयांसाठी 50 टक्के आरक्षण ठेवण्याचा क्रांतिकारी निर्णय जांनी 1902 साली आपल्या वाढदिवशी घेतला व दलित, वंचित, पीडित, गोरगरीब, शोषित, गावकुसाबाहेरच्या मागास जनतेला एक अनोखी भेट दिली होती. त्या निर्णयाला आता शंभरहून अधिक वर्षांचा काळ लोटला आहे. आज जग परग्रहावर वसाहत करण्याचा प्रयत्न करीत असताना एकविसाव्या शतकातही मागास, दलित, विकलांगांना बरोबरीच्या नात्याने वागवले जात नाही आणि म्हणूनच महाराजांच्या शंभर वर्षांपूर्वीच्या या वटहुकुमाचे महत्त्व आणखीनच, नव्हे शतपटीने अधोरेखित होते. असे म्हणतात की प्रत्येक मोठ्या माणसाच्या आयुष्यात आत्मजागृतीचा क्षण येतो, जो त्यांच्या संपूर्ण आयुष्याची दिशाच बदलून टाकतो. त्याला आपण कशासाठी जगायचे,…

पुढे वाचा

गाय, वाद आणि उपयोगिता

सध्या गाईवरून देशभरात चांगलेच रणकंदन सुरू आहे. गाई वाचवण्यासाठी स्वयंघोषित गोरक्षक वाटेल तसा धिंगाणा घालत आहेत. त्यामुळे गाईच्या उपयोगिता मुल्यावर चर्चा होण्यापेक्षा तिच्या धार्मिक मुद्द्यावरच जास्त गोंधळ होऊ लागला आहे. काही विचारवंत तर गोवंश आधारित शेती आता कालबाह्य झाली आहे. गाय कधी नव्हे तेवढा अनुपयुक्त पशू ठरला आहे, अशाही बिनदिक्कत भांडवली थापा मारत सुटले आहेत. मुळात रासायनिक शेतीचे दुष्परिणाम डोळ्यांसमोर दिसत असताना. गोवंश आधारित शेती कालबाह्य ठरल्याची बतावणी करणे, खरे तर किव आणणारे आहे. देशी गोवंशाच्या आधारे विषमुक्त अन्न पिकवता येऊ शकते. याचे सप्रमाण उदाहरण पद्मश्री सुभाष पाळेकर यांनी दाखवून…

पुढे वाचा

सदोबांचं बेगडी इतिहासप्रेम

महाराष्ट्रात विचारवंतांची कमतरता नाही. त्यातही पुणे शहरात तर नाहीच नाही. इथे एक विचारवंत शोधा; तुम्हाला दहा मिळतील. अशाच ‘विचारवंतांपैकी’ एक आहेत डॉ. सदानंद मोरे. ते घुमानच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. संत साहित्याचे व्यासंगी अभ्यासक आहेत. तत्त्वज्ञानात रमतात. त्याहून महत्त्वाचे म्हणजे ते देहूकर मोरे आहेत आणि थेट तुकाराम महाराजांचे वंशज आहेत. ‘सांगे वडिलांची कीर्ती तो एक मूर्ख‘ असे रामदास स्वामींनी म्हटले असले तरी सध्या कोण कुणाचा वारसदार आहे हे सांगावे लागते. कुणी कुणाच्या संपत्तीचा वारसदार असते; तर कुणी विचारांचा! सदानंद मोरे जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या विचारांचे वारसदार आहेत, असे म्हणायला…

पुढे वाचा

उंबरातले किडे मकोडे, उंबरी करिती लीला! विश्‍वंभर भटजींची गोष्ट

Sahitya Chaprak Marathi Masik Magazines Logo

गेल्या महिना अखेरची गोष्ट आहे. फ़ेसबुक म्हणजे सोशल माध्यमात माझ्या दोन मित्रांची मते वाचायला मिळाली. त्यातही गंमत अशी, ही नंतर आलेल्या मताला तीन दिवस आधीच एका मित्राने जणू उत्तर देऊन ठेवलेले होते. पहिला मित्र बालाजी सुतार कवी, साहित्यिक आहे आणि निरागस पुरोगामी आहे. त्याने म्हटले आहे, ‘की माझ्या राजकीय विचारांशी अजिबात न जुळणारी मते बाळगून असलेले, माझे ज्येष्ठ मित्र भाऊ तोरसेकर, अश्विनी मयेकर आणि समवयस्क आशिष चासकर, संदीप पटेल आणि आणखीही अनेक मित्रांना माझ्या व्यक्तिगत आयुष्यात अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. माझी अनेक सुखदु:खं मी यांच्याशी शेअर करतो.

पुढे वाचा

इतिहासाची ज्योत तेवत ठेवणारे डॉ. सदाशिव शिवदे

Doctor Sadashiv Shivade

स्वामीनिष्ठ बाळाजी आवजी चिटणीस चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने त्यांच्या नावे देण्यात येणारा पुरस्कार यंदा सुप्रसिद्ध इतिहास तज्ज्ञ डॉ. सदाशिव शिवदे यांना देण्यात येत आहे. मंदिरस्थापत्य व मूर्तीशास्त्राचे गाढे अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर यांच्या हस्ते आणि संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली, आमदार धैर्यशील पाटील, शिरीष चिटणीस यांच्या उपस्थितीत आज, रविवार, दि. 4 जून रोजी सायं. 6 वाजता महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहात हा पुरस्कार वितरण सोहळा होत आहे. यानिमित्त डॉ. सदाशिव शिवदे यांचे स्नेही आणि पुण्यातील ‘चपराक प्रकाशन’चे प्रकाशक घनश्याम पाटील यांचा हा विशेष लेख…

पुढे वाचा

अभ्यासाविन प्रगटे…!

Abhyasavin Pragate

महाराष्ट्र साहित्य परिषद ही साहित्यातील मातृसंस्था आहे. या संस्थेतर्फे दरवर्षी उत्कृष्ट साहित्यनिर्मितीसाठी काही पुरस्कार दिले जातात. यंदाचे पुरस्कार मागच्या आठवड्यात पुण्यात समारंभपूर्वक दिले गेले. त्या अनेक पुरस्कारांपैकी ‘स्तंभ लेखन’ या साहित्यप्रकारासाठीचा एक पुरस्कार डॉ. सच्चिदानंद शेवडे यांच्या ‘सेक्युलर्स नव्हे फेक्युलर्स’ या पुस्तकाला दिला गेला. त्यावर जळफळाट करत विश्‍वभंर चौधरी नावाच्या एका गृहस्थाने प्रचंड त्रागा केला आहे. जणू साहित्य परिषदेने पुरोगाम्यांचे मुस्काटच फोडले अशा आविर्भावात त्यांनी थयथयाट केला आहे. या स्पर्धेचा आणि विशेषतः या साहित्यप्रकाराचा मी परीक्षक असल्याने चौधरी यांनी ज्या उलट्या बोंबा मारल्यात त्याचा समाचार घेणे क्रमप्राप्त आहे.

पुढे वाचा